आजच्या लेखात आपण पुन्हा एकदा वेदनेकडे वळलो आहोत, गेली पाच वर्ष अनेक स्नायू आणि हाडांच्या वेदनांच्या रुग्णांशी संवाद साधताना आणि उपचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की रुग्ण त्यांच्या वेदना व्यक्त करताना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ती म्हणजे त्या वेदनेची तीव्रता! साहजिकच त्यांच्यासाठी वेदनेची तीव्रता हा सगळ्यात त्रास देणारा भाग असतो. पण या वेदनेला इतर अनेक कंगोरे असतात ज्याबद्दल असायला हवी तितकी जागरूकता रुग्णांमध्ये आजही नाही. बहुतेकवेळा औषध घेऊन वेदना तात्पुरती बंद करणे या संकल्पनेभोवती फिरणार्या बायोमेडिकल मॉडेलचा हा परिणाम असावा. आपल्या शरीरात असणारी वेदना सजगपणे अनुभवणे, आणि वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि दैनंदिन घटकांमुळे ती कशी प्रभावित होते ही प्रक्रिया समजून घेणं हे रूग्णांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचं ठरू शकतं. हे घटक आपल्या वेदनेला प्रभावित करू शकतात हे रुग्णांना कळलं की ते वेदनेकडे अधिक सजग रीतीने बघू शकतात, आपल्या वेदनेची तीव्रता कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय आपल्यालाच माहिती आहे ही भावना त्यांना सशक्त करते आणि त्यांचं परावलंबित्व कमी करते.
Health Special : पेन बिहेवियर म्हणजे काय?
आपल्या शरीरात असणारी वेदना सजगपणे अनुभवणे, आणि वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि दैनंदिन घटकांमुळे ती कशी प्रभावित होते ही प्रक्रिया समजून घेणं हे रूग्णांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचं ठरू शकतं.
Written by वैभवी वाळिम्बे
हेल्थ
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-02-2024 at 15:20 IST
TOPICSमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle
+ 3 More
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is pain behaviour and treatment of pain behavior hldc css