Premium

तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द

पुणे – दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.

irctc indian railway news passenger can get a confirmed train ticket 10 minutes before the train starts through current booking process
रेल्वेने प्रवाशांसाठी करंट तिकीट बुकिंग (Current Ticket Booking) नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने तुम्ही ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी कन्फर्म तिकीट मिळवू शकता. (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : पुणे – दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ३ ऑक्टोबरला काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ब्लॉकमुळे पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस, पुणे- बारामती पैसेंजर, पुणे – दौंड पैसेंजर, बारामती – दौंड पैसेंजर, दौंड -पुणे पैसेंजर आणि दौंड- हडपसर पैसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचवेळी काही गाड्या सुटण्याची आणि पोहोचण्याची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. त्यात २ ऑक्टोबरला इंदूरहून सुटणारी इंदूर – दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून सुटेल. हैदराबादहून सुटणारी हैदराबाद – हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबरला दौंडपर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर – हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडमधून सुटेल.

हेही वाचा – सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

याचबरोबर सोलापूर – पुणे डेमु २ ऑक्टोबरला दौंड – पुणे दरम्यान रद्द राहील. बारामती -पुणे पैसेंजर ३ ऑक्टोबरला दौंड – पुणे दरम्यान रद्द राहील. पुणे- बारामती पैसेंजर ३ ऑक्टोबरला पुणे – दौंड दरम्यान रद्द राहील. हडपसर- सोलापूर डेमू गाडी ३ ऑक्टोबरला हडपसर – दौंड दरम्यान रद्द राहील.

हेही वाचा – काय भारत, काय इंडिया, माणूस म्हणायला लायक आहोत का? उज्जैन घटनेवर अमोल कोल्हे कडाडले

विलंबाने धावणाऱ्या गाड्या

ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, नागरकोईल – मुंबई, बंगळुरू- मुंबई उद्यान, जम्मूतावी- पुणे झेलम, अमरावती – पुणे आणि कराईकल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस विलंबाने धावतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway block for technical works many trains canceled for next two days pune print news stj 05 ssb

First published on: 01-10-2023 at 20:19 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा