Maharashtra Political New Live Updates, 11November 2025 : दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काहीही झालं तरीही मनसेसह जायचं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महापालिका आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. या बातमीसह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : दिल्लीत झालेला कारचा स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश, नाना पटोलेंची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 

16:45 (IST) 11 Nov 2025

ठाकरेंचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर आज शिंदेच्या शिवसेनेत ?

शिवसेनेचे (ऊद्धव ठाकरे) जालना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर बुधवारी (दिनांक १२ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकल्याकडून सांगितले जात आहे. …सविस्तर बातमी
16:29 (IST) 11 Nov 2025

ISRO Study Tour : महाराष्ट्रातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड…!

गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी जानेवारी महिन्यात इस्रो आयआयटी सायन्स सिटी आयआयएम या, शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. …अधिक वाचा
16:19 (IST) 11 Nov 2025

वाळू साठ्याचे गौडबंगाल… जळगावात बांधकाम विभागावर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार !

जिल्ह्यात विविध कारणांमुळे वाळू ठेक्यांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असताना, या संधीचा गैरफायदा घेत वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला आहे. …अधिक वाचा
16:05 (IST) 11 Nov 2025

एकनाथ शिंदे यांचा महायुतीसाठी आदेश पण… दादा भुसे यांच्या विधानाचा अर्थ काय ?

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा मालेगाव येथे जंगी मेळावा पार पडला. …सविस्तर वाचा
15:59 (IST) 11 Nov 2025

Vasai Virar Update: दिल्लीतील स्फोटानंतर वसई रेल्वे स्थानकात पोलिसांची विशेष तपासणी मोहीम

सोमवारी रात्री वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या रेल्वे स्थानकात सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून तोडफोड विरोधी (Anti-Sabotage) तपासणी मोहीम राबविण्यात आली. …सविस्तर वाचा
15:53 (IST) 11 Nov 2025

धुळे : १९ प्रभागात ७४ जागांसाठी आरक्षण सोडत : ३७ महिलांना महापालिका सभागृहात संधी

धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार आज सकाळी धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर येथे धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने १९ प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. …सविस्तर वाचा
15:46 (IST) 11 Nov 2025

नवी मुंबईत पुन्हा ‘महिला राज’! १११ पैकी तब्बल ५६ जागा महिलांसाठी राखीव

तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे माजी नगरसेवक, राजकीय इच्छुक उमेदवार आणि नवीन चेहरे यांचे लक्ष लागून आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत …सविस्तर वाचा
15:45 (IST) 11 Nov 2025

प्रोटिओमिक्स तंत्रामुळे मधुमेह व मूत्रपिंड विकाराचा त्रास आधीच ओळखता येणार!

भारतामध्ये सध्या आठ कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह असून जवळपास १३ कोटी जण प्रि-डायबेटिक श्रेणीत आहेत. निदानासाठी प्रचलित चाचण्या दोष दाखवतात तेव्हा शरीरातील नुकसान मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले असते, असा इशारा तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. …अधिक वाचा
15:37 (IST) 11 Nov 2025

यवतमाळ : महायुती नाही, पण शिवसेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपकडून अद्याप…

नगरपालिकेच्या नामांकनासाठी अवघा आठवडा उरला असताना, एकाही पक्षाकडून अद्याप नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित झालेले नाही. …सविस्तर वाचा
15:28 (IST) 11 Nov 2025

Gold-Silver Price : अबब ! सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडले… जळगावमध्ये आता काय स्थिती ?

लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे कठीण होत चालले असून, वाढत्या किमतींमुळे चिंता निर्माण झाली आहे. …वाचा सविस्तर
15:21 (IST) 11 Nov 2025

नाशिक परिक्रमा महामार्ग एमएसआरडीसीकडून एमएसआयडीसीकडे…

नाशिक परिक्रमा महामार्ग ६६ किमीचा असून यासाठी अंदाजे ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. …अधिक वाचा
15:03 (IST) 11 Nov 2025

नायगाव बीडीडीतील ८६४ घरांचे चावी वाटप लांबणीवर, मुख्यमंत्र्यांनी उद्याचा कार्यक्रम पुढे ढकलला

मुंबईतील आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षिततेचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत. या कारणाने मुख्यमंत्र्यांनी चावी वाटप कार्यक्रम पुढे ढकलला असावा अशी चर्चा आहे. …सविस्तर वाचा
14:52 (IST) 11 Nov 2025

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील माजी विद्यार्थ्यांना पुण्याचे वेध…कारण काय ?

“शाळेच्या गप्पा-आठवणींची मस्ती, पुण्यात पुन्हा तीच दोस्ती!” हे भावनिक घोषवाक्य या माजी विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहे. त्यासाठी हे सर्व माजी विद्यार्थी पुण्याला जाणार आहेत. …अधिक वाचा
14:51 (IST) 11 Nov 2025

मुंबई: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता (ओबीसी)६१ जागा राखीव

ओबीसी आरक्षणातून आपला प्रभाग सुटल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. …वाचा सविस्तर
14:47 (IST) 11 Nov 2025

PCMC Election : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न

राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून उपस्थित होते,त्यांच्या नियंत्रणाखाली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. …वाचा सविस्तर
14:34 (IST) 11 Nov 2025

कोल्हापुरात बिबट्याची दहशत, एका कर्मचाऱ्यावर हल्ला

कोल्हापूर शहरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. कारण महावितरण कार्यालयाच्या परिसरात बिबट्या अडकला आहे. वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहेत. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

14:33 (IST) 11 Nov 2025

Delhi blast : दिल्ली स्फोटानंतर ठाणे पोलीस सतर्क; बाँब शोधक पथके तैनात, हाॅटेल, गर्दीच्या ठिकाणांची तपासणी, नाकाबंदीला सुरुवात

Thane Police : लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीस सतर्क झाले आहे. …सविस्तर वाचा
14:22 (IST) 11 Nov 2025

TET Exam 2025 : बायोमेट्रिक हजेरी, एआय, टीईटी परीक्षेसाठी काय काय…शिक्षकांनो ‘हे’ ध्यानात ठेवा

TET : महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे. …वाचा सविस्तर
14:08 (IST) 11 Nov 2025

धुळ्याच्या गुहेगारी वर्तुळात खळबळ; दहशत निर्माण करणारी टोळी जिल्ह्यातून तडीपार….

देवपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत पाच गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. …वाचा सविस्तर
14:02 (IST) 11 Nov 2025

मुंबई विमानतळावर १४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त… तीन दिवसात पाच वेगवेगळ्या कारवाया

३ दिवसांत ५ वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १४ कोटी रुपयांचा हायड्रो गांजा, तसेच ३७ लाखांचे तस्करी करून आणलेले सोने जप्त केले. या कारवाया ६ ते ९ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आल्या. …अधिक वाचा
13:59 (IST) 11 Nov 2025

Nashik Local Body Elections : छगन भुजबळ यांना डाॅक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला; समीर भुजबळ किल्ला लढविण्यासाठी तळ ठोकून

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अलीकडेच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. …अधिक वाचा
13:49 (IST) 11 Nov 2025

कूपर रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक होणार तैनात, नियुक्तीपर्यंत प्रत्येक पाळीमध्ये पालिकेच्या आठ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली त्यावेळी खासगी सुरक्षारक्षक हा बघ्याची भूमिका घेऊन उभा होता. …अधिक वाचा
13:44 (IST) 11 Nov 2025

वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरला; महिला वारकऱ्याचा मृत्यू, ८ जण जखमी

ही घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली आहे. प्रियांका तांडेल वय- ५५ वर्षे असे मृत झालेल्या महिला वारकऱ्याचे नाव आहे. …वाचा सविस्तर
13:33 (IST) 11 Nov 2025

पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पदभारात झाले बदल, आयुक्तांनी काढले आदेश !

महापालिकेत राज्य सरकारकडून गेल्या आठवड्यात तीन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. …अधिक वाचा
13:26 (IST) 11 Nov 2025

मनोज जरांगे-पाटील चौकशीला गैरहजर… वकिलांनी मांडली बाजू

प्रकृती अस्वस्थ्यामुळे मनोज जरांगे – पाटील चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने ॲड. आशिषराजे गायकवाड यांनी बाजू माडली. …अधिक वाचा
13:14 (IST) 11 Nov 2025

कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाची भिस्त काँग्रेसवर

कोल्हापुरात ठाकरे सेनेला काँग्रेसच्या कृपादृष्टीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. …सविस्तर बातमी
13:11 (IST) 11 Nov 2025

उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी, चेंबूरस्थित इमारत बांधकामास गती देण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश

शैक्षणिक संकुल कार्यान्वित झाल्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय सेवांना गती आणि विद्यार्थ्यांना, नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा, माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. …अधिक वाचा
12:53 (IST) 11 Nov 2025

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक पॉलिमर केमिस्ट्री संशोधन प्रयोगशाळा, युरोफिन्सच्या सीएसआर निधीतून अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित

संशोधन प्रयोगशाळेमुळे रसायनशास्त्र विभागाची संशोधन क्षमता वाढून पॉलिमर संशोधन, स्मार्ट कोटिंग्ज, बॅटरी आणि नॅनोमटेरियल्स या क्षेत्रांतील अद्ययावत संशोधन करण्यास मदत होणार आहे. …सविस्तर वाचा
12:38 (IST) 11 Nov 2025

‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची विजयी पताका, तब्बल २० वेळा विजेते होण्याचा मान

विद्यापीठाने सहा सुवर्ण, १० रौप्य आणि एक कांस्य पदकांची कमाई करून चमकदार कामगिरी केली आहे. …सविस्तर वाचा
12:18 (IST) 11 Nov 2025

अलिबागचे राजकारण पुन्हा एकदा ‘नाईक’ कुटूंबा भोवती….

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग नगर पालिकेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी

दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.