पुणे : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी लावलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना ठिकठिकाणी लावलेले फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभेच्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार प्रचारात उतरल्याने रंगत वाढली आहे. भाजप-शिवसेना युतीचे हेमंत रासने, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यातील लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष पोटनिवडणुकीकडे लागले आहे. प्रचार फेऱ्या, सभांमुळे रंगत निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले “…म्हणुन राष्ट्रपती राजवट”

पोटनिवडणुकीतील प्रचाराची सांगता येत्या शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) होणार असून मतदान रविवारी (२६ फेब्रुवारी) आहे. प्रचार अंतिम टप्यात आला आहे. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मंगळवारी मध्यरात्री कसबा पेठेतील वाडे, सोसायटी तसेच मोकळ्या जागांवर छोटे फलक लावण्यात आल्याचे उघडकीस आला आहे. ‘येथे सोने, चांदी, पैसे इ.सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप- मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल. यंदा कसब्यात धंगेकरच’ असे फलक लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कसबा पेठेत लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That bjp banner kasba constituency in political excitement pune print news rbk 25 ysh