PBKS vs MI IPL 2025 Qualifier 2 Highlights: आयपीएल २०२५ मधील आज दुसरा फायनलिस्ट संघ मिळाला आहे. आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील दुसरा क्वालिफायर सामना पंजाब किंग्सने जिंकत मुंबई इंडियन्सला ३ विकेट्सने पराभूत केलं. आता पंजाब किंग्सचा संघ आरसीबीविरूद्ध ३ जूनला अंतिम सामना खेळेल.
IPL 2025 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights: आयपीएल २०२५ दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स हायलाईट्स
पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला नमवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रेयस अय़्यरच्या विजयी षटकारांच्या जोरावर १९व्या षटकात पंजाबने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.
PBKS vs MI LIVE: श्रेयस अय्यरचं अर्धशतक
श्रेयस अय्यरने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये २७ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावा केल्या. तर याच षटकात धाव चोरताना शशांक सिंग नॉन स्ट्रायकर एंडला हार्दिकच्या डायरेक्ट हिटवर थोडक्यासाठी धावबाद झाला आणि पंजाबने ५ विकेट्स गमावल्या आहेत. आता १८ चेंडूत ३१ धावांची पंजाबला गरज आहे.
अश्वनी कुमारने १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नेहाल वधेराला झेलबाद करत मुंबईने पंजाबला मोठा धक्का दिला. वधेरी २९ चेंडूत४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा करत बाद झाला. यासह संघाला २४ चेंडूत ४१ धावांची गरज आहे.
नेहाल वधेरा आणि श्रेयस अय़्यरच्या जोडीने सावध पण परिणामी मोठे फटके मारत अर्धशतकी भागीदारी केली आहे. श्रेयसने रीस टोप्लेच्या १३व्या षटकात सलग ३ षटकार लगावत धावांचा फरक कमी केला. यासह १४ षटकांत पंजाबने ३ बाद १४२ धावा केल्या आहेत. यासह पंजाबला विजयासाठी ३६ चेंडूत ६२ धावांची गरज आहे.
पॉवरप्लेचे अखेरचं षटक टाकण्यासाठी अश्वनी कुमार आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर प्रियांश मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला. यासह पंजाबने पॉवरप्लेमध्ये २ बाद ६४ धावा केल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये पंजाबची धावसंख्या मुंबईपेक्षा एका धावेने कमी आहे.
PBKS vs MI LIVE: बुमराहच्या षटकात फटकेबाजी
जसप्रीत बुमराह पाचवं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकात इंग्लिसने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. नंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार आणि अखेरच्या चेंडूवर षटकार मारत या षटकात २० धावा कुटल्या. बुमराहच्या षटकात धावा करत इंग्लिसने मुंबईवर दबाव आणला.
PBKS vs MI LIVE: पहिली विकेट
तिसऱ्या षटकात बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर प्रभसिमरनने मोठा फटका खेळला आणि तो झेलबाद झाला. रीस टोपलेने मागे धावत येत एक उत्कष्ट झेल टिपला आणि संघाला पहिली विकेट मिळवून दिली. प्रभसिमरन ६ धावा करत बाद झाला.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचा पल्ला पार केला आहे. मुंबईच्या सर्व फलंदाजांना योगदान देत मुंबईने २० षटकांत ६ बाद २०३ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी ४४ धावांची खेळी केली. तर बेयरस्टो झटपट ३८ धावा करत बाद झाला. यानंतर मुंबईला २०० धावांपर्यंत नेण्यात नमन धीरने मोठी भूमिका बजावली. तर नवा फलंदाज राज अंगद बावाने अखेरच्या षटकात उत्कृष्ट धावून ५ धावा काढत २०३ धावांचा पल्ला गाठून दिला. मुंबईने यासाह पंजाबला विजयासाठी २०४ धावांचं आव्हान दिलं आहे.
आयपीएलच्या इतिहासात आजवर कोणताच संघ मुंबई इंडियन्ससमोर २०० अधिक धावांचं आव्हान यशस्वीपणे पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे पंजाबसाठी ही मोठी परिक्षा असणार आहे.
हार्दिक पंड्या १८व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर नमन धीर अखेरच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. नमन १८ चेंडूत ७ चौकारांसह ३७ धावा करत झेलबाद झाला. पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई होत असतानाही त्यांनी चांगली गोलंदाजी केली.
PBKS vs MI LIVE: तिलक-सूर्या वादळी फटकेबाजीनंतर झेलबाद
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव वादळी फटकेबाजीनंतर सलग ३ चेंडूंमध्ये झेलबाद झाले. १४व्या षटकात युझवेंद्र चहलने पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला झेलबाद केलं. सूर्या २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. तर १५व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हवेत उंच गेला आणि तिलक वर्माचा झेल प्रियांश आर्य धावत येऊन टिपला. यासह तिलक २९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा करत बाद झाला.
श्रेयस अय्यरने तिसऱ्या षटकात रोहित शर्माला बाद करण्यासाठी सर्वांना चकित करत मोठा सापळा रचला आणि रोहित शर्माही त्या षटकात बाद झाला. नेमकं काय झालं, वाचा सविस्तर
PBKS vs MI LIVE: जॉनी बेयरस्टो झेलबाद
मुंबई इंडियन्सला सामन्यात दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा झेलबाद झाल्यानंतर त्याचा सलामी जोडीदार बाद झाला आहे. विजयकुमार वैशाकने सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाला बेयरस्टोच्या रूपात मोठी विकेट मिळवून दिली आहे. जॉनी बेयरस्टोने एलिमिनेटर सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर रोहित शर्माच्या जाहिरातीमधील नाव जितेंद्र भाटवडेकर त्याला देण्यात आले. बेयरस्टो या सामन्यात २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा करत बाद झाला.
PBKS vs MI LIVE: पॉवरप्ले
दुसऱ्याच षटकात रोहित शर्माची विकेट गमावल्यानंतरही मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये बाजी मारली आहे. आज तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीला आला आहे. मुंबईने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६५ धावा केल्या आहेत. बेयरस्टो ३५ धावा तर तिलक वर्मा १४ धावा करत खेळत आहे.
मुंबई-पंजाब सामन्यात दुसऱ्याच षटकात रोहित शर्माचा झेल सुटला. यानंतर रोहितने पुढच्याच चेंडूवर चौकार मारला. पण पुढच्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा ८ धावा करत माघारी परतला. श्रेयस अय्यरने तिसरे षटक टाकण्यासाठी मार्कस स्टॉयनिसला आणलं आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर रोहितला बाद केलं.
PBKS vs MI LIVE: सामन्याला सुरूवात
मुंबई-पंजाब सामन्याला सुरूवात झाली आहे. रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो फलंदाजीला उतरले आहेत. तर अर्शदीपने पहिलं षटक टाकलं. मुंबईने पहिल्या षटकात ४ धावा केल्या आहेत.
मुंबई-पंजाब सामन्यात पावसाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना किती वाजता सुरू होणार याची माहिती दिली. सामना ९.४५ वाजता सुरू होणार आहे. तर चांगली गोष्ट म्हणजे सामना पूर्ण २० षटकांचा होणार आहे. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीला उतरणार तर पंजाब गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.
मुंबई-पंजाब सामना लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. ९.४० पर्यंत जर सामना सुरू झाला नाही तर षटकं कमी व्हायला सुरूवात होऊ शकते. खेळाडू वॉर्मअपसाठी मैदानावर आले आहेत.
PBKS vs MI LIVE: पावसाची विश्रांती
अहमदाबादमध्ये बरसत असलेल्या पावसाने अखेरीस विश्रांती घेतली आहे. या स्टेडियममधील ड्रेनेज सिस्टिम चांगली असल्याने आऊटफिल्ड चांगल्या अवस्थेत आहे, ग्राऊंड्समॅनही मैदान तयार करत आहेत.
अहमदाबादमध्ये पावसाची बॅटिंग अजूनही सुरूच आहे. पाऊस थांबल्यानंतर मैदानाची पंचांनी पाहणी केली. पण त्यानंतरही पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खेळाडू, ग्राऊंड स्टाफ, पंच सर्वच जण आतमध्ये गेले आहेत.
PBKS vs MI Live: पंजाब-मुंबई सामना रद्द झाला तर काय होणार?
मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स सामना पावसामुळे उशिरा सुरू होत आहे. तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मैदानाची पाहणी करून सामना सुरू होण्याची वेळ दिली. पण पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.
It has started to rain again in Ahmedabad ?️
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
We will be back shortly with further updates.#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile https://t.co/dJ15ov7NsU
पावसाने अहमदाबादमध्ये विश्रांती घेतली असून कव्हर्स हटवण्यात आले आहे. यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि सामना सुरू होण्याची वेळही जाहीर केली आहे. पंजाब-मुंबईमधील सामना ८.२५ ला सुरू होईल.
? Update from Ahmedabad ?
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
Play to resume at 8:25 PM IST.#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile https://t.co/O1wFiN7szK
अहमदाबादमध्ये पाऊस ओसरला असून चौथे पंच मैदानावर छत्रीसह उतरले आहेत. तर ग्राऊंड स्टाफही मैदानावर सामना सुरू करण्यासाठी तयारीला लागले आहेत. खेळाडूही वॉर्म अपसाठी मैदानावर उतरले आहेत.
मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आता सामना उशिरा सुरू होणार आहे.
PBKS entered the field and the rain gods decided to put on a show. Raining and raining heavily. Covers are on.#MIvsPBKS pic.twitter.com/JnenOQtZaR
— Kanav Bali (@Concussion__Sub) June 1, 2025
PBKS vs MI LIVE: मुंबईने नव्या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी
PBKS vs MI LIVE: पावसाने लावली हजेरी
नाणेफेकीनंतर मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले आहेत.
PBKS vs MI LIVE: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
PBKS vs MI LIVE: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णझार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली
आयपीएल २०२५ क्वालिफायर-२ मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स सामन्याची नाणेफेक पंजाबने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरणार आहे. पंजाब किंग्सच्या ताफ्यात युझवेंद्र चहल परतला आहे.
PBKS vs MI LIVE: पंजाब किंग्स
शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.