IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Match Highlights: वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेरच्या षटकात गुजरात टायटन्सनने सामना जिंकत ३ विकेट्सने मुंबईला मात दिली. या विजयासह गुजरातचा संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. संघाचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत.

Live Updates
19:35 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: पहिल्याच षटकात धक्का

मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रायन रिकल्टन २ धावा करत झेलबाद झाला. साई सुदर्शनने एक कमालीचा झेल टिपला. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरही विल जॅक्स झेलबाद होणार होता, परंतु कॅच ड्रॉप झाला. यासह मुंबईने पहिल्या षटकात १ बाद ६ धावा केल्या आहेत.

19:07 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकिपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शद खान, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

19:07 (IST) 6 May 2025

MI vs GT Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रायन रिकेल्टन (विकेटकिपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>

19:01 (IST) 6 May 2025
MI vs GT Live: नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स सामन्याची नाणेफेक गुजरातने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कगिसो रबाडा संघात असूनही तो मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळताना दिसणार नाही. संघात परतला असून पुन्हा त्याला युनिटबरोबर जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल असे, गिल म्हणाला. तर मुंबई इंडियन्सच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.

18:40 (IST) 6 May 2025

गुजरातच्या मधल्या फळीचा कस

साई सुदर्शन, शुबमन गिल आणि जोस बटलर या त्रिकुटाने हंगामात फलंदाजीचा गड सांभाळला आहे. पण या तिघांव्यतिरिक्त मधल्या फळीला मोठी खेळी करण्याची संधीच मिळालेली नाही. मुंबईकडे ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांच्यासह कर्ण शर्मा आणि मिचेल सँटनर अशा अव्वल अनुभवी गोलंदाजांची फळी आहे. गुजरातच्या त्रिकुटाला झटपट गुंडाळण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. गुजरात या कच्च्या दुव्यावर कसं काम करते हे पाहणं रंजक ठरणार आहे.