मुंबई लोकल म्हणजे मुंबईकराची जीवनवाहिनी. मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात लोकलचा लेडीज डब्याची गोष्टच निराळी. या लेडीज डब्यात अनेकदा भांडण होतात, वाद होतात, पण तेवढाच जिव्हाळा आणि प्रेमही असतं. या रोजच्या प्रवासात त्या एकमेकींना ओळखू लागतात. त्यांची मैत्री होते, तसेच त्यांच्या आयुष्यातील सुख दुखाचे क्षण एकमेकांबरोबर त्या शेअर करतात. अशातच नुकताच मकरसंक्रातीचा सण पार पडला. यानिमित्ताने सौभाग्यवती महिला हळदीकुंकू समारंभ साजरा करतात. सध्या असाच हळदीकुंकू समारंभ एका रेल्वेमध्ये पार पडलाय, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका रेल्वेस्थानकात काही महिला ट्रेनजवळ जमा झाल्या आहेत. तसंच एक महिला तर या ट्रेनवर चढलेली दिसतेय. ट्रेनच्या लोको पायलटच्या केबिनच्या बाहेरच्या बाजूला ही महिला उभी राहून एक पोस्टर चिटकवताना दिसतेय. या पोस्टरवर “सुस्वागतम, हळदी कुंकु समारंभ विरार चर्चगेट ट्रेन” असं लिहिण्यात आलं आहे.यावरून कळतंय की या महिला चक्क मुंबई लोकलमध्ये हळदीकुंकु साजरा करणार आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @explorewith_kirti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “असले बोर्ड लावायला या ट्रेनवर चढतील, पण घरात पंखा पुसायचा असेल तर नवऱ्यालाच टेबलावर चढवणार” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “१५०० रुपयांचा परिणाम बाकी काही नाही…, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, काही बोलू नका” तर दुसऱ्याने “मनातलं बोललात राव” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या बायकांना या ट्रेनमध्ये जागा मिळेल का”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women placed poster on virar churchgate local for haldi kunku event pati viral on social media dvr