Thane station : ठाणे : ट्रान्सहार्बर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ पाॅईंट फेल्युअर झाल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. ठाणे, दिघा, ऐरोली सह महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. ठाणे रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५६ मिनीटांनी वाशीला निघालेली रेल्वेगाडी तुर्भेजवळ आल्यानंतर तिला नेरुळ येथे वळविण्यात आली. त्यामुळे या रेल्वेगाडीतून वाशी, सानपाड्याच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.
नवी मुंबईत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, कारखाने आहेत. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा, मुलुंड, भांडूप भागातील लाखो नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्सहार्बर मार्गे नवी मुंबईत प्रवास करतात. तसेच नवी मुंबईतून ठाणे शहरात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची सकाळी प्रचंड गर्दी होत असते. मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ पाॅईंट फेल्युअर झाला. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला.
यामुळे ठाणे, दिघा, ऐरोलीसह अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. सकाळी गर्दीच्या वेळेत झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही, तर काहींना प्रवासासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
ठाणे रेल्वे स्थानकातून सकाळी ८:५६ वाजता वाशीच्या दिशेने निघालेली लोकल गाडी तुर्भे स्थानकाजवळ आल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे तिला नेरुळ येथे वळविण्यात आली. यामुळे वाशी, सानपाडा आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली. सकाळच्या वेळेत असा बिघाड झाल्याने आमचे नियोजन कोलमडले. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. ठाणे स्थानकावर तर प्रवाशांची गर्दी इतकी वाढली की, पाय ठेवायलाही जागा नव्हती.
या प्रकारामुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. सुमारे १५ ते २० मिनीटांनी येथील पाॅईंट फेल्युअरचा बिघाड दुरुस्त करण्यात आला. परंतु सकाळी १०.३० नंतरही येथील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. वारंवार या घटना घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.