ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद मठाजवळ सोमवारी धुळवड साजरी करण्यात आली. या धुळवडीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर चप्पल घालून होते असे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. या घटनेनंत ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख तथा आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली आहे. म्हस्के यांनी दिघे साहेबांचे, शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यात मोठे कार्य होते. आनंद दिघे हयात असताना त्यांच्या आनंद मठात हजारो नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येत असत. आनंद दिघे हे नागरिकांच्या समस्या सोडवित असत. त्यामुळे आनंद दिघे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आनंद दिघे यांनी ठाण्यात अनेकांना लोकप्रतिनिधी केले, शासकीय नोकऱ्या दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांचे आनंद दिघे हे राजकीय गुरु होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतरही ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता ठाण्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

हेही वाचा…डोंबिवलीत कोयता घेऊन तडीपार गुंडाची दहशत, गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

सध्या आनंद दिघे यांच्या मठात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. सोमवारी आनंद आश्रमासमोर शिंदे गटाने धुळवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आनंद मठातील आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर उभे राहून छायाचित्र काढले. हे छायाचित्र काढताना त्यांनी पायात चप्पल घातली होती असा दावा केला जात आहे. या प्रकारावरून केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा…मेट्रो कामांमुळे घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतुक बदल

आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या फोटो समोर कायम चप्पल घालून रूबाबात उभे असणारे नरेश म्हस्के आणि त्यांच्या साथिदारांना दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीसमोर कसे उभे राहायचे याचे भान नसले तर यांनी दिघे साहेबांचे विचार, शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होत आहे असे केदार दिघे म्हणाले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane kedar dighe allegations on shiv sena s naresh mhaske for wearing slippers in front of anand dighe s photo psg