Pune Breaking News Updates: वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवनेला स्वारगेट मधून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार होते. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या घटनेची चर्चा सुरू असताना अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही, यामुळे होत असलेल्या सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. तर दुसरीकडे मुंबईत पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करत रात्रकालीन ब्लॉकचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांना विनाव्यत्यय प्रवास करता येणार आहे. तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर या भागातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 23 may 2025

13:22 (IST) 23 May 2025

धक्कादायक: पुण्यात पुन्हा एका नवविवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

लग्नात हुंडा दिला नाही,मानपान केला नाही.या सततच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. …सविस्तर बातमी
13:16 (IST) 23 May 2025

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी आठ तास बंद

ही माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी दिली. …सविस्तर बातमी
13:05 (IST) 23 May 2025

पालघरकरांना दिलासा, पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांना पालघर येथे अतिरिक्त थांबा

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि दादर-बिकानेर एक्स्प्रेस या दोन लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना पालघर स्थानकात प्रायोगिक तत्वावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. यामुळे पालघर येथील प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ होणार आहे. …सविस्तर वाचा
12:55 (IST) 23 May 2025

जिल्ह्यातील १२३४ विद्यार्थी आरटीई प्रवेशातून बाद, २५४८ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण

प्रवेश प्रक्रियेसाठी १४ मे ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. …सविस्तर वाचा
12:50 (IST) 23 May 2025

मुंबईतील कंपनीचा सर्वर हॅक करून डेटा चोरी, बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी

मुंबईतील कुर्ला येथील जाहिरात कंपनीचा सर्वर हॅक करून इनक्रीप्ट फाइलद्वारे डेटा चोरी करण्यात आला असून, आरोपींनी बिटकॉइनमध्ये खंडणीची मागणी केली आहे. …अधिक वाचा
12:32 (IST) 23 May 2025

ग्रामीण भागातील अकरावी प्रवेश ऑनलाईन घेण्यास विरोध,गोंधळानंतर राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ग्रामीण भागातून तीव्र विरोध होत असून, शिक्षक महासंघाने मुख्यमंत्र्यांना ऑफलाइन प्रवेश पद्धतीसाठी पत्र पाठवले आहे. …अधिक वाचा
12:26 (IST) 23 May 2025

विरार मध्ये झाडांच्या मुळावर काँक्रिटीकरण, पाणी जाण्याचे मार्गही बंद; पर्यावरण प्रेमींकडून संताप

बोळींज खारोडी येथील अतिक्रमणामुळे पावसाचे पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग ही बंद झाला आहे. …वाचा सविस्तर
12:17 (IST) 23 May 2025

दहावी,बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी व बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण किंवा श्रेणी सुधारणा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाने याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. …अधिक वाचा
12:06 (IST) 23 May 2025

शिलार धरणामुळे पनवेलकरांची पाणी चिंता दूर

या प्रकल्पातील पाण्यावर ७५ टक्के आरक्षण पनवेलसाठी ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घ्यावा लागला. …सविस्तर बातमी
11:55 (IST) 23 May 2025

‘पोशीर’चे पाणी तीन हजार कोटींना, खर्चातील सर्वाधिक हिस्सेदारी नवी मुंबई महापालिकेच्या वाट्याला

राज्य सरकारने आखलेल्या नियोजनानुसार या प्रकल्पासाठी महापालिकेला २,७६३ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. …वाचा सविस्तर
11:41 (IST) 23 May 2025

अखेर मिरा भाईंदर मधील अनधिकृत कंटेनरवर प्रशासनाची कारवाई!

अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण २२ अनधिकृत कंटेनर कार्यालय असल्याचे समोर आले. …अधिक वाचा
11:33 (IST) 23 May 2025

तब्बल २३ वर्षांपासून अपत्यसुखाला वंचित, विशेष उपचार आणि पदरात तिळे

मातृत्व ही अमोल देण समजल्या जाते. म्हणून बाळ जन्मास येण्याची आस प्रत्येक विवाहितेस लागून राहलेली असते. त्याचा महिमा म्हणून ८ मार्चला मातृत्व दिन साजरा केल्या जातो. …अधिक वाचा
11:32 (IST) 23 May 2025

अंधेरीत डिलिव्हरी बॉयकडून महिला वकिलाचा विनयभंग

मुंबईतील अंधेरीमध्ये फ्लिपकार्ट पार्सल परत करण्याच्या वादातून एका महिला वकिलाचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. अंबोली पोलिसांनी डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. …वाचा सविस्तर
11:14 (IST) 23 May 2025

कर्जबाजारी, त्यात बायकोही सोडून गेली मग तिकिट तपासनिसाने पकडल्याचा असा घेतला बदला…

नकली पावत्या आणि ओळखपत्रांचा वापर करून त्याने अनेक प्रवाशांकडून पैसे उकळले. अखेर रेल्वेच्या दक्षता पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. …अधिक वाचा
10:27 (IST) 23 May 2025

वरळीतील गोदामात भीषण आग,अग्निशमन दलातील जवान जखमी

वरळीतील गांधी नगर परिसरातील भारत बाजारमधील शोरूमच्या गोदामात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून एक अग्निशमन जवान जखमी झाला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. …सविस्तर बातमी
09:42 (IST) 23 May 2025

प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

दहिसरच्या एका कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यावर १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षभरापासून प्राचार्य प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. …अधिक वाचा
09:03 (IST) 23 May 2025

माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास :२२ मजली सहा पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी शनिवारी निविदा,१४५० कोटी रुपये खर्च करून ४०५३ घरांची बांधणी

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात २२ मजली सहा इमारतींसाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे. १४५० कोटींच्या खर्चातून ४०५३ घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
08:49 (IST) 23 May 2025

अकरावीची अर्ज नोंदणी आता २६ मेपासून

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर आता अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. …वाचा सविस्तर
08:33 (IST) 23 May 2025

वैष्णवी आत्महत्या प्रकरण: पुण्यातून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक

गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशीला हगवणे हे फरार होते. …सविस्तर वाचा

मुंबई, पुणे आणि नागपूर सह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…