Mumbai-Maharashtra News Updates, 08 November 2022 :आगामी विधानसभा, लोकसभा तसेच महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून मुंबईमध्ये ‘जागर मुंबईचा’ या मोहिमेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटावर टीका केली जात आहे. सध्या काँग्रसेची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात दाखल झाली आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे सर्व नेते या यात्रेला यशस्वी करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ टिप्पणी केली. या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

तर दुसरीकडे गुजरात, हिमचाल प्रदेशच्या निवडणुकीमुळे देशपातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यासह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra News Updates : महाराष्ट्रासह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

10:57 (IST) 8 Nov 2022
पीएफआयचे देशात ५० हजारांहून अधिक सदस्य!; २०१७ मध्येच १९ पानी दस्तावेज तयार

‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) या अतिरेकी संघटनेशी ‘पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सदस्यांचा थेट संबंध असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०१७मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केलेल्या १९ पानी डॅासिअरमध्ये (दस्तावेज) दिली होती, असे कळते. त्यावेळी या संघटनेचे अस्तित्व दक्षिणेतील केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांपुरतेच होते.

सविस्तर वाचा…

10:50 (IST) 8 Nov 2022
उद्धव ठाकरे अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विळख्यात; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

पिंपरी : इतकी वाताहत झाल्यानंतरही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विळख्यातच अडकलेले आहेत, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.‘पूर्वीची शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कचाट्यात सापडलेली होती. बातमी वाचा सविस्तर…

10:48 (IST) 8 Nov 2022
“हिंदू शब्दाचा अर्थ ऐकून लाज वाटेल” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद, ‘हिंदू’ पर्शियन शब्द असल्याचाही दावा

कर्नाटकातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोली यांच्या एका वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. “हिंदू’ शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे” असे जारकीहोली यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी वाचा…

10:46 (IST) 8 Nov 2022
VIDEO: “गुटखा खा, दारू प्या, नाही तर…”, जल संवर्धनावरुन भाजपा खासदाराचे अजब वक्तव्य; म्हणाले, “जेव्हा पैसा खर्च कराल तेव्हाच…”

जल संवर्धनाच्या मुद्द्यावरुन मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपा खासदार जनार्धन मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. “जमिनीतील पाणी आटत चाललं आहे. त्यामुळे पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा… पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या”, असं वक्तव्य मिश्रा यांनी रेवामध्ये जल संवर्धनाच्या शिबिरात केलं आहे.

सविस्तर बातमी वाचा…

10:45 (IST) 8 Nov 2022
“महिला जास्त प्रमाणात दारु पितात म्हणून जन्मदर घसरला”; नेत्याचा जावई शोध

महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पोलंडचे सत्ताधारी पक्षाचे नेते जारास्ल्हव काझीन्स्की यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. “महिला जास्त प्रमाणात दारू पित असल्यानं देशात जन्मदर घसरला आहे “, असं वादग्रस्त विधान काझीन्स्की यांनी केलं आहे.

सविस्तर बातमी वाचा…

10:41 (IST) 8 Nov 2022
Dapoli Resort: अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली रिसॉर्ट प्रकरणात एफआयआर दाखल

दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकरणात रत्नागिरीतील दापोली पोलीस ठाण्यात सोमय्या यांच्यासह आणखी काही जणांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी वाचा…

10:30 (IST) 8 Nov 2022
नवमतदारांना मतदार यादीत आगाऊ नाव नोंदविण्याची संधी; १७ वर्षे पूर्ण होताच करता येणार अर्ज

पुणे : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी १८ वर्षे वयाची अट असली, तरी आता १७ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी आगाऊ अर्ज करता येणार आहे. १८ वर्षे पूर्ण होताच अर्ज करणाऱ्या संबंधित नवमतदारांची नावे यादीत येणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

10:21 (IST) 8 Nov 2022
नागपूर : हिवाळी अधिवेशन दोनच आठवड्याचे!

विरोधकांनी आग्रह केल्यास नागपुरात होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तीन आठवड्याचे घेऊ, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात दिले असले तरी, अधिवेशनासाठी सांसदीय कार्य विभागाने तयार केलेल्या तात्पुरत्या कामकाज दिनदर्शिकेत दोनच आठवड्याचे कामकाज दर्शवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

10:20 (IST) 8 Nov 2022
नागपूर : मोबाईलवर गेम खेळताना मुलाला एक फोन आला, त्याला एक ‘ॲप डाऊनलोड’ करण्यास सांगण्यात आले, पुढे झाले असे की…

मोबाईलवर गेम खेळताना मुलाला एक फोन आला. त्याला एक ‘ॲप डाऊनलोड’ करण्यास सांगण्यात आले. मुलाने ‘ॲप डाऊनलोड’ करताच खात्यातून ७८ हजार परस्पर काढल्याचा मोबाईलवर संदेश आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

10:16 (IST) 8 Nov 2022
पुणे महापालिकेत लवकरच २०० पदांची भरती; आयुक्तांची माहिती

पुणे : महापालिकेत नव्या २०० पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. महापालिकेकडून सध्या ४४८ पदांची भरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आणली आहे. बातमी वाचा सविस्तर…

10:14 (IST) 8 Nov 2022
नागपूर : मोबाईलवर गेम खेळताना मुलाला एक फोन आला, त्याला एक ‘ॲप डाऊनलोड’ करण्यास सांगण्यात आले, पुढे झाले असे की…

मोबाईलवर गेम खेळताना मुलाला एक फोन आला. त्याला एक ‘ॲप डाऊनलोड’ करण्यास सांगण्यात आले. मुलाने ‘ॲप डाऊनलोड’ करताच खात्यातून ७८ हजार परस्पर काढल्याचा मोबाईलवर संदेश आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोना मुदर्ले (३०, इसासनी) यांच्या मोबाईलवर पाच वर्षीय मुलगा गेम खेळत होता.

सविस्तर वाचा…

10:13 (IST) 8 Nov 2022
नागपूरला मिळाले ११ नवे पोलीस अधिकारी, ७ अधिकाऱ्यांची शहरातून बदली

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आज सोमवारी गृहमंत्रालयाने जाहीर केल्या. त्यात नागपुरात नव्याने ११ पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली असून नागपुरातून ७ अधिकाऱ्यांच्या शहराबाहेर बदल्या झाल्या आहेत. गृहमंत्र्याचे शहरात आयुक्तालयाचा कारभार फक्त चारच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर होता. सविस्तर वाचा…

10:12 (IST) 8 Nov 2022
नागपूर : मित्राच्या प्रेयसीला धमकी देऊन मागितली एक लाख खंडणी

एका व्यक्तीने मित्राला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह काही गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या मित्राने मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड केला. ती रेकॉर्डिंग समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्राच्या प्रेयसीला १ लाखाची खंडणी मागितली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

सविस्तर वाचा…

10:05 (IST) 8 Nov 2022
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये गेल्या दहा दिवसातील सर्वांत मोठी घट; पाहा नवे दर

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. वाचा सविस्तर

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज