IPL Auction 2025 Day 2 Live Updates, 25 November 2024: आयपीएल २०२५चा महालिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पाडला. अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या तर काही खेळाडूंनी इतिहासही रचला. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटी रुपयांना संघात सामील केले. तर श्रेयस अय्यर २६.७५ कोटींना पंजाब किंग्सच्या ताफ्यात सामील झाला, जो या लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर १३ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीसाठी पहिल्याच लिलावात कोट्यवधींची बोली लागली.
IPL Mega Auction 2025 Day 2 Highlights: आयपीएल २०२५ महालिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या हायलाईट्स
IPL Auction 2025 Live : डोनावन फरेरा अनसोलड
डोनावन फरेरा, ज्यांची मूळ किंमत 75 लाख रुपये होती, त्याच्यासाठी कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही आणि पहिल्या प्रयत्नात त्यांची विक्री झाली नाही.
IPL Auction 2025 Live : ॲलेक्सला राहिला अनसोल्ड
ॲलेक्सला कोणत्याही संघाने घेतले नाही ज्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती.
IPL Auction 2025 Live: जोस इंग्लिस
पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार जोश इंग्लिसवर बोली लावत त्यांना २.६ कोटींना संघात सामील केलं आहे. पॉन्टिंग, मॅक्सवेल स्टॉयनिस असा ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पंजाबच्या ताफ्यात आहे.
मुंबई इंडियन्सने रियान रिकल्टनला १ कोटींना संघात सामील केलं आहे. जो दक्षिण आफ्रिकेचा एक यष्टीरक्षक फलंदाज आहे.
IPL Auction 2025 Live: नितीश राणा
मूळ किंमत २ कोटींसह उतरलेल्या नितीश राणासाठी चेन्नई सुपर किंग्सने बोली लावली होती. त्यानंतर राजस्थान उडी घेतली, यानंतर चेन्नईने माघार घेताच आरसीबीने बोली लावली. पण नितीश राणा अखेरीस ४.२ कोटींना राजस्थान रॉयल्स संघात गेला.
IPL Auction 2025 Live: कृणाल पंड्या
कृणाल पंड्यावर २ कोटींच्या मूळ किमतीसह बोली लावण्यात आली. पंड्यावर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीने बोली लावली. शेवटपर्यंत आरसीबी दटून राहिला, अखेरीस राजस्थानने माघार घेतली आणि गुजरातनेही आरटीएमचा पर्याय नाकारला. यासह कृणाल पंड्या ५.७५ कोटींना आरसीबी संघाचा भाग झाला.
IPL Auction 2025 Live: मार्को यान्सन
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सन २ कोटींच्या मूळ किमतीसह उतरला. मुंबई आणि पंजाबने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर गुजरातने उडी घेतली आणि मोठी बोली लागली. मार्को यान्सनवर ७ कोटींची मोठी बोली लावली आणि त्याला संघात सामील केलं.
IPL Auction 2025 Live: चेन्नईच्या ताफ्यात सॅम करन
चेन्नई सुपर किंग्सने सॅम करनवर सुरूवातीला बोली लावली. लखनौने ही बोली लावण्यासाठी उडी घेतली. यानंतर पंजाबकडे आरटीएमचा पर्याय होता. पण त्यांनी नकार देताच सॅम करनला चेन्नईने २.४ कोटींना ताफ्यात सामील केले.
IPL Auction 2025 Live: वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदर २ कोटींच्या मूळ किमतीसह लिलावात उतरला होता. सुंदरसाठी सुरूवातील गुजरातने बोली लावली. यानंतर त्याच्यासाठी लखनौने बोली लावली, पण अखेरीस गुजरातने ३.२० कोटींना त्याला संघात सामील करून घेतले.
पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर २ कोटींच्या मूळ किमतीसह अनसोल्ड
IPL Auction Live: रोव्हमन पॉवेल, फाफ
राजस्थान रॉयल्स संघाच्या असलेल्या रोव्हमन पॉवेलसाठी केकेआरने १.५० कोटींच्या मूळ किमतीसह बोली लावत संघात सामील केलं आहे. तर मूळ किमत २ कोटींसह फाफ डू प्लेसिसला दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलं आहे.
IPL Auction Live: केन विल्यमसन, फिलीप्स अनसोल्ड
कॅप्ड फलंदाजांच्या दुसऱ्या यादीत २ कोटींच्या मूळ किंमतीसह असलेले न्यूझीलंडचे फलंदाज केन विल्यमसन, ग्लेन फिलीप्स तर अनसोल्ड राहिले आहेत.
आयपीएल २०२५ दुसऱ्या दिवसाचा महालिलाव काहीच वेळात सुरू होणार आहे. ३.३० वाजता सुरू होणार असून पहिल्या यादीत कॅप्ड फलंदाजांवर बोली लागणार आहे. ज्यात अजिंक्य रहाणे, ग्लेन फिलीप्स, फाफ डू प्लेसिससारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
IPL Auction Live: IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर राहिलेले स्लॉट (विदेशी खेळाडूंचे स्लॉट कंसात)
मुंबई इंडियन्स – १६ (७)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १६ (५)
राजस्थान रॉयल्स – १४ (४)
चेन्नई सुपर किंग्ज – १३ (४)
लखनौ सुपर जायंट्स – १३ (४)
पंजाब किंग्स – १३ (६)
सनरायझर्स हैदराबाद – १२ (४)
कोलकाता नाइट रायडर्स – १२ (३)
दिल्ली कॅपिटल्स – १२ (४)
गुजरात टायटन्स – ११ (५)
IPL Auction 2025: IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर संघांकडे उरलेली रक्कम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ३०.६५ कोटी
मुंबई इंडियन्स – २६.१० कोटी
पंजाब किंग्स – २२.५० कोटी
गुजरात टायटन्स – १७.५० कोटी
राजस्थान रॉयल्स – १७.३५ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – १५.६० कोटी
लखनौ सुपर जायंट्स – १४.८५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स – १३.८० कोटी
कोलकाता नाईट रायडर्स – १०.०५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद – ५.१५ कोटी
IPL Mega Auction 2025: युझवेंद्र चहलवर विक्रमी बोली
IPL Mega Auction 2025: मुंबईच्या ताफ्यात बोल्टची घरवापसी
IPL Mega Auction 2025: ५ पैकी ४ संघांना मिळाले कर्णधार
IPL Mega Auction 2025: सर्वाधिक पैसा कोणाकडे?
IPL Mega Auction 2025 Day 2 Live Updates: भारताचे सर्वात महागडे खेळाडू
ऋषभ पंत – २७ कोटी – लखनौ सुपर जायंट्स
श्रेयस अय्यर – २६.७५ कोटी – पंजाब किंग्स</p>
व्यंकटेश अय्यर – २३.७५ कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
अर्शदीप सिंग – १८ कोटी – पंजाब किंग्स
युझवेंद्र चहल – १८ कोटी – पंजाब किंग्स
केएल राहुल – १४ कटी – दिल्ली कॅपिटल्स</p>
आयपीएल महालिलाव
आयपीएल २०२५ च्या महालिलावात पहिल्या दिवशी १२ मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ज्यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएळ राहुल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल या खेळाडूंवर जबरदस्त बोली लागल्या. ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला.