Mumbai Maharashtra News Live Updates, 03 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मनसेच्या युतीबाबतचे संकेत दिले आहेत. ‘मराठीच्या मुद्द्यावर मी आणि राज ठाकरे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. या बरोबरच नारायणगडावरून मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, यासह शेतकऱ्यांना पगार सुरू करा, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Pune Crime News: दसऱ्याच्या दिवशी किरकोळ वादातून वडिलांवर चाकूने वार करून खून; कोथरूडमधील घटना
राजापूर कोदवली येथे महिलेला कार मध्ये बसवून लुटण्याचा प्रयत्न; कार चालकाचा शोध सुरु
उद्योग खात्यातील सामंतांच्या ‘उद्योगावर’ मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराचे लक्ष
राज्यातील शाळांची दशा आणि दिशा बदण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचा प्रयोग
अन्न सुरक्षा लाभार्थी निवडीत अनियमितता; मंजूर धान्य परत जाण्याची भीती
Live : ‘तुमच्या सारखा रिक्षावाला पाच लाख कोटींचा मालक कसा झाला?’ संजय राऊतांचा शिंदेंना सवाल
“तुमच्या सारखा रिक्षावाला आज पाच लाख कोटींचा मालक कसा झाला? हे तुम्हाला कोणामुळे शक्य झालं, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच, अन्यथा तुम्ही कोण होता? याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. ते काय होतो आणि कोणामुळे आज या पदावर आहे, याचा विचार त्यांनी करावा. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दानत होती, म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले”, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंकडून युतीसाठी मनाची तयारी असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कोकणातली राजकीय गणितं बदलणार? राजन तेली शिंदे गटात; ठाकरेंना सोडण्याचं दिलं ‘हे’ कारण!
कधीकाळी कट्टर शिवसैनिक असणारे कोकणातील नेते राजन तेली भाजपा, ठाकरे गट असा प्रवास करत शिंदे गटात दाखल झाले आहेत. राजन तेलींच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कधीकाळी नारायण राणे, नितेश राणे व दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे राजन तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ताधारी पक्षात डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणं आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजन तेलींनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमध्ये या राजकीय समीकरणांची बीजं असल्याचं म्हटलं जात आहे.
कोकणातली राजकीय गणितं बदलणार? राजन तेली शिंदे गटात; ठाकरेंना सोडण्याचं दिलं ‘हे’ कारण!, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)