PM Narendra Modi Speech : गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत असंतोष व हिंसाचाराच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी अद्याप संसदेत भूमिका न मांडल्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या भाषणांमध्ये मोदींवर अनेक आरोप व टीका-टिप्पणी झाल्यानंतर पंतप्रधानांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

अखेर आज हे पंतप्रधानांच्या उत्तराचा संसदेच्या कामकाज पत्रिकेत समावेश करण्यात आला.

Live Updates

PM Modi No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेत भाषण…

19:31 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech: मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया…

मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया…

19:26 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव लाइव्ह

आवाजी मतदानाच्या माध्यमातून मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला…

19:25 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

या देशात मणिपूरपेक्षा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पण आपण एकत्र मिळून त्या समस्यांमधून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून चालूयात आणि मणिपूरच्या लोकांना विश्वास देऊयात. राजकारणाचा खेळ करण्यासाठी मणिपूरच्या भूमिचा वापर करू नका. सत्ताधारी बाकांवरून या मुद्द्यावर समृद्ध चर्चा झाली – मोदी

19:13 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मी विरोधकांचं एका गोष्टीसाठी कौतुक करेन, की २०१८ मध्ये मी त्यांना सांगितलं होतं की २०२३मध्ये अविश्वास ठराव आणा. माझं त्यांनी ऐकलं आणि अविश्वास ठराव आणला. पण तयारी केली नाही. देशाला त्यांनी काही निराश केलं. हरकत नाही, २०२८ मध्ये पुन्हा ते अविश्वास प्रस्ताव आणतील. पण अपेक्षा आहे की २०२८मध्ये तयारीनिशी अविश्वास ठराव आणतील. जनतेला किमान इतका तरी विश्वास वाटावा की हे किमान विरोधी पक्षाच्या लायकीचे तरी आहेत. आरडा-ओरडा करण्यासाठी त्यांना १०-१५ लोक मिळतीलही. पण थोडं डोक्याचंही काम त्यांनी करावं – मोदी

19:10 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

शरीराचा कण कण, वेळेचा प्रत्येक क्षण फक्त देशवासीयांसाठी देईन – मोदी

19:08 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आमच्या सरकारने नॉर्थ-इस्टच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे – मोदी

19:02 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आज मणिपूरच्या समस्यांना असं दाखवलं जातंय की जणूकाही गेल्या काही दिवसांमध्येच या समस्या निर्माण झाल्या आहेत. तिथल्या समस्यांची कुणी जननी असेल, तर ती काँग्रेस आहे. त्यांचं राजकारण यासाठी जबाबदार आहे – मोदी

https://twitter.com/ANI/status/1689634213992275969

19:00 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

तीन प्रसंग..

पहिली घटना.. ५ मार्च १९६६.. या दिवशी काँग्रेसनं मिझोराममध्ये असहाय नागरिकांवर वायूसेनेच्या माध्यमातून हल्ला केला होता. तेव्हा मोठा वाद झाला होता. काँग्रेसवाल्यांनी सांगावं की ती दुसऱ्या देशाची वायूसेना होती का? मिझोराममधले नागरिक दुसऱ्या देशाचे होते का? आजही मिझोराममध्ये ५ मार्चला शोक व्यक्त केला जातो. काँग्रेसनं हे सत्य देशापासून लपवून ठेवलं आहे. आपल्याच देशात वायुसेनेच्या माध्यमातून हल्ला करवला.

दुसरा प्रसंग…

१९६२ चं ते रेडिओ प्रक्षेपण अजूनही त्रिशूळाप्रमाणे लोकांना टोचतंय. नेहरूंनी १९६२ साली देशावर चीनचा हल्ला झाला होता, रेडिओवर सांगितलं की माझं मन आसामच्या लोकांसाठी पिळवटून निघतंय. ते प्रक्षेपण आजही आसामच्या लोकांना टोचणी देतंय.

जे लोक स्वत:ला लोहियांचा वारस समजतात, काल सभागृहात उठून बोलत होते, लोहियांनी नेहरूंवर गंभीर आरोप केला होता. लोहियांनी सांगितलं होतं की जाणून बुजून नेहरू पूर्वेकडच्या राज्यांचा विकास करत नाहीत. ये कितनी लापरवाहीवाली और कितनी खतरनाक बात है, तीस हजार स्क्वेअर मीलसे ज्यादा क्षेत्रको हर तरहके विकास से वंचित कर दिया गया है. लोहियाजी असं म्हणाले होते.

18:52 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

कच्छुतिवु काय आहे? तमिळानाडूच्या पुढे एक बेट कुणी कुठल्या देशाला देऊन टाकलं होतं. काय झालं होतं तेव्हा? तेही तुम्ही तोडलं. कोण होतं तेव्हा? इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली हे झालं होतं. काँग्रेसचा इतिहास भारत मातेला छिन्नविच्छिन्न करण्याचा राहिला आहे – मोदी

18:48 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

सभागृहात भारत मातेविषयी जे बोललं गेलं, त्यामुळे भारतीयांचं मन दुखावलं आहे. मला माहिती नाही, पण सत्तेशिवाय कुणाची अशी स्थिती होते? सत्तशिवाय जगू शकत नाहीत. काय भाषा वापरत आहेत हे. काही लोक भारत मातेच्या मृत्यूची इच्छा व्यक्त कर आहेत. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल. हे लोक कधी लोकशाहीच्या हत्येबाबत बोलतात, कधी संविधानाच्या हत्येबाबत बोलतात. जे यांच्या मनात आहे, तेच त्यांच्या कृतीतून समोर येत आहे – मोदी

18:47 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता-भगिनींना सांगू इच्छितो की देश तुमच्यासोबत आहे. हे सभागृह तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून या संकटावर तोडगा काढू. तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. मणिपूर पुन्हा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही – मोदी

18:45 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. तिथे काय होतंय हे आपल्याला माहिती आहे. तिथे जी परिस्थिती निर्माण झाली, हिंसाचार उसळला, त्यात अनेक कुटुंबांना त्रास झाला. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. महिलांबाबत गंभीर अपराध झाले. हे अपराध अक्षम्य आहेत. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून प्रयत्न करत आहे. देशाच्या सर्व नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मणिपूर पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासानिशी पुढे जाईल – मोदी

18:44 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मणिपूरच्या स्थितीवर अमित शाहांनी बुधवारी दोन तास सविस्तर माहिती दिली. सरकारची चिंता व्यक्त केली. त्यातून जनतेला जागृत करण्याचाही प्रयत्नही होता. मणिपूरपर्यंत एक संदेश पोहोचवण्याचाही प्रयत्न होता. मणिपूरच्या समस्येवर मार्ग शोधण्याचा तो प्रयत्न होता. पण राजकारणाशिवाय काही करायचयं नाही म्हणून विरोधकांनी हे सगळं केलं – मोदी

18:43 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आम्ही म्हटलं होतं की फक्त मणिपूरवर चर्चा करू. पण त्यांच्यात साहस नव्हतं, इच्छा नव्हती, पोटात पाप होतं. दुखत पोटात होतं आणि फोडत होते डोकं – मोदी

18:42 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अमित शाहांनी मणिपूरबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर या लोकांनी काय काय खोटं पसरवलं होतं, ते सगळ्यांना समजलं – मोदी

18:41 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मणिपूरवर बोलण्याची मागणी करत विरोधकांनी मोदींचं भाषण चालू असतानाच सभात्याग केला…

18:40 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

तिसऱ्या टर्ममध्ये मी देशाला टॉप तीनमध्ये आणून दाखवेन ही माझी देशाला गॅरंटी आहे – मोदी

18:33 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काँग्रेस कित्येक वर्षांपासून एकच उत्पादन लाँच करतात, पण प्रत्येक वेळी लाँचिंग अपयशी होतं. मग हे जनतेवर राग काढतात. पण पीआरची लोकं मोहोब्बत की दुकान चा प्रचार करते. त्यामुळे जनता म्हणते ये है लूट की दुकान, झूठ का बाजार, इसमें नफरत है, घोटाले है, तुष्टीकरण है, मन काले है, परिवारवाद की आग के दशकों से देश हवाले है.. तुम्हारी दुकान ने इमर्जन्सी बेची है, बटवारा बेचा है, सीखों पर अत्याचार बेचा है, झूठ कितना सारा बेचा है, इतिहास बेचा है, पुरी के सच का प्रमाण बेचा है, शर्म करो नफरत की दुकान वालों, तुमने सेना का इमान बेचा है – मोदी

18:30 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काल इथे मनापासून बोलण्याबाबत बोललं गेलं. त्यांच्या डोक्याची स्थिती तर देशाला बऱ्याच काळापासून माहिती आहे. आता त्याच्या हृदयाबाबतही समजलं. यांचं मोदीप्रेम एवढं आहे की २४ तास त्यांना स्वप्नात मोदी दिसतात. मोदी भाषण चालू असताना पाणीही प्यायले, तरी ते म्हणतात बघा मोदींना पाणी पाजलं. मी उन्हात चेहऱ्यावरचा घाम पुसला, तर म्हणतात बघा मोदींना घाम फोडला. यांचा जगण्याचा आधार बघा. डुबने वाले को तिनके का सहाराही बहोत, दिल बहल जाए, फकत इतना इशाराही बहोत, इतने परभी आसमाँ वाला गिरा दे बिजलियाँ, कोई बतला दे जरा, ये डुबता फिर क्या करें – मोदी

18:25 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

लंका हनुमानानं नाही, त्यांच्या गर्वानं जाळली. हे सत्य आहे. जनता भगवान रामाच्या रुपात आहे. त्यामुळेच ४०० वरून ४० झाले – मोदी

18:17 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

ही इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचं आहे. त्यांनी हाही विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलसोबत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. दिल्लीत एकत्र आहात – मोदी

18:15 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मतदारांना भुलवण्यासाठी गांधी नावही त्यांनी चोरून घेतलं. काँग्रेसची निवडणूक चिन्ह दोन बैल, गाय-बछडा आणि नंतर हाताचा पंजा हे सगळे त्यांच्या वृत्तीलाच दाखवतं. सगळं एका परिवाराच्या हातात केंद्रीत झाल्याचंच हे दर्शवत आहे – मोदी

18:14 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काँग्रेसशी जोडलेली कोणतीच गोष्ट त्यांची नाही. निवडणूक चिन्हापासून विचारांपर्यंत सर्वकाही काँग्रेस त्यांचं असल्याचा दावा करतेय. पण ते इतर कुणाकडून घेतलं गेलंय. आपल्या कमतरतांना झाकण्यासाठी निवडणूक चिन्ह व विचारही चोरले. पण तरी झालेल्या बदलांमध्ये पुन्हा पक्षाचा गर्वच दिसतो. २०१४पासून ते नकाराच्याच भूमिकेत आहेत. पक्षाचे संस्थापक ह्यूम विदेशी होते. १९२० मध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला नवा ध्वज मिळाला, नवी ऊर्जा मिळाली. पण रातोरात काँग्रेसनं तो ध्वजही हिसकून घेतला. १९२० पासून हा खेळ चाललाय – मोदी

18:12 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधकांचं नामप्रेम आजचं नाही, अनेक दशकांपासूनचं आहे. त्यांना वाटतं नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरिबाला चहूबाजूला त्यांचं नाव दिसतं, पण त्यांचं काम कुठे दिसत नाही. रुग्णालयात नावं त्यांची आहेत, पण उपचार नाहीत. शिक्षण संस्था, रस्ते, उद्याने, योजना, क्रीडा पुरस्कार, विमानतळे, संग्रहालये यांना त्यांची नावं आहेत. पण त्या योजनांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. समाजाच्या शेवटच्या स्तरावर उभा व्यक्ती काम होताना पाहू इच्छितो. पण त्याला फक्त या कुटुंबाचं नाव मिळालं – मोदी

18:08 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

यांची समस्या ही आहे की स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी यांना एनडीएचाच आधार घ्यावा लागला आहे. पण सवयीनुसार गर्वाचा आय यांना सोडत नाही. त्यामुळे एनडीएमध्ये गर्वाचे दोन आय टाकले. पहिला आय २६ पक्षांचा गर्व, दुसरा आय एका कुटुंबाचा गर्व. एनडीएही चोरला आणि इंडियाचेही तुकडे केले – मोदी

18:07 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

दोन महिन्यांपूर्वीच तुम्ही यूपीएचे अंत्यविधी केले आहेत. शिष्टाचारानुसार मी तेव्हाच तुम्हाला सहानुभूती व्यक्त करायला हवी होती. पण उशीर झाला यात माझी चूक नाहीये. कारण तुम्ही स्वत:च एकीकडे यूपीएचे अंंत्यविधी करत होतात आणि दुसरीकडे जल्लोषही करत होते. जल्लोष कशाचा? उजाड भिंतींवर नवीन प्लास्टर लावण्याचा. तुम्ही जल्लोष करत होता खराब यंत्रावर नवीन पेंट लावण्याचा. मला आश्चर्य वाटत होतं की ही आघाडी घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? मी विरोघकांना सांगेन की तुम्ही ज्यांच्या मागे चालत आहात, त्याला तर या देशाची भाषा, देशाच्या संस्कारांची समजच नाहीये. अनेक पिढ्यांपासून हे लोक लाल मिर्ची आणि हिरव्या मिर्चीमधला फरक समजू शकत नाहीयेत. वेश बदलून दगा करणाऱ्यांचं सत्य समोर येतंच. ज्यांना फक्त नावाचाच आधार आहे, त्यांच्यासाठी म्हटलं गेलं आहे.. दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर, भाग्यचंद की आजतक सोयी है तकदीर – मोदी

17:58 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

वी वाँट मणिपूर… मणिपूर, मणिपूर… मोदींच्या भाषणावर विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

17:57 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मोदी काय निवडणुकीचा प्रचार करत आहेत का? – मोदींच्या टीकेवर विरोधकांनी आरडा-ओरडा करत व्यक्त केली नाराजी

17:55 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काँग्रेस पक्षाला कधीच भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. पाकिस्तान सीमेवर हल्ले करत होता. दहशतवादी हल्ले होत होते. नंतर जबाबदारी झटकत होता. यांचं पाकिस्तानशी प्रेम होतं की ते लगेच पाकिस्तानवर विश्वास बसायचा. हे तर म्हणायचे की पाकिस्तान सांगत आहे तर खरंच सांगत असेल – मोदी

17:51 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

२०२८मध्ये जेव्हा विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणेल, तेव्हा हा देश पहिल्या तीन देशांमध्ये असेल हा विश्वास आहे – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. (Photo – PTI)

PM Modi No Confidence Motion Live: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचं उत्तर