Maharashtra News Today, 12 September 2025 : मुंबईत मातोश्री या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदार व मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) सातत्याने भेटी होत असताना आज नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा) व मनसेने संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. नाशिकमधील नागरी समस्यांविरोधात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहेत.

भारतीय जनता पार्टीने येत्या मंगळवारी मुंबईत विजय संकल्प मेळावा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जाणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधित राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कायद्याच्या चौकटीत हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना जातप्रमाणपत्र मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला, “हा शासन निर्णय सरकारने बदलला तर एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. जरांगेशाही येणं अशक्य आहे.”

Live Updates

Latest Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

15:10 (IST) 12 Sep 2025

प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीसाठी नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीने पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. …वाचा सविस्तर
15:01 (IST) 12 Sep 2025

रेणापूर तालुक्यातील ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर भुजबळ मैदानात

भुजबळ यांनी मराठ्यांना दहा टक्क्यांचे विशेष आरक्षण नको का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या आत्महत्येनंतर भुजबळही मराठवाड्यातील मराठा- ओबीसी संघर्षााच्या मैदानात पुन्हा उतरल्याचे दिसून येत आहे. …सविस्तर बातमी
15:00 (IST) 12 Sep 2025

सांगलीतील नवीन अग्निशमन केंद्राचे लोकार्पण

माळबंगला येथे सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले आहे. …सविस्तर बातमी
14:59 (IST) 12 Sep 2025

गोहाटीला गेलो नसतो तर…मंत्री उदय सामंत हे काय बोलून गेले ?

सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि शिक्षक गौरव समितीच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. …वाचा सविस्तर
14:51 (IST) 12 Sep 2025

विद्यापीठांची झाडाझडती… आता काय होणार? प्राध्यापक भरती कधी?

राज्याच्या घसरणीबाबत सर्व स्तरांतून झालेल्या टीकेची उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन घसरणीबाबत झाडाझडती घेतली. …वाचा सविस्तर
14:51 (IST) 12 Sep 2025

जागतिक डॉल्फिन दिवस : भारतभर आणि महाराष्ट्रातही नजरेस येणारे; राज्यातील ‘या’ भागात आहे यांचा वावर

भारतामध्ये एकूण पाच ते सहा महत्त्वाच्या प्रजाती आढळतात. त्यातील दोन म्हणजे गंगा नदीतील डॉल्फिन आणि समुद्री डॉल्फिन. …सविस्तर बातमी
14:47 (IST) 12 Sep 2025

कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख; मनसेचे अमेय खोपकर यांचा कपिल शर्माला इशारा

कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केल्याने मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे. …सविस्तर वाचा
14:45 (IST) 12 Sep 2025

Wardha Rain News: पावसाचा हाहाकार! भिंत कोसळून मृत्यू, आमदार घटनास्थळी; पंचायत वास्तू पाण्यात, तीन वाहून गेले पण…

देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे किरण बुजाडे या ३२ वर्षीय युवकाचा घराची भिंत अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार देतात. …अधिक वाचा
14:37 (IST) 12 Sep 2025

Mohan Bhagwat On US Tariff Policy: टॅरिफवरून सरसंघचालकांनी अमेरिकेला सुनावले; म्हणाले, “सात समुद्र दूर देशांमध्ये भारताविषयी भीती…”

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं. …सविस्तर वाचा
14:35 (IST) 12 Sep 2025

अहमदनगर रेल्वेस्थानकाचे अहिल्यानगर रेल्वेस्थानक नामांतर, गृहमंत्रालयाची अधिसूचना जारी

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. …अधिक वाचा
14:34 (IST) 12 Sep 2025

पाम बीच रोडवर पुन्हा अपघात; अक्षर सिग्नलजवळ थार एसयूव्ही दुभाजकाला धडकली

पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. …वाचा सविस्तर
14:25 (IST) 12 Sep 2025

MPSC Mains Exam Cut off EWS: स्‍पर्धा परीक्षार्थ्यांचा कोणता अंदाज खरा ठरला? ‘ईडब्ल्यूएस’चा कट ऑफ कमी लागल्याने…

येत्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांना सुगीचे दिवस येतील. …सविस्तर बातमी
14:21 (IST) 12 Sep 2025

बरे झाले नाशिकने राजसाहेबांना नाकारले…मनसेचे बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले ?

नांदगावकर मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. …अधिक वाचा
14:16 (IST) 12 Sep 2025

गणपतीपूळे येथे समुद्रात बुडताना तीन पर्यटकांना वाचविण्यात यश

यावेळी घडलेल्या प्रकारांनतर गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांनी समुद्राच्या पाण्याची व लाटांची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात येत आहे. …सविस्तर वाचा
14:14 (IST) 12 Sep 2025

सेप्सिस : महाराष्ट्रातील सायलेंट किलर! आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान…

१३ सप्टेंबर हा जागतिक सेप्सिस दिन असून यानिमित्त महाराष्ट्रातील आकडेवारीकडे पाहिले असता परिस्थितीचे गंभीर्य स्पष्ट होते. …वाचा सविस्तर
14:14 (IST) 12 Sep 2025

सोने चांदीचा पुन्हा उच्चांक… जळगावमध्ये आता नेमका किती दर ?

सध्या सोन्याच्या किमतीने घेतलेली मोठी उसळी ही अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. …अधिक वाचा
14:12 (IST) 12 Sep 2025

पदभरती अभावी कृषी विभागाचा ‘पोकरा’ प्रकल्प रखडला

कृषी विभागातील माहितीनुसार या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यातील गाव, उपविभाग, जिल्हा पातळीपासून प्रकल्प अमलबजावणी घटकांच्या पर्यंत अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. …वाचा सविस्तर
13:56 (IST) 12 Sep 2025

इचलकरंजीच्या प्रदर्शनात भारताच्या वाढत्या सूत प्रदर्शनाचे दर्शन

इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (इस्फमा) यांच्यावतीने येथे यार्न एक्स्पो इचलकरंजी २०२५ चा शानदार शुभारंभ झाला. …वाचा सविस्तर
13:49 (IST) 12 Sep 2025

Shrikant Jichkar Education: ४२ विद्यापीठ, २० पदव्या, दोनदा युपीएससी उत्तीर्ण… कोण होते श्रीकांत जिचकार

आयएएस अधिकारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला आणि महाराष्ट्र विधानसभा आणि राज्यसभेचे सदस्य झाले. …सविस्तर बातमी
13:42 (IST) 12 Sep 2025

Bombay High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी; पूर्ण न्यायालय रिकामे केले

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा शुक्रवारी दुपारी फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून संपूर्ण न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली. …अधिक वाचा
13:33 (IST) 12 Sep 2025

होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीला ‘आयएमए’ संघटनेचा विरोध

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) व राज्य वैद्यकीय परिषदांचे नियम स्पष्ट असून आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस व त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे. …सविस्तर वाचा
13:27 (IST) 12 Sep 2025

छगन भुजबळ-मनोज जरांगे वाकयुध्दाचा नवीन अंक

भुजबळ यांनी नाशिक येथे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे का, हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन केले. …वाचा सविस्तर
13:20 (IST) 12 Sep 2025

शस्त्र परवाना उत्तरप्रदेशचा वापर महाराष्ट्रात; दोघांना अटक

राज्या बाहेर परवानगी नसताना अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या शस्त्रा सोबत असणारी ११ जीवंत काडतुसे हि जप्त करण्यात आली आहेत. …सविस्तर वाचा
13:17 (IST) 12 Sep 2025

उत्तर महाराष्ट्रातील ‘हा’ ज्येष्ठ नेता शरद पवारांची साथ सोडणार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी उत्साहात पार पडली. मात्र, ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी बैठकीला अनुपस्थित राहिले. …अधिक वाचा
13:17 (IST) 12 Sep 2025

लष्करातील कॅप्टन भासवून गणवेशात फिरणाऱ्या महिलेवर गुन्हा

सैन्य दलात कॅप्टनपदी कार्यरत असल्याचे भासवून आर्मीच्या गणवेषात फिरणाऱ्या महिलेविरुद्ध दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी दुपारी गुन्हा नोंदवला. …सविस्तर बातमी
13:07 (IST) 12 Sep 2025

Solapur Rainfall News : सोलापुरात पाच तासांत १३२ मि.मी पाऊस, पाणीच पाणी चोहीकडे

Solapur Heavy Rainfall in Five Hours : सोलापुरात पूर्वा नक्षत्रावर पाच तासांत विक्रमी म्हणजे १३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. …अधिक वाचा
13:06 (IST) 12 Sep 2025

समाज माध्यमात फिरत असलेल्या जुन्या बातमीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ; नवी मुंबईत पाणीपुरवठा सुरूच राहणार

शुक्रवारी (१२ सप्टेंबर) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची एक बातमी सकाळपासून चर्चेचा विषय बनली आहे. समाज माध्यमात साम टीव्हीवरील एक जुनी बातमी पुन्हा फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. …अधिक वाचा
12:59 (IST) 12 Sep 2025

काटई निळजे उड्डाण पुलावरील खड्डे मास्टेक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने बुजविले; ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर…

राहुल भगत यांच्या पत्रानंतर बुधवारी मध्य रात्री एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी काटई निळजे उड्डाण पुलावर खड्डे बुजविण्याच्या कामांना प्रारंभ केला. …सविस्तर वाचा
12:56 (IST) 12 Sep 2025

दुर्लक्षित बालोद्यानाचे साहित्य स्थलांतरित करणे आवश्यक

गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या स्मशानभूमी लगत असलेल्या बालोद्यानातील खेळणीची दुरावस्था झाली असून त्यामुळे हे साहित्य आता इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेणे आवश्यक आहे. …सविस्तर बातमी
12:51 (IST) 12 Sep 2025

School Bus Accident: नागपुरात दोन स्कूल बसची धडक; ८ विद्यार्थी जखमी… संतप्त जमावाने…

Nagpur Two School Bus Accident : नागपूर शहर हादरवणारी घटना आज शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी घडली आहे. …अधिक वाचा