IPL 2025 GT vs SRH Highlights: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादला ३८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2025 GT vs SRH Highlights
GT vs SRH Live: गुजरातचा दमदार विजय
हा सामना गुजरात टायटन्स संघाने ३४ धावांनी आपल्या नावावर केला आहे. यासह हैदराबादचा संघ या स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे.
GT vs SRH Live: सिराजच्या लागोपाठ २ विकेट्स
या डावात सिराजच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. सिराजने लागोपाठ २ विकेट्स घेतल्या आहेत.
GT vs SRH Live: गुजरातची विजयाच्या दिशेने वाटचाल
हैदराबादचे ४ प्रमुख फलंदाज माघारी परतले आहेत. अभिषेक शर्माने डाव सांभाळला होता. पण तो देखील बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर क्लासेन देखील बाद होऊन माघारी परतला आहे.
GT vs SRH Live: हैदराबादला दुसरा धक्का
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. ईशान किशन बाद होऊन माघारी परतला आहे.
GR vs SRH Live: हैदराबादला पहिला मोठा धक्का
हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज ट्रव्हिस हेड स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.
GT vs SRH Live: गिल – सुदर्शनची जोडी चमकली! हैदराबादसमोर जिंकण्यासाठी २२५ धावांचे आव्हान
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्सला २० षटकअखेर २२४ धावा करता आल्या आहेत. हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी २२५ धावा करायच्या आहेत.
GT vs SRH Live: गजरातचा निम्मा संघ तंबूत
गुजरातने ५ गडी बाद २२४ धावा केल्या आहेत.
GT vs SRH Live: गिलचं शतक हुकलं
शुबमन गिलला पुन्हा एकदा शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याला ७६ धावांवर धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
GT vs SRH Live: शुबमन गिलचं अर्धशतक पूर्ण
या सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्सला चांगली सुरूवात करून दिली. गिलने २५ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
GT vs SRH Live: गुजरातला पहिला धक्का
गुजरातला पहिला मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन ४८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
GT vs SRH Live: पावरप्ले
पावरप्लेमध्ये गुजरात टायटन्सच्या सलामी जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. पावरप्लेमध्ये शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीने ८२ धावा जोडल्या आहेत.
GT vs SRH Live: गिल – सुदर्शनची दमदार सुरूवात
या सामन्यातही शुबमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरातला दमदार सुरूवात करून दिली आहे. गुजरातने ५० धावांचा पल्ला गाठला आहे.
GT vs SRH Live: दोन्ही संघांची प्लेइंग ११
गुजरात टायटन्स (Playing XI): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
सनरायझर्स हैदराबाद (Playing XI): अभिषेक शर्मा, इशान किशन, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी</p>
GT vs SRH Live: हैदराबादचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय! पाहा प्लेइंग ११
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
GT vs SRH Live: कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघ ५ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान गुजरातने ३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर हैदराबादला १ सामना जिंकता आला आहे. १ सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता.