PM Narendra Modi Speech : गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत असंतोष व हिंसाचाराच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी अद्याप संसदेत भूमिका न मांडल्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या भाषणांमध्ये मोदींवर अनेक आरोप व टीका-टिप्पणी झाल्यानंतर पंतप्रधानांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

अखेर आज हे पंतप्रधानांच्या उत्तराचा संसदेच्या कामकाज पत्रिकेत समावेश करण्यात आला.

Live Updates

PM Modi No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेत भाषण…

17:50 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

यामुळेच काँग्रेसच्या सत्ताकाळात भारतात गरिबी वाढतच गेली. १९९१ मध्ये देश कंगाल व्हायच्या स्थितीत होता. काँग्रेसच्या शासनकाळात अर्थव्यवस्था जगात १०-११-१२ व्या क्रमांकावर होती. २०१४नंतर भारतानं पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. काँग्रेसच्या लोकांना हे वाटत असेल की हे जादूच्या कांडीनं झालंय. पण निश्चित नियोजन आणि कठोर मेहनतीच्या जोरावर देश इथवर पोहोचला आहे – मोदी

17:48 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आम्ही म्हटलं होतं की आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल. जेव्हा आम्ही हा दावा करतो, तेव्हा एक जबाबदार विरोधी पक्ष काय करेल, ते प्रश्न करतात की तुम्ही हे कसं करणार आहात? पण आता हेही मलाच शिकवावं लागतंय. त्यांनी काही सल्ला दिला असता. पण विरोधी पक्षांची समस्या ही आहे, काँग्रेसचे लोक काय म्हणतात.. किती हे कल्पना दारिद्र्य आहे. हे म्हणतात, या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी काही करायची गरजच नाही. असेच तिसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचून जाऊ. कदाचित त्यामुळेच ते इतकी वर्षं शांत बसले होते. याचा अर्थ काँग्रेसकडे ना नीती आहे, ना व्हिजन आहे – मोदी

17:45 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

हे लोक देशाच्या ज्या संस्थां रसातळाला जाण्याचे दावे करतात, त्या संस्थांचं भाग्य उजळून निघतं. हे लोक ज्या पद्धतीने देशाबद्दल बोलत आहेत, मला विश्वास आहे की देशाचंही भलंच होणार आहे. आमचं तर होणारच आहे – मोदी

17:44 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

त्यासाठी मी तीन उदाहरणं देईन. एकतर त्यांनी म्हटलं होतं बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त होऊन जाईल. मोठमोठ्या तज्ज्ञांना विदेशातून आणून त्यांच्याकडून हे बोलून घेत होते. पण आपल्या सार्वजनिक बँकांचा निव्वळ नफा दुप्पट झाला. त्यांनी फोन बँकिंग घोटाळ्याचा उल्लेख केला. पण एनपीए पूर्ण कमी करून नव्या दिशेनं वाटचाल सुरू केलं आहे.

दुसरं उदाहरण … एचएएलवर बऱ्याच वाईट गोष्टी हे बोलले. एचएएल उद्ध्वस्त झालंय असं सांगितलं गेलं. आजकाल शेतांमध्ये जाऊन व्हिडीओ शूट केले जातात. तसेच त्या वेळी एचएएल कंपनीच्या दरवाज्यावर कामगारांची सभा घेऊन व्हिडीओ शूट केला होता. कामगारांना भडकवण्यात आलं होतं. पण आज HAL यशस्वी आहे.

तिसरं उदाहरण – एलआयसीबाबतही असेच दावे केले गेले. पण आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्यांना हा गुरुमंत्र आहे. ज्या सरकारी कंपनीवर विरोधक आरोप करतील, त्यात तुम्ही गुंतवणूक करून टाका

17:39 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आज मी सभागृहात काही गुपितं सांगू इच्छितो. माझा विश्वास बसलाय की विरोधी पक्षाच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळालं आहे. हे लोक ज्याचं वाईट चिंततील, त्याचं चांगलंच होईल. एक उदाहरण तर तुमच्यासमोर उभं आहे. २० वर्षं झाली. काय काय केलं नाही. पण माझं भलंच होत गेलं. त्यामुळे विरोधकांना हे गुप्त वरदान आहे – मोदी

17:37 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

गेल्या तीन दिवसांत विरोधी पक्षांनी डिक्शनरी शोधून शोधून जेवढे अपशब्द सापडतील, ते बोलले. त्यांच्यासाठी सर्वात आवडती घोषणा आहे मोदी तेरी कब्र खुदेगी. पण माझ्यासाठी यांच्या अपशब्दांचंही मी टॉनिक बनवून घेतो – मोदी

17:36 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अविश्वास आणि गर्व विरोधकांच्या नसानसांत भिनला आहे. ते जनतेच्या विश्वासाला कधी बघूच शकत नाहीत. जुन्या विचारांचे लोक म्हणतात की जेव्हा काही शुभ होत असतं, घरात काही चांगलं होतं, मुलं चांगले कपडे घालतात तेव्हा काळं तीट लावतात. आज देशाचं चहूबाजूंनी चांगलं होत आहे, कौतुक होतंय तर मी विरोधकांचे आभार मानतो की काळे कपडे घालून काळ्या तीटाच्या रुपाने सभागृहात येऊन तुम्ही या चांगल्या गोष्टींना अजून चांगलं केलंय. त्यासाठी त्यांचे धन्यवाद करतो – मोदी

17:30 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे – मोदी

17:29 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आम्ही भारताच्या तरुणांना घोटाळे नसणारं सरकार दिलं आहे. भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली आहे, प्रोत्साहन दिलं आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली आहे. अजूनही काही लोक प्रयत्न करत आहेत की जगात आपल्या प्रतिमेवर डाग लागावा. पण जगाचा विश्वास वाढत चालला आहे – मोदी

17:23 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

यावेळी अधीर बाबूंची काय अवस्था झाली. त्यांच्या पक्षानं त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. काल अमित शाहांनी फार जबाबदारीने सांगितलं की चांगलं वाटत नाहीये. अध्यक्षांनी उदार होऊन वेळ संपली तरी वेळ वाढवून दिली. पण गुळाचं शेण कसं करायचं यात हे तरबेज आहेत. मला माहिती नाही की तुमचा नाईलाज काय आहे? अधीर रंजन चौधरींना का बाजूला केलंय. कोलकात्याहून कुठला फोन आला आहे का कुणास ठाऊक. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करते. कधी निवडणुकीच्या नावावर त्याना अनिश्चित काळापर्यंत गटनेते पदावरून हटवतात. आमच्या संवेदना अधीररंजन चौधरींच्या बाजूने आहेत – मोदी

17:20 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

ज्यांचे स्वत:चे हिशेब चुकलेत, तेही आमच्याकडून आमचा हिशेब मागत फिरतायत – मोदी

17:19 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधी पक्षांना हेच सांगेन, तुम्ही तयारी करून का येत नाहीत? मी तुम्हाला तयारी करून यायला सांगितलं होतं २०१८ मध्ये. तुम्हाला तयारीसाठी ५ वर्षं तयारीसाठी दिली. काय हाल आहेत तुमचे – मोदी

17:18 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अविश्वास प्रस्तावावरही तुम्ही कसली चर्चा केली. तुमचे दरबारीही फार दु:खी आहेत. ही अवस्था आहे तुमची. फिल्डिंग विरोधकांनी लावली, पण चौकार-षटकार सत्ताधारी बाकांवरून लागले. विरोधी पक्ष अविश्वास ठरावावर नो बॉल करत पुढे चालत राहिला. इथून सेंच्युरी होत होती, तिथून नो बॉल होत होते – मोदी

17:17 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे दाखवून दिलंय की देशापेक्षा त्यांना पक्ष मोठा आहे. विरोधकांना देशापेक्षा स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता आहे – मोदी

17:16 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी कामकाजाच सहभाग घेतला असता तर चांगलं झालं असतं. गेल्या काही दिवसांत या सभागृहानं अनेक महत्त्वाची विधेयकं पारित केली. त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक होती. पण राजकारण विरोधकांसाठी प्राधान्याची बाब होती. त्या विधेयकांमध्ये विरोधकांना रस नव्हता. देशाच्या जनतेनं ज्यासाठी त्यांना इथे पाठवलंय, त्या जनतेचाही विश्वासघात करण्यात आला – मोदी

17:12 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ ठरतो. आज मी बघतोय की तुम्ही ठरवलंच आहे की एनडीए व भाजपा २०२४ च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून मोठा विजय मिळवतील – मोदी

17:11 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

२०१८मध्येही हा इश्वराचाच आदेश होता की विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव घेऊन आले होते. तेव्हाही मी म्हटलं होतं की अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची बहुमत चाचणी नाही, तर विरोधी पक्षांचीच बहुमत चाचणी आहे. झालंही तेच. जेव्हा मतदान झालं, विरोधी पक्षांकडे जेवढी मतं होती, तेवढीही ते जमा करू शकले नव्हते – मोदी

17:10 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

देशाच्या जनतेनं आमच्या सरकारबाबत वारंवार विश्वास दर्शवला आहे. मी आज देशाच्या कोट्यवधी नागरिकांचे आभार व्यक्त करतो. असं म्हणतात, इश्वर फार दयाळू आहे. देवाची मर्जी असते की तो कुणा ना कुणाच्या माध्यमातून आपल्या इच्छांची पूर्ती करतो. मी हा देवाचा आशीर्वाद मानतो की देवानं विरोधी पक्षांना सुचवलं आणि ते अविश्वास प्रस्ताव घेऊन आले – मोदी

17:09 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

गेल्या तीन दिवसांपासून अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. सगळ्यांचीच भूमिका माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मी स्वत: काही भाषणं ऐकलीही आहेत – मोदी

17:03 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या भाषणाला होणार सुरुवात…

17:03 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधानांंनंतर राहुल गांधीही लोकसभेत दाखल

अविश्वास ठरावावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधीही लोकसभेत दाखल झाले.

17:01 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल

अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरंद्र मोदी लोकसभेत दाखल

16:55 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: ओम बिर्लांनी चौधरींचे ‘ते’ शब्द कामकाजातून काढले

ओम बिर्लांनी चौधरींचे 'ते' शब्द कामकाजातून काढले

16:54 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: अधीर रंजन चौधरींचं ‘ते’ विधान

अविश्वास ठरावाची एवढी ताकद आहे की आम्ही आमच्या पंतप्रधानांना संसदेत ओढून आणून बसवलं. आमच्या मनातही अविश्वास ठराव आणण्याचा मुद्दा नव्हता. मणिपूर मुद्द्यावर बोलावं एवढीच आमची मागणी होती. पण पंतप्रधान एवढे का अडून बसले होते कुणास ठाऊक, सभागृहात न येण्याचीच त्यानी शपथ घेतली होती – काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी

16:50 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: भाजपाचं सूचक ट्वीट

मोदींच्या भाषणापूर्वी भाजपानं ट्वीट केला सूचक व्हिडीओ!

16:17 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी परमात्मा आहेत का? – खर्गे

पंतप्रधान काय कुणी परमात्मा आहेत का? – मल्लिकार्जुन खर्गेंचा परखड सवाल

16:16 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: राष्ट्रवादीचे दोन व्हिप!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या महिन्यात पडलेल्या फुटीमुळे आता राष्ट्रवादीतही शिवसेनेप्रमाणे दोन गट निर्माण झाले आहेत. संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून त्यात दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शरद पवार गटाने ठरावाच्या बाजूने मतदान करण्याबाबत तर अजित पवार गटाने ठरावाच्या विरोधात मतदान करण्याबाबत व्हिप जारी करण्यात आला आहे.

16:14 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल

अविश्वास ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खासदार अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल

16:11 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: अविश्वास प्रस्तावावरून राज्यवर्धन राठोड यांची टीका

भाजपा खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांची सोनिया गांधी व राहुल गांधींवर टीका

16:05 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: निर्मला सीतारमण यांचं विरोधकांवर टीकास्र

अविश्वास प्रस्तावावर बोलताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचं इंडिया आघाडीवर टीकास्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. (Photo – PTI)

PM Modi No Confidence Motion Live: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचं उत्तर