Mumbai News Today, 15 June 2023: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जाहिरातींवरून मोठा राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आधी एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त असल्याचा दावा करणारी एक जाहिरात सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावरून देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याची चर्चा रंगली. नंतर शिंदे गटानं त्या जाहिरातीशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी दोघांचे फोटो आणि एकत्र लोकप्रियतेची टक्केवारी देणारी जाहिरात प्रसिद्ध केली. यावरून सध्या राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Live Updates

Latest Marathi News Live: महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घडामोडी वाचा एका क्लिकवर!

10:34 (IST) 15 Jun 2023
जमाखर्च : अब्दुल सत्तार, कृषिमंत्री; सरकारची ‘नामी – बदनामी’ करणारे मंत्री

छत्रपती संभाजीनगर : कोणाशी कसे बोलावे याचा तारतम्य भाव सोडून आपला भाेवताल वादाच्या रिंगणात विस्तारत जावा अशी कार्यशैली असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या कृषिमंत्री पदाच्या जमा-खर्चात सरकारची ‘नामी-बदनामी’ करणारा मंत्री अशी नोंद घ्यावी लागेल.

सविस्तर वाचा..

10:32 (IST) 15 Jun 2023
पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच

अमरावती : पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीला प्रति क्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारने तुरीवर साठा मर्यादा लागू केली असली, तरी भावात नरमाई दिसून आली नाही. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

सविस्तर वाचा…

10:31 (IST) 15 Jun 2023
आमदार बच्‍चू कडू म्‍हणतात, “बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल…”

अमरावती : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका करण्‍याची भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची लायकी नाही, त्‍यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे. डॉ. बोंडेंनी बेडकाची उपमा देऊन मुख्‍यमंत्र्यांवर टीका केली, त्‍याचा आम्‍ही निषेध करतो. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल, भाजपच्‍या नेत्‍यांनी अशा प्रकारची वक्‍तव्‍ये करणे टाळावे, अन्‍यथा आम्‍ही योग्‍य उत्‍तर देऊ, असा इशारा प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा..

10:31 (IST) 15 Jun 2023
नागपूर : समलैंगिक युवकाची महिला डॉक्टरच्या वेशात भ्रमंती!

नागपूर : मेयो रुग्णालय परिसरात बुधवारी सकाळी १० च्या सुमारास एका युवकाला महिला डॉक्टरच्या वेशात संशयास्पदरित्या फिरताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या युवकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. प्राथमिक तपासात तो समलैंगिक असल्याचे कळते.

सविस्तर वाचा…

10:30 (IST) 15 Jun 2023
रेल्वेचा उलटा प्रवास! स्वयंचलित यंत्रणेऐवजी आता कर्मचाऱ्यांवर भिस्त

पुणे: ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षात रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसह सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिला जात होता. मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता रेल्वेने स्वयंचलित यंत्रणेऐवजी मानवी तपासणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

वाचा सविस्तर…

10:30 (IST) 15 Jun 2023
५० कुठे आणि १०५ कुठे? उल्हासनगरात भाजपाने उडवली शिवसेनेची खिल्ली

उल्हासनगर: डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना आणि भाजपा यांतील अंतर्गत वाद आता उल्हासनगर शहरापर्यंत पोहोचला असून शिवसेनेने बॅनर माध्यमातून भाजपाला डिवचल्यानंतर आता भाजपानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. ५० कुठे आणि १०५ कुठे अशा आशयाचा बॅनर लावून भाजपाने शिवसेनेच्या ताकदीची खिल्ली उडवली आहे.

सविस्तर वाचा…

10:29 (IST) 15 Jun 2023
भारतात वृद्ध स्त्रियांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले, ‘हेल्पेज इंडिया’चे निरीक्षण; जागतिक ज्येष्ठांवर होणारे अत्याचार जागरूकता दिन विशेष

नागपूर : स्त्रिया जशा वृद्ध होत जातात, तसे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण हेल्पेज इंडियाने नोंदवले आहे. १५ जून रोजी जागतिक ज्येष्ठांवर होणारे अत्याचार जागरूकता दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

सविस्तर वाचा…

10:28 (IST) 15 Jun 2023
नाशिक: मारहाण करुन त्रिकूटाकडून ५० हजार लंपास

नाशिक: शिवाजीनगर भागात दुग्ध व्यावसायिकासह मालवाहू वाहन चालकाला त्रिकूटाने मारहाण करीत खिशातील ५० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.

सविस्तर वाचा…

10:17 (IST) 15 Jun 2023
देवेंद्र फडणवीसांचं ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी ट्वीट; म्हणाले, “आदिपुरुष प्रभू श्रीराम…!”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या यशासाठी ट्वीट केलं आहे.

वाचा सविस्तर

10:17 (IST) 15 Jun 2023
“नोटबंदीसारखे उटपटांग निर्णय घेऊन…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘त्या’ अहवालावरून टीकास्र!

“हिंदुस्थानातील अतिश्रीमंतांना आपला देश आता सोडला पाहिजे असे का वाटत असावे?”

वाचा सविस्तर

10:15 (IST) 15 Jun 2023
Maharashtra Political News Updates: आज शिंदे-फडणवीस एकाच मंचावर!

जाहिरातींमधील दाव्यांवरून एकनाथ शिंदे गट आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगल्यानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Latest Marathi News Live: महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घडामोडी वाचा एका क्लिकवर!