कल्याण : कल्याण लोकसभेचे शिवसेेनेचे उमेदवार खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालावर महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या यादीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची छबी झळकू लागल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य तर राजकीय पटलावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांच्या कार्यअहवालाचे रविवारी संध्याकाळी पाच वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यअहवालाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावे झळकली आहेत. या यादीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याने महायुतीच्या उमेदवारांना प्रचार फलक, कार्य अहवालांवर राज ठाकरे यांची प्रतिमा छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
महायुतीच्या उमेदवारांना प्रचार फलक, कार्य अहवालांवर राज ठाकरे यांची प्रतिमा छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2024 at 13:26 IST
TOPICSएकनाथ शिंदेEknath ShindeठाणेThaneडॉ. श्रीकांत शिंदेमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj Thackerayलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
+ 2 More
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray s picture on shrikant shinde s work report published by cm eknath shinde in dombivli on sunday css