Maharashtra Board SSC Result 2024 at mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज (२७ मे) इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करणार आहे. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग व लिंगनिहाय निकाल असे तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केले जातील तर एसएससी निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय होईल. एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता 10वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात - mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात. हे ही वाचा<< Maharashtra SSC Result 2024: १० वीचा निकाल २७ मे ला, गतवर्षाच्या रेकॉर्ड्सची आकडेवारी पाहा, निकाल जाहीर होताच इथे थेट पाहा गुण? दहावीच्या निकालाची गेल्या वर्षीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३. ८३ टक्के नोंदवली गेली होती, २०२२ च्या तुलनेत मागील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का ३.१८ ने घसरला होता. यंदा बारावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशीच प्रगती दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबत सुद्धा दिसणार का हे आता काहीच तासात उघड होणार आहे.दहावीच्या निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स सहज मिळवण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा. दहावीच्या सर्व विद्यार्थी व पालकांना लोकसत्ता टीमकडून सुद्धा शुभेच्छा!