India Budget 2023-24 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता.
या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे.
Budget 2023 Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच, आता आमदार बच्चू कडू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावरून एक मोठं विधान केलं आहे. अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार आहे, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून अभिनंदन करतो.” जाणून घ्या याशिवाय आणखी काय म्हणाले आहेत. वाचा सविस्तर बातमी..
आज निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे..
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला झुकतं माप द्यायला हवं होतं. पण तसं ते दिलेलं नाही. हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. ९ राज्यांमधल्या निवडणुका समोर ठेवून त्या त्या राज्यांना थोडं अधिकचं देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे – अजित पवार
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1620754003129954306
भारताचं लक्ष अर्थसंकल्पावर होतं. पण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चुनावी जुमला असा हा अर्थसंकल्प आहे. वेलफेअर स्टेटची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काळाचं वेष्टन लावून मूळ प्रश्नाला बगल देणारा हा अर्थसंकल्प आहे – अजित पवार
निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प करायचा नाही का? अर्थसंकल्प दरवर्षी सादर होतो. विरोधी पक्षांनी खरंतर याचं स्वागत करायला हवं. रेल्वेला मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. २०१३ पासून आत्तापर्यंत रेल्वेसाठी ९ पटींनी निधी वाढवला आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पर्यावरणाचा समतोल, अपारंपरिक ऊर्जा यांना प्रोत्साहन देण्यात इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात ईव्ही हा महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या राज्यात त्या आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हा सगळ्यांना दिलासा देणारा चांगला अर्थसंकल्प आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हा अर्थसकल्प म्हणजे गणितीय आधारावर मोदी सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब आहे. हे फक्त काही राज्यांचंच बजेट वाटतंय. आम्हाला १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसूट मिळण्याची अपेक्षा होती. तेलंगणामध्ये आम्ही लोकांना चांगले पगार देतो. त्यामुळे सध्या जाहीर झालेली करसूट आम्हाला उपयोगी नाही – कविता कल्वाकुंतल, बीआरएस नेत्या
केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्द अर्थमंत्र्यांनी काढला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, अशी घोणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. सविस्तर वृत्त वाचा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ( १ जानेवारी ) २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार २.० चा अखेरचा आणि सीतारमण यांचा पाचवा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी निर्मला सीतारमण यांनी सात प्राथमिकता सांगितल्या आहेत. त्याला ‘सप्तर्षी’ असं नाव दिलं आहे. याच ‘सप्तर्षी’वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांचा दाखला देत टोला लगावला आहे.
विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?
मी देशवासीयांना आवाहन करतो की या, एक नवा अर्थसंकल्प तुमच्यासमोर आहे. नवा संकल्प घेऊन वाटचाल करुया. २०४७ मध्ये प्रत्येत अर्थाने संपन्न भारत आपण बनवुया, चला, या यात्रेला आपण पुढे चालवू – नरेंद्र मोदी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
हा अर्थसंकल्प शाश्वत विकासासाठी हरित विकासाला एक अभूतपूर्व पाठबळ देईल – नरेंद्र मोदी
भारतातील महिलांचं आयुष्य सोपं करण्यासाठी गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक पावलं उचलली. यासह महिला बचत गट हे एक सामर्थ्यशाली क्षेत्र भारतात पसरू लागलं आहे. त्यांना थोडंसं पाठबळ मिळालं, तर त्या जादू करून दाखवू शकतात. त्यामुळे महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात नवी तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी विशेष बचत योजना सुरू केली जात आहे. या योजनेमुळे सामान्य महिलांना मोठी ताकद मिळणार आहे – मोदी
मी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या टीमला या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी शुभेच्छा देतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पूर्णपणे आयात केलेल्या आलिशान कार आणि इलेक्ट्रिक गाड्या महागणार असल्याचं आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे. या गोष्टींवरील कस्टम ड्युटीमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे.
गेल्या ८-९ वर्षांपासून येणाऱ्या अर्थसंकल्पांसारखाच हा अर्थसंकल्पही आहे. करांमध्ये वाढ, कल्याणकारी योजना आणि अनुदानावर खर्च न होणं हे दिसून येतंय. मोठ्या उद्योगपतींसाठी कर गोळा केला जातो आहे – मेहबूबा मुफ्ती
विरोधकांनी सकाळीच ठरवलं होतं की अर्थसंकल्प कसाही असला, तरी त्यावर टीकाच करायची. त्यांनी अर्थसंकल्प बघितलाही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही – देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारांना केंद्राकडून विनाव्याज ५० वर्षांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आणखीन एक वर्ष चालूच ठेवण्याचा निर्णय केंद्रानं घेतल्याचं अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये संरक्षण खात्यासाठी ५.९४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आयकराच्या संदर्भात मध्यमवर्गीयांची इच्छापूर्ती करणारं हे बजेट आहे. करमर्यादा वाढवण्यात आली आहे. तरुणांसाठी केलेल्या वेगवेगळ्या घोषणा रोजगारनिर्मिती करणाऱ्या आहेत. लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट सिस्टिमचा दुसरा टप्पा आणला आहे. त्यात अशा उद्योगांना २ लाख कोटींची गॅरंटी सरकार देणार आहे. त्याच्या व्याजगरात १ टक्का कपात केली जाणार आहे. – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रासाठी सहकार क्षेत्राला या अर्थसंकल्पाने महत्त्व दिलं आहे. ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्या पतसंस्थांना मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय. अर्थात, गावपातळीवर आता सहकार मजबूत होणार आहे. २० प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आता प्राथमिकता मिळणार आहे. स्थानिक स्तरावर त्यातून रोजगार वाढणार आहे. महाराष्ट्राच्या आणि विशेषत: साखर धंद्याच्या दृष्टीने नवीन कुठली गोष्ट असेल तर २०१६ च्या आधीच्या इन्कम टॅक्सबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. २०१६पूर्वीचं एफआरपीचं पेमेंट एक्स्पेंडिचर धरण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे त्याच्यावर इन्कम टॅक्स लागणार नाही – देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. कारण, २०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वाचं लक्ष लागून होतं. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी केली.
पायाभूत सुविधांवरील १० लाख कोटींची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारी आहे. २७ कोटी लोक इपीएफओच्या अंतर्गत येणं ही गेल्या ८ वर्षांत वाढलेल्या रोजगाराचीच द्योतक बाब आहे – देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराने स्वागत केल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी १ वाजता सेन्सेक्समध्ये १००० हजार अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ६०,५५० पर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीत जवळपास २२५ अंकाची वाढ होऊन १७,९०० च्या पुढे निफ्टी पोहोचला होता. सविस्तर बातमी वाचा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृतकाळातील सर्वजनहिताय या संकल्पनेवर आधारित आहे. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे. विशेषत: पुढच्या २५ वर्षांत आपण म्हणत असलेल्या विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवलाय – देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. पण या अर्थसंकल्पात मनरेगा योजनेचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. शिवाय ग्रामीण भागातील गरीब मजूर, रोजगार आणि महागाईबाबत यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिले आहेत – काँग्रेस खासदार शशी थरूर
Budget 2023: नव्या करश्रेणीत मोठे बदल
नव्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यानुसार..
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के
अर्थसंकल्प म्हणजे भविष्यात आपण काय करणार आहोत हे सांगणारं वास्तव आहे. आर्थिक मंदीशी भारत कसा लढेल, ही निर्मल आशाही धुळीस मिळाली आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांना काही मिळेल असं काही चित्र नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी अर्थसंकल्प बघतोय. अर्थसंकल्प म्हणजे फक्त फुगवलेले आकडे असतात. ज्या प्रकारे जीडीपी मॅनेज करतायत, ते पाहता या फुगवलेल्या फुग्यांमध्ये काहीच नाही हे दिसतंय – जितेंद्र आव्हाड
विरोधकांकडून बजेटबद्दल चांगलं बोलण्याची अपेक्षा नव्हती. अर्थमंत्र्यांनी सगळ्यात मोठा दिलासा कररचनेत वाढवण्यात आलेल्या स्लॅबच्या रुपाने मिळाला आहे. हे वाचणारे पैसे बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून येतील. यातून देशाचा आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे – सुजय विखे पाटील
अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्सची ११७२ अंशांनी उसळी, थेट ६० हजार ७२२ वर पोहोचला!
समाजिकदृष्ट्या मागास आदिवासी जमातींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी PMPBTG Development Mission ची घोषणा. पुढच्या तीन वर्षांत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १५ हजार कोटींची तरतूद!
पॅनकार्डचा वापर सरकारी कार्यालयांमध्ये कॉमन आयडी अर्थात एकल ओळखपत्र म्हणून केला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
निर्मला सीतारमण यांनी पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे. रस्ते बांधणीमध्ये आम्ही केलेला निर्धार त्यामुळे पूर्ण करण्यास मदत होणार आहे – नितीन गडकरी
मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा झाली आहे. मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम अर्थसंकल्पात झालं आहे – विनायक राऊत, ठाकरे गटाचे खासदार
देशात फार मोठ्या उद्योगपतींना मोठी सूट मिळाली आहे. रेल्वेमधली खासगी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? याचे सूतोवाच होणं गरजेचं होतं. काही चांगल्या गोष्टी आहेतच. पण याआधी झालेल्या घोषणांचं नेमकं काय झालं? याचा उल्लेख असता, तर चांगलं झालं असतं – अमोल कोल्हे
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या योजनांचं फलित काय आहे? हे या अर्थसंकल्पात दिसत नाही – सुनील तटकरे
करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स अर्थात करपरतावा सादर केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याचा कालावधी ९३ दिवसांवरून थेट १६ दिवसांवर आला आहे.
देशातील भारतीयांचं वार्षिक सरासरी उत्पन्न आता १ लाख ९७ हजार रुपयांपर्यं वाढल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जॉइंट अकाऊंट होल्डर्ससाठी असणाऱ्या मासिक उत्पन्न योजनेची मर्यादा ९ लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Budget 2023-24: ‘या’ टिप्सच्या मदतीने एका क्लिकवर पाहा ‘पेपरलेस बजेट’
१ फेब्रुवारी २०२३ ला सादर होणारे वर्ष २०२३-२४ चे वार्षिक अर्थसंकल्प तुम्हाला अगदी सहज आपल्या मोबाईलवरही पाहता येईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२३-२४ जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ९८० अंकांनी वधारला आहे.
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना चुकल्या आणि संसदेत एकच हशा पिकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनाही हसू अनावर झालं. मात्र, आपली चूक झाल्याचं निर्मला सीतारमण यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्याही हसल्या. त्यानंतर त्यांनी सभागृहात माफी मागत भाषणात दुरुस्ती केली. त्या बुधवारी (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना संसदेत बोलत होत्या.
सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा!
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ लाइव्ह अपडेट
Budget 2023 Live Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट