पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांची भेट घेत अभिनंदन केले. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे. 

हेही वाचा- पुणे : कसब्यात १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शास्तीकराचा मोठा निर्णय या अधिवेशनात झाला. अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. अनेक दिवस हा विषय प्रलंबित होता. आचारसंहिता असल्याने हा निर्णय घोषित करता येत नव्हता. अखेर हा निर्णय झाला असून पिंपरी- चिंचवड शहरातील नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील बांधकांना तिप्पट दंड बसला होता तो आता माफ झाला असल्याचे पाटील म्हणाले. तसेच अश्विनी लक्ष्मण जगताप या अधिवेशनात लवकरच दिसतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा- “त्या कुटुंबाबर ओरखडे ओढण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे”; नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत जरी भाजपाचा विजय झाला असला तरी कब्यात भाजपाचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. तब्बल ३० वर्षांनी काँग्रेसने भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. भाजपाने चिंचवड पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान केले होते. महाविकास आघाडी आणि भाजपासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची होती. अखेर यात भाजपाने बाजी मारली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पराभवाचे खापर अपक्षावर फोडले आहे.