पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामतीसह पुरंदर, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांमध्ये कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याबाबतचे पत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात यावी आणि या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा विभागाचे मंत्री आणि सचिव; तसेच लोकप्रतिनिधींना बोलविण्यात यावे, असे पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्राला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री शिंदे बैठक बोलविणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निकालानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी बारामतीसह पुरंदर, इंदापूर आणि दौंड भागाातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्याबाबतची माहिती पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रामध्ये दिली असून, कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा…पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्री पदासाठी आशावादी, तातडीने गेले मुंबईला

तीन दिवसांचा बारामती दौरा

लोकसभा निकालानंतर विधानसभेला बारामतीत पाय घट्ट रोवण्यासाठी माजी केंद्रीय शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवड्यातच तीन दिवसांचा दौरा केल्यानंतर मंगळवापासून (दि. १९ जून)पुन्हा ते बारामतीत असणार आहेत. पवार यांच्या या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना उभे करण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या या तीन दिवसांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar s letter to chief minister eknath shinde to holding a meeting for measures in drought prone talukas of pune district pune print news spt 17 psg