Maharashtra News Today, 27 October 2023 : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे-पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे. तर, “कृषिमंत्री असताना काय केले?” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह विविध बातम्या जाणून घेणार आहोत….
Mumbai News in Marathi : राजकीय, क्राइम आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोड, एका क्लिकवर….
मुंबईः मालवणी परिसरातील एका इमरतीच्या सुरक्षा रक्षकाने १० वर्षाचा मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी, शिवसेना यासह सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या.
पिंपरी : वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे.
उरण : शुक्रवारी सकाळी ९ वाजता ऐनवेळी जेएनपीटी कामगार वसाहती नजीक एनएमएमटी बस नादुरुस्त झाली. त्यामुळे नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
शहर काँग्रेस भवन येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
उरण : शहरातील उरण मोरा मार्गावरील बोरी परिसरातील भंगाराच्या गोदमाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता आग लागली आहे. या परिसरात नागरी वस्तीलाही या आगीचा फटका बसण्याची शक्यता आहे. आग विझविण्यासाठी सिडकोच्या अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, आग विझविण्याचे काम सुरू आहे.
नागपूर: मध्यरात्री सक्करदरा आणि नंदनवन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दरोड्याच्या तयारीत असणार्या दोन टोळ्यांना गजाआड केले. दोन्ही कारवायांमध्ये दोन्ही टोळ्यांतील ८ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणास विरोध करणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही साथ सोडत असल्याचे सांगितले.
नागपूर: शहरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूर हा अपहरण केल्याच्या गुन्ह्यात फरार आहे. मात्र, त्याच्या साथिदारांनी तक्रारदार युवकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार मागे घेण्याची धमकी दिली आहे.
झोपलेले मजूर आणि भिक्षेकरू, फलाट आणि जिन्यांवर पडलेला कचरा, प्रतिक्षालयामागील बाजूस गुटखा आणि पानाच्या मारलेल्या पिचकाऱ्या, असे चित्र दिसून येते.
धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
वाशिम: शहरातील रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून देखील अर्धवट बांधण्यात आले आहेत. एक दोन महिने उलटले तरी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. एका बाजूचे सिमेंट काँक्रिट पूर्ण झाले. दुसरी बाजू तशीच आहे. रस्त्यावरील चेंबर उघडेच आहेत.
नागपूर: उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी संदर्भात केस टिकवली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. खरे तर त्यांनी मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर: मद्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मद्यविक्री दुकानांबद्दल नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी मद्यालये व बियर शॉपी परवाना वाटपाचा धडाका सुरू केला आहे.
“सरकारकडे वेळ आहे, पुरावे आहेत, तरी आरक्षण देत नाहीत. कुणाला विचारून समितीला वेळ वाढवून दिला. आता आम्हाला समिती मान्य नाही,” असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे.
वर्धा : शालेय शिक्षण विभागाने विशेष गरजा असणाऱ्या म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत मिळणार आहे.
पिंपरी : मोशीतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या ७०० टन क्षमतेच्या प्रकल्पामधून प्रतिदिन १२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यातून १४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करणे हा उद्देश या प्रकल्पाच्या माध्यमातून साध्य होत असून महापालिकेच्या खर्चातही बचत करणारा हा प्रकल्प ठरत असल्याचा दावा आयुक्त शेखर सिंह यांनी केला.
मुंबईः वडाळा पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ (एमबीपीटी) महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर एमबीपीटी परिसरात मृतदेह आणून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
वर्धा: तळेगावलगत शिरकुटणी येथे आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी आता तपासानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : शहरातील गोर-गरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगावमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरात ‘पीपीपी’ तत्वावर सुरू असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे.
जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नागपूर: विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शुन्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपुर्ण उपाययोजना करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.
चंद्रपूर: शहरात अमृत पाणी पुरवठा अभियान राबविण्यात आले. त्यावर सुमारे ४०० कोटीहून अधिक रुपये खर्च झाले. आता अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर महापालिकेला २७०.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघात तहसीलदार डॉ. अहिरराव यांनी काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची श्रृंखला सुरु केली.
तिचे मार्च २०१७ मध्ये लग्न झाले. तेव्हापासून सासरा लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याची तक्रार तिने दिली आहे.
दररोज या जलवाहिनीमध्ये पाय अडकून चार ते पाच नागरिक पडत असतात.
श्रीवर्धन येथे इंडीया आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणावरून कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे.
वाशिम: अनेकजण महागडी विदेशी दारू पितात. मात्र, हल्ली विदेशी दारू बनावट असल्याचे आढळून येत असल्याने अनेकांना गंभीर आजार उद्भवत आहे.
शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
केंद्र सरकारने योजनांची अंमलबजावणी करताना गरिबांच्या कल्याणाला प्राधान्यक्रम दिला आहे. योजनांची यशस्वी अंमलबजावणी हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राज्यातील २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही देतानाच केंद्र सरकारने विकासाच्या बाबतीत शेतकरी हा प्राधान्यक्रम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.