Raj Thackeray Uddhav Thackeray News Updates : राज ठाकरे यांनी शुक्रवारी मिरा-भायंदरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी हिंदी सक्ती करून दाखवाच असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं. तसेच भाजपाच्या निशिकांत दुबेंवरही टीका केली होती. आता निशिकांत दुबे यांनी त्यावर उत्तर देत आपण राज ठाकरेंना हिंदी शिकवली? असा प्रश्न विचारला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी मुलाखत घेतली.
मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदेंना दिले, त्याबद्दल टीका केली. तसेच ठाकरे ब्रँड असल्याचं वक्तव्य केलं. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. आज राज्यात घडणाऱ्या घडामोडींच्या सगळ्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Today : राज्यातील ताज्या घडामोडींच्या अपडेट्स
कबुतरखान्यांच्या समर्थनार्थ प्राणीप्रेमी संघटना सरसावल्या…सांताक्रुझमध्ये कबुतरांसाठी मूक मोर्चा…
“समृद्धी महामार्गात २० हजार कोटींचा भ्रष्टाचार”, हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा आरोप
राज्यात सध्या हनीट्रॅपच प्रकरणाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. अधिवेशनातही या मुद्यांवरून जोरदार गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला. एकनाथ शिंदे यांचं सरकार हनीट्रॅपमुळेच आलं असल्याचं विधान वडेट्टीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हनीट्रॅपच हे जे आहे ते सत्य आहे. हनीट्रॅप ही सावली आहे. पण त्याचं मूळ कारण हे समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गात २० हजार कोटींचा भ्रष्ट्राचार झालेला आहे. या २० हजार कोटीमधील दे दुवे होते त्यांनी हा पैसा तेथून लुटला आणि तो पैसा उडवला. या हनीट्रॅपच्या खोलात तर सरकार गेलं तर २० हजार कोटींचा भ्रष्ट्राचार उघडकीस येईल. त्यामुळे हे प्रकरणा दाबण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
नाशिक पुरोहित संघाची सभासद नोंदणी ३८ वर्षे का बंद होती ?
स्मार्ट प्रीपेड मीटर लागताच वीज देयक दुप्पट… एक हजार घरात सर्व्हेक्षण… आंदोलक म्हणतात…
मॅन होल सफाईसाठी यंत्र खरेदी करण्यासाठी ५०४ कोटींची तरतूद
सफाईसाठी मॅन होलमध्ये उतरावे लागू नये यासाठी ५०४ कोटींची यंत्र खरेदीची तरतूद करण्यात आली आहे. जर कर्मचारी मॅन होलमध्ये सफाई करण्यासाठी उतरला आणि त्याचा मृत्यू झाला तर ३० लाख, पूर्ण अपंगत्व आल्यास २० लाख आणि कमी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये देण्याचे परिपत्रकही काढले आहे. तसेच कंत्राटदारावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
सफाईसाठी मॅन होल मध्ये उतरावे लागू नये यासाठी ५०४ कोटींची यंत्र खरेदीची तरतूद करण्यात आली आहे. जर कर्मचारी मॅन होलमध्ये सफाई करण्यासाठी उतरला आणि त्याचा मृत्यू झाला तर ३० लाख, पूर्ण अपंगत्व आल्यास २० लाख आणि कमी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये देण्याचे परिपत्रकही काढले आहे. तसेच… pic.twitter.com/PtSAgHbZz3
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 18, 2025
चलनी नोटा, पारपत्र छपाई का थांबू शकते…३१ जुलैपासून संपाचा इशारा
नया नगरमध्ये कोणीच मराठी बोलत नाही, संविधानही मानत नाही – नितेश राणेंची टीका
राज ठाकरेंच्या मिरा-भायंदरमधील सभेबद्दल नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नया नगरमध्ये कोणीच मराठी बोलत नाही, ते संविधानही मानत नाही असं ते म्हणाले.
#WATCH | Mumbai | On MNS Chief Raj Thackeray, Maharashtra Minister Nitesh Rane says, "Nobody speaks Marathi in Naya Nagar, and people there don't believe in the constitution, but want to impose Sharia law there. Nobody wore masks or got vaccinated there during the Covid pandemic.… pic.twitter.com/B7Wc5TsRmi
— ANI (@ANI) July 19, 2025
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपा आमदार राम कदम म्हणाले…
सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आलेत, त्यांना संघर्षाचा काळ कधीच कळणार नाही असं म्हणत राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. करोना काळात रेमडेसिविर औषधात या लोकांनी पैसे खाल्लेत, त्यातही घोटाळे केलेत. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांना देवमाणूस म्हणतो कारण ते लोकांना अडीअडचणीत उद्धव ठाकरेंप्रमाणे एकटं सोडत नाहीत. रात्री ३ वाजता, ४ वाजताही मदतीसाठी धावून जाणारे अशी त्यांची ओळख आहे, असं राम कदम म्हणाले.
लोकसभेच्या यशाची हवा डोक्यात गेली, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणाले…
पराभवाचं आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. तीन पक्ष एकत्र आले होते. पूर्वी आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो, अशा परिस्थितीत जागा वाटप करताना थोड्या अडचणी आल्या होत्या यात दुमत नाही. पण निवडणुकीत जो घोटाळा झाला होता, त्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत उल्लेख असायला हवा होता, असं काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणाले.
गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देणार नाही हे भाजपाने जाहीर करावं, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. उद्या ते दाऊद इब्राहिमलाही पक्षात घेतील, भाजपा गुन्हेगारांचे आश्रयस्थान आहे, अशी टीका राऊत यांनी भाजपावर केली.
असेच बोलत राहा, आपोआप पितळ उघड पडेल; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
नाचता येईना अंगण वाकडे…
उद्धवराव आज तुम्ही सामनाच्या मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती.
विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर मतदानाची मागणी करू लागलात.
निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही, असे आपण म्हटले आहे.
संपूर्ण मुलाखत अशा विरोधाभासाने भरलेली आहे. पण तरीही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली…. मी कोणी नाही. मी शून्य आहे. उद्धव ठाकरे याला अर्थ नाही….
लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मीपणा आला तेव्हा पराभव झाला….
असेच बोलत राहा. आपोआप पितळ उघड पडेल, अशी पोस्ट भाजपाच्या केशव उपाध्येंनी केली आहे.
नाचता येईना अंगण वाकडे…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 19, 2025
उद्धवराव आज तुम्ही @SaamanaOnline मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती.
विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट…
ठाकरे ब्रँड सध्या जनतेला पसंत नाही – सुधीर मुनगंटीवार
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. ठाकरे ब्रँड सध्या जनतेला पसंत नाही, असं विधान त्यांनी केलं. ही घरगुती मुलाखत आहे. मॅच फिक्सिंग मुलाखत आहे. लोकांना अशी मुलाखत फार आवडत नाही. आपल्याकडे नापास झाल्यावर कारणं शोधण्याची परंपरा आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“घालीन लोटांगण वंदीन चरण करायचं अन्…”, उद्धव ठाकरेंची पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना देण्यावरून टीका; म्हणाले, “चोर तो चोरच”
मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? निशिकांत दुबेंची पोस्ट
“मराठी लोगों को हम यहां पटक पटक कर मारेंगे” असं वक्तव्य भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होतं. त्यांना राज ठाकरेंनी मिरा-भायंदरच्या सभेतून उत्तर दिलं. तुम मुंबई आओ, हम तुम्हे समंदर मे डुबो डुबो के मारेंगे, असं राज म्हणाले. राज यांचा हा व्हिडीओ शेअर करत “मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?” असा प्रश्न निशिकांत दुबे यांना विचारला आहे.
मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ? https://t.co/5YpM1SrzDt
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 18, 2025
राज ठाकरे (Express photos by Akash patil)