भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी एकदिवसीय अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे. भारतीय संघाच्या विजयासाठी प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपनेही भारतीय संघाला विजयासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच आता काँग्रेस नेत्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक काँग्रेस नेते एकत्र बसून भारत- ऑस्ट्रेलिया संघाच्या लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

नवी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात एका भल्या मोठ्या स्क्रीनसमोर अनेक काँग्रेस नेते भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाच्या लाईव्ह सामना पाहण्यात व्यस्त आहेत. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचे दिसत आहेत. काँग्रेसच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या वर कॅप्शनमध्ये लिहिलं की, “इंडियाच जिंकणार…”

भाजपा आणि काँग्रेसमध्ये ‘एक्स’ अकाउंटवर टोलेबाजी

भाजपानं भारतीय संघाला शुभेच्छा देणारी पोस्ट ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये भाजपने “कम ऑन टीम इंडिया!” असे लिहिले होते. यानंतर काँग्रेसनेही तिच पोस्ट पुन्हा रिट्वीट करत “खरं बोललात! इंडियाच जिंकणार..” अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. याच ट्वीटवर युजर्सनेही मजेशीर अशा कंमेट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 jeetega india congress leaders enjoy india australia cwc 2023 final match in new delhi aicc congrees headquarters sjr