Ind vs Pak Highlights Match Score, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेत सर्वात भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने शाहीन शहा आफ्रिदीच्या ३३ धावांच्या खेळीच्या बळावर १२७ धावांची मजल मारली. भारताने सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठलं. तिलक वर्मा आणि अभिषेक वर्मा यांनी प्रत्येकी ३१ धावा करत सूर्यकुमारला चांगली साथ दिली.

Match Ended

Asia Cup, 2025


India 
131/3 (15.5)

vs

Pakistan  
127/9 (20.0)

Match Ended ( Day – Match 6 )
India beat Pakistan by 7 wickets

Live Updates
12:05 (IST) 14 Sep 2025

‘अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त’, संजय राऊतांची जहाल टीका; भारत-पाकिस्तान सामन्यांवरून जुंपली

Sanjay Raut on India-Pakistan Match: भारत-पाकिस्तान सामन्याकडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. …सविस्तर वाचा
12:04 (IST) 14 Sep 2025

“आपल्या टीमला पाकिस्तानविरोधात मॅच खेळायची नाही, पण..”, जय शाह यांचे नाव घेत संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut on Team India: भारतीय संघावर आजचा पाकिस्तान विरोधातील सामना खेळण्यासाठी दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. …वाचा सविस्तर
12:02 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: कसा आहे दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रेकॉर्ड पाहिला तर भारताचा संघ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. दोन्ही संघ टी- २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान १० सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला अवघे ३ सामने जिंकता आले आहेत

11:46 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. गेल्या सामन्यात संधी मिळालेल्या खेळाडूंना या सामन्यातही संधी दिली जाऊ शकते.

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती