IPL 2025, RR VS DC Live Cricket Score Updates: अटीतटीच्या लढतीत राजस्थान आणि दिल्ली मुकाबला सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सगळा अनुभव पणाला लावत मिचेल स्टार्कने दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला. राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये ११ धावा केल्या. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी चौकार, षटकार लगावत हे लक्ष्य गाठलं.
IPL 2025 Delhi Capitals vs Rajasthan Royals Highlights: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
सुपर ओव्हरमध्ये दिल्ली विजयी
सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या लढतीत दिल्लीने राजस्थानवर विजय मिळवला.
मिचेल स्टार्कची कमाल, सामना सुपर ओव्हरमध्ये
शेवटच्या षटकात ९ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी असताना मिचेल स्टार्कने सगळा अनुभव पणाला लावत राजस्थानला विजयापासून वंचित ठेवलं.
१९व्या षटकात १४ धावा
मोहित शर्माने टाकलेल्या १९व्या षटकात राजस्थानने १४ धावा चोपल्या. ध्रुव जुरेलने मारलेला फटका षटकार जाणार होता. समीर रिझवीने सीमारेषनजीक चांगलं क्षेत्ररक्षण केलं.
अर्धशतकानंतर नितीश राणा तंबूत
चौकार, षटकारांची लयलूट करत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या नितीश राणाला मिचेल स्टार्कने बाद केलं. स्टार्कच्या घोटीव यॉर्करसमोर राणा निष्प्रभ ठरला. राणाने २८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
नितीश राणाची जोरदार फटकेबाजी
नितीश राणाच्या जोरदार फटकेबाजीमुळे राजस्थानसाठी लक्ष्य आटोक्यात आलं आहे.
संजू सॅमसन रिटायर हर्ट
विपराज निगमच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार लगावल्यानंतर संजू सॅमसनला छातीच्या डाव्या बाजूला त्रास जाणवू लागला. फिजिओंनी मैदानात येऊन पाहणी केली, उपचारही केले. संजूने पुढचा चेंडू खेळून काढला. परंतु वेदनेचं स्वरुप गंभीर असल्याने त्याने ड्रेसिंगरुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला. १९ चेंडूत ३१ धावा करून तो रिटायर हर्ट झाला आहे.
२०व्या षटकात १९ धावा; दिल्लीने राजस्थानसमोर ठेवलं १८९ धावांचं लक्ष्य
संदीप शर्माच्या टाकलेल्या २०व्या षटकात ४ वाईड, १ नोबॉल यांच्यासह दिल्लीने १९ धावा वसूल केल्या. दिल्लीने राजस्थानसमोर १८९ धावांचं लक्ष्य ठेवलं.
तीक्षणाने दूर केला अक्षरचा अडथळा
११ चेंडूत ३४ धावांची खेळी करणाऱ्या अक्षर पटेलला महेश तीक्षणाला बाद केलं.
अक्षरने हासारंगाला चोपले
दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने वानिंदू हासारंगाच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार वसूल केला.
अभिषेक पोरेलचं अर्धशतक एका धावेनं हुकलं
वानिंदू हासारंगाने अभिषेक पोरेलला अर्धशतक पूर्ण करू दिलं नाही. हासारंगाच्या गोलंदाजीवर रियान परागने त्याचा झेल टिपला. अभिषेकने ३७ चेंडूत ४९ धावांची खेळी केली.
शिमोरन हेटमायरचा उत्तम झेल; राहुल माघारी
जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा राहुलचा प्रयत्न फसला. शिमोरन हेटमायरने शिताफीने झेल टिपला. राहुलने ३८ धावांची खेळी केली.
दिल्लीच्या १० षटकात ७६ धावा
राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला आहे.
करुण नायर रनआऊट
मुंबई इंडियन्सविरुद्ध झंझावाती खेळीसह पुनरागमन करणारा करुण नायर राजस्थानविरुद्ध रनआऊट झाला.
जेक फ्रेझर मॅकगर्क पुन्हा एकदा अपयशी
पदलालित्याचा अभाव असणाऱ्या जेक फ्रेझर मॅकगर्कने पुन्हा एकदा सहजपणे आपली विकेट गमावली आहे. जोफ्रा आर्चरने त्याला बाद केलं.
अभिषेक पोरेलची फटकेबाजी
युवा डावखुरा सलामीवीर अभिषेक पोरेलने खणखणीत फटकेबाजी करत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली आहे.
दोन्ही संघ कसे आहेत?
दिल्ली कॅपिटल्स
जेक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, के.एल.राहुल, ट्रिस्टन स्टब्ज, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, विपराज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मिचेल स्टार्क
इम्पॅक्ट प्लेयर
मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नालकांडे, डोनाव्हन फरेरा, त्रिपुराणा विजय
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमोरन हेटमायर, वानिंदू हासारंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट प्लेयर
शिवम दुबे, युधवीर सिंग, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, कुणाल सिंग राठोड
राजस्थानने टॉस जिंकला; गोलंदाजीचा निर्णय
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.