Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना शेअर मार्केटमध्ये सकारात्मक चित्र पहायला मिळाले. अदाणी समूहावर झालेल्या आरोपामुळे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये मरगळ आली होती. आज बुधवारी सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांत ६० हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स थोड्यावेळापूर्वी ६० हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची वाढ पाहायला मिळालेली आहे. निर्मला सीतारमन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या १० मिनिटांत ६०० अकांनी सेन्सेक्सची उसळी पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> Union Budget 2023 Live Updates:करदात्यांसाठी अर्थसंकल्पात दिलासा की चिंता? काय स्वस्त, काय महागणार?

निफ्टी देखील एक टक्क्याने वाढला. सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये १३८ अंकाची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या निफ्टी १७,८०१ वर पोहोचला आहे. सर्वच सेक्टरच्या शेअर्ससमोर आज हिरवा रंग दिसत आहे. सकाळी ११.३० वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या भाषणात भांडवली गुंतवणूक ३३ टक्के वाढून १० लाख कोटी झाल्याचे सांगितले. जीडीपीच्या एकूण ३.३ टक्के एवढी ही गुंतवणूक आहे.

हे वाचा >> डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्टअप्सना प्रोत्साहन अन् बरंच काही; अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी काय तरतूद? जाणून घ्या

अर्थसंकल्पाच्या दिवशी कशी असते मार्केटची अवस्था

२०१३ पासूनचा मार्केट ट्रेंड पाहिला तर लक्षात येथे की मागच्या १० पूर्ण अर्थसंकल्पातून (निवडणुकांच्या वर्षातले अर्थसंकल्प अर्धे असतात) सहा वेळा सेन्सेक्समध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. तर सहा वेळा सेन्सेक्स कोसळला होता. २०२० मध्ये सेन्सेक्समध्ये २.४ टक्क्यांची घसरण झाली होती.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget day stock market prediction know the mood of share market on budget day kvg