Maharashtra News Updates, 29 September 2025 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणेसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता. रविवारी देखील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच राज्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजच्या दिवसभरातील पाऊस आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहाणार आहोत.

Live Updates

Maharashtra News Live Today : राज्यातील पावसाशी संबंधीत सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर –

08:59 (IST) 29 Sep 2025

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये किती पाणीसाठा?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये किती पाणीसाठा आहे. याची आज सकाळी ६ वाजेपर्यंतची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने जारी केली आहे.

08:56 (IST) 29 Sep 2025

राज्यात आजही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज! ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

राज्यातील अनेक ठिकाणी आजही अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात आज कुठे किती पाऊस असेल?

अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट परिसर

मुसळधार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक , सातारा घाट परिसर

मेघगर्जनेसह : अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर

Maharashtra News Live Today : राज्यातील पावसाशी संबंधीत सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर –