पुणे : आपल्या नजीकच्या रेल्वे स्थानकांवर गाड्यांना थांबा मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जाते. याचा विचार करून मध्य रेल्वेने बार्शी टाऊन, शेगाव, जलंब, तारगाव, जेऊर, केम आणि माढा या स्थानकांवर काही गाड्यांना प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर हा थांबा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बार्शी स्थानकावर पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेसला उद्यापासून (ता.२६) थांबा देण्यात येईल. शेगाव स्थानकावर पुरी-अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि हुजूर साहिब नांदेड- श्री गंगानगर एक्स्प्रेसला २८ ऑगस्टपासून थांबा असेल. जलंब स्थानकावर मुंबई- हावडा मेलला उद्यापासून आणि सुरत-अमरावती सुपरफास्टला २७ ऑगस्टपासून थांबा असेल.

हेही वाचा – पुण्यातून ५० कोटी रुपयांचे ‘मेथाक्युलोन’ अमली पदार्थ जप्त; महसूल गुप्तचर यंत्रणेची कारवाई

हेही वाचा – २५० कोटी हवेत?…मग ‘हा’ बदल करा; केंद्राचा पुणे महापालिकेला आदेश

तारगाव स्थानकावर मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस यांना उद्यापासून थांबा देण्यात येईल. जेऊर स्थानकावर भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेसला उद्यापासून थांबा असेल. केम स्थानकावर कन्याकुमारी – पुणे एक्स्प्रेसला उद्यापासून थांबा देण्यात येईल. माढा स्थानकावर सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसला उद्यापासून थांबा असेल, असे मध्य रेल्वेने कळविले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trains stop at this stations including barshi and shegaon pune print news stj 05 ssb