AI Generated Viral Photos: आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे कलकारांच्या कल्पनांना नवे पंख मिळाले आहेत यात काही शंका नाही. दररोज कित्येक नवनवीन एआय निर्मित फोटो समोर येत असतात. मीडजर्नी हे अॅप वापरून हे फोटो तयार केले जातात. जगभरामध्ये आय कलाकार वेगवेगळे अॅप्सचा वापर करून अफलातून एआय फोटो तयार करत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बॉलीवूड स्टार्स जर महिला असते तर कसे दिसले असते अशी कल्पना करून तयार केलेल एआय फोटो चर्चेत होते तर आता बॉलीवूड स्टार म्हतारपणी कसे दिसतील अशी कल्पना करून तयार केलेले एआय फोटो चर्चेत आहे. यामध्ये रणबीर कपूरपासून शाहरूख खानपर्यंत अनेक बॉलीवूड स्टार्स दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूड स्टार्सचे म्हातारपणी कसे दिसतील?

कलाकार एसके एमडी अबू साहिदने या फोटोमध्ये एक इंस्टाग्राम पेज (@sahixd) वर शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एआय अभिनेत्याला म्हतारापणी लोकांच्या स्वरुपामध्ये कल्पना केली करत आहे. यामध्ये रणबीर कपूरमध्ये शाहरुख खान, ऋतिक रोशन, अल्लू अर्जून, आमिर खान, शाहिद कपूर, प्रभास, महेश बाबू आणि सलमान खान हे स्टार्सला म्हातारपणीचा लूकमध्ये दिसत आहे.

Optical illusions: हवेत उडतोय की पाण्यात तरंगतोय ‘हा’ दगड? फोटो पाहून चक्रावून जाईल तुमचं डोकं

सलमान खानचा म्हातरपणीचा लूक हा त्याच्या भारत चित्रपटासारखाच आहे. तर शाहरुख खानचा ओल्ड मॅन लूक मिड ट्रॅव्हल एआयने तयार केला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या लूकची तुलना पुष्पासोबत केली जात आहे. आमिर खानचा ओल्ड मॅन लूकही चाहत्यांना खूप आवडला आहे.

आमीर

हेही वाचा- Optical illusions: हवेत उडतोय की पाण्यात तरंगतोय ‘हा’ दगड? फोटो पाहून चक्रावून जाईल तुमचं डोकं

यूजर्सला आपल्या आवडत्या स्टार्सचा लूक पाहण्याची उत्सूकता आहे. यामुळेच ते पोस्टवर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने लिहले आहे की, अनिल कपूरबद्दल काय मत आहे. दुसऱ्याने लिहिले की, हे सर्व मिलिंद सोमनप्रमाणे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan to salman khan ai artist re imagines these actors as elderly men seeviral images ai celebs snk