उरण : शुक्रवारी सकाळी ९ वाजता ऐनवेळी जेएनपीटी कामगार वसाहती नजीक एनएमएमटी बस नादुरुस्त झाली. त्यामुळे नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ही बस रस्त्यात बंद पडल्याने उरण पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. उरणमधील नागरिकांना प्रवासासाठी महत्त्वाची ठरत असलेल्या या बस सेवेमुळे जलद प्रवासाची व्यवस्था झाली आहे. मात्र सातत्याने बंद होणाऱ्या बसमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या उरण मार्गावरील बस नादुरुस्त होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडावा लागला. आशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उरण ते नवी मुंबईतील मार्गावरील विद्यार्थी, महिला व चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्त्वाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘एनएमएमटी’च्या बस सातत्याने बंद पडू लागल्या आहेत. या बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

हेही वाचा – ऐरोलीत रविवारी वीज पुरवठा होणार नाही

हेही वाचा – उरण : बोरी नाका परिसरातील भंगार गोदामाला आग

यामध्ये भरपावसात इलेक्ट्रिक व आता साध्या बसही बंद पडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी सेवेच्या बसेस उरणपर्यंत येत आहेत. यातील अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.