Optical illusions: ऑप्टिकल इल्युजन (Optical illusions) आपल्या आकलन क्षमतेवर परिणाम करतात आणि आपल्याला वास्तविकतेशी सुसंगत नसलेल्या गोष्टी पाहण्यास प्रवृत्त करतात. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन पाहायला मिळतात जे पाहून तुम्ही संभ्रामात पडता. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून लोक चक्रावून जात आहे. दरम्यान ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या फोटोमध्ये फक्त एक दगड दिसत आहे पण हा दगड नक्की पाण्यावर तंरगतोय की हवेत उडतोय हे मात्र लोकांना समजत नाही.

हवेत उडतोय की पाण्यात तरंगतोय हा दगड?

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की हा फोटो एक ऑप्टिकल इल्यूजनचे उदाहरण आहे जे तुमच्या मेंदूमध्ये भ्रम निर्माण करू शकते. पहिल्यांदा पाहिल्यानंतर दगड हवेत उडत असल्यासारखे वाटते. फोटोमध्ये एक मोठा दगड आहे जो हवेमध्ये उडताना दिसत आहे पण खरचं हे सत्य आहे का?

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
How many times we should boil milk know Correct Way To Boil Milk
Milk Boiling Tips: दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळा उकळावे, जाणून घ्या
how to make sabudana papad at home recipe
Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण
viral video of rainbow panipuri
हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”

पोस्ट २२ मार्चला ट्विटवर पोस्ट केली होती तेव्हापासून आतापर्यंत जवळपा, १२.३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे आणि ही संख्या वाढतच आहे. कित्येक लोक कमेंट सेक्आशानामध्ये आपले मत व्यक्त करत आहेत तर काही लोक आपलं संभ्रमात पडले आहे.


हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! झाडांना पाणी घालताना ‘टॉपलेस’ असते ‘ही’ महिला कारण….; लोक म्हणे, ”हा तर पब्लिसिटी स्टंट”

फोटो पाहून संभ्रमात पडले लोक

एकाने सांगितले की, खूप वेळी निरीक्षण केल्यानंतर दगड हवेत उडत नाही तर पाण्याच तरंगत असल्याचे समजते. दुसऱ्याने सांगितले की, मला थोडावेळ टक लावून पाहावे लागले. तिसऱ्याने म्हटले, आणि पुन्हा पाण्यात तंरगणारा दगड. चौथा म्हणाला, मला दिसलेला एक मात्र हिंट म्हणजे दगडावर असलेली एक रेष जो पाण्यात दगड असल्याचे दर्शवते.