Maharashtra Assembly Election 2024: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल २०० पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला १२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे. दरम्यान आता यावर विरोधक टीका करत आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान करत मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, “महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही! लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!” अशाप्रकारे संजय राऊत यांनी

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान सकाळीही संजय राऊतांनी यासंदर्भात विधान केलं आहे. “माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. कुछ तो गडबड है, एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कोणत्या भरोशावर मिळतात? अजित पवारांना ४० पेक्षा जास्त जागा कोणत्या भरोशावर मिळतात? मग देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे कोणते दिवे महाराष्ट्रात लावले की त्यांना २० पेक्षा जास्त जागा मिळतात? महाराष्ट्रातील वातावरण आणि राज्यातील जनता कल ज्या पद्धतीने होता, राज्यभर आम्ही फिरलो, आम्हाला जनतेचा कल माहिती आहे. हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी पंरपरा आहे ती आम्ही पाळली. आम्ही लोकशाहीचा कौल मानतो. पण हा कौल कसा मानावा? हा प्रश्न या राज्यातील जनतेला पडलेला आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >> Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? श्रीकांत शिंदे म्हणाले “तुम्हाला सर्वांना लवकरच…”

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती बाजी मारणार, हे स्पष्ट झाल्यानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणतात, “गेल्या दोन सवा दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी दिवस-रात्र एक करुन जनतेच्या सेवेसाठी १८, १८ तास काम केलं आहे. आता मुख्यमंत्री पदाबाबत वरचे नेते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बसतील अन् ठरवतील काय करायचं ते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरच कळतील. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhansabha results 2024 shiv sena mp objects to assembly results demands ballot paper elections srk