लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: हडपसर भागात मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. वडिलांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून या मुलाने काठीने मारहाण करून आणि गळा कापून वडिलांचा खून केला. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवि क्षीरसागर (वय ५२, घुले पाटील कॉलनी मांजरी रेल्वे गेट जवळ मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. मुलगा ओंकार रवि क्षीरसागर (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. आरोपी मुलाची आई रेखा रवी क्षीरसागर (वय ४३) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

हेही वाचा… मी डॉक्टर बोलत आहे.. असे सांगत पुण्यात महिला करतात अशी फसवणूक

रवि क्षीरसागर यांनी दारूच्या नशेत मुलगा ओंकार ला शिवागळ केली. आरोपीने काठीने मारहाण करून आणि गळा दाबून त्यांचा खून केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son killed his father by cutting his throat in pune print news rbk 25 dvr