Marathi News Updates Today, 23 May 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजपा विरोधी आघाडीच्या प्रयत्नांची जोरदार चर्चा चालू असताना विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत नेमकं कोणत्या सूत्रानुसार जागावाटप होईल? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
Mumbai News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
कल्याण – देवतेविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप करत कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील एका अल्पवयीन मुलाला अटाळी, वडवली, वाडेघर भागातील तरुण-तरुणींच्या जमावाने दोन दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. या मुलाची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली.
नांदेड : ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा देशभर विस्तार करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पूर्वीच केली आहे. राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, राव यांनी राज्यातील घडामोडीमध्ये स्वत: लक्ष घातले आहे.
मुंबई: एक तडीपार गुंड भायखळा पोलीस ठाण्यात ब्लेड घेऊन आला आणि एकच खळबळ उडाली. एका व्यक्तीची तक्रार करण्यासाठी आलेल्या या गुंडाने संबंधिताला तात्काळ अटक करा अन्यथा मी स्वतःला ब्लेड मारून तुम्हाला या प्रकरणात गुंतवीन, असे धमकावत गोंधळ घातला.
त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असताना तेव्हा मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला गेला – नितेश राणे
एक हिंदू म्हणून आम्ही महाआरती करण्यासाठी आलो आहोत. या भागाची शांतता भंग करणं हा आमचा कुणाचाही हेतू नाही. पण सातत्याने १३ मे ला घडलेल्या घटनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. हिंदुंची बदनामी केली जात आहे. त्या सर्व बाबत आम्ही इथे भेट देण्यासाठी आलोय. अनेक वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातंय. पण ते चुकीचं आहे. आम्ही विश्वस्त मंडळाशी बोललोय. उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. तिथे ते कुणाला धूप दाखवतात हा त्यांचा प्रश्न आहे. तेव्हा मंदिरात प्रवेश करणारे १० ते १५ युवक हे जिहादी विचारांचे होते – नितेश राणे
मुंबई: संकटग्रस्त महिलांना खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी एकाच छताखाली मदत उपलब्ध करणे, वैद्यकीय, कायदेशीर सुविधा देण्याच्या उद्देशाने राज्यात जिल्हानिहाय ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना सुरू करण्यात आली.
आशिष शेलारांना मी चांगलं ओळखतो. परवा मीडियाला त्यांनी एक क्लिप दाखवली. ती दाखवताना त्यांनी सांगितलं की कर्नाटकात ते घडलं. तिथे गायींची हत्या झाल्याचं सांगितलं. पण त्याच्या खोलात गेल्यावर ती मणिपूरची क्लिप होती असं समोर आलं. राज्यात महत्त्वाच्या पदावर, सत्तेत असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचा नेता जर असं करत असेल…इतरांनी कुणी दाखवली असती तर मी समजू शकलो असतो. आम्हाला अशी क्लिप दाखवायची असेल, तर त्याची आम्ही आधी शहानिशा करायला हवी. तथ्य नसेल, तर त्यासाठी आम्ही जबाबदार असतो. आशिष शेलारांनी दाखवलेली क्लिप धडधडीत मणिपूरची असल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे. पण भारतात अनेक धर्मांची, जातीची लोकं राहतात. प्रत्येकाचा आहार, पोशाख वेगवेगळा असतो. ही आपली भारतीय परंपरा आहे. मध्ये देवदर्शनाला जाताना काय पोशाख असाला, याबाबतही विधानं आली – अजित पवार</p>
मुंबई : मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत सात झोपड्या भस्मसात झाल्या, तर १३ जण जखमी झाले. या आगीत पाच कुत्रे मृत्युमुखी पडले. गेल्या चार महिन्यांतील आप्पापाडा येथील ही आगीची तिसरी घटना आहे.
ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत आणि खारेगाव खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीचा भार वाढून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. साकेत पूल ते मानकोली पुलापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याने ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे कोंडीत हाल झाले आहे.
11 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर वर निर्णय दिला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निकाल आमच्याच बाजूने हे सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. या सगळ्या घाई गडबडीत गोंधळाला तो सामान्य माणूस – जितेंद्र आव्हाड
11 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर वर निर्णय दिला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निकाल आमच्याच बाजूने हे सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. या सगळ्या घाई गडबडीत गोंधळाला तो सामान्य माणूस.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 23, 2023
नेमकं काय म्हणलं सर्वोच्च न्यायालय
कोणती निरीक्षणं… pic.twitter.com/QZmmOFiZqy
पिंपरी : दांडियाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या भांडणाचा आणि चिखली परिसरात वाढत चाललेली प्रतिष्ठा याचा राग मनात धरून मित्राने दुग्धव्यावसायिक तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याचे समोर आले.
ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या नालेसफाई तसेच रस्त्यांच्या कामांची सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित झालेल्या या दौऱ्यात भाजपाला डावलल्याची बाब समोर आली असून, याच मुद्द्यावरून भाजपामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यानिमित्ताने ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये विसंवाद असल्याचे चित्र समोर आले आहे.
पुणे : गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मंगळवारी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रूप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी गर्दी केली होती.
कल्याण – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना नवी मुंबई, तळोजा भागातून येणारे अवजड वाहनचालक दिवसा शिळफाटा रस्त्यावरून वाहने घेऊन जात असल्याने डायघर, कल्याणमधील वाहतूक पोलिसांची कोंडी होत आहे.
महागाई, बेरोजगारीवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दुसरा मुद्दा नाही म्हणून यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. ९ वर्षं झाली आहेत. एकच वर्षं राहिलंय. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर मनात थोडीशी भीती वाटत असेल, शंका येत असेल, तर काय केल्यावर आपल्याला जनाधार मिळेल यासाठी हा प्रयत्न असू शकतो – अजित पवार
जळगाव – जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भुसावळ नदीपात्रात दोन मुलांचा, तर जळगावनजीक गिरणा नदीपात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या संदर्भात पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितेश राणे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आरती करणार
नाशिक: शहरातून दरवर्षी शेकडो मुस्लीम बांधव हज यात्रेला जातात. हज यात्रेपूर्वी त्यांना अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. या सोबत त्यांची वैद्यकीय तपासणी व लसीकरण करणे आवश्यक आहे.
अमरावती : 'माझ्या घरची वीज कापलीच कशी' असा सवाल करीत एका तरूणाने महावितरणच्या कार्यालयात शिरून कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना येथील एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावर घडली. मारहाणीच्या या घटनेचा व्हीडिओ सध्या समाज माध्यमावर प्रसारीत झाला आहे.
भाजपा सरकारला केंद्रात नऊ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण नसल्याची बाब समोर आली आहे. यावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. आता, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्रावर टीका केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रपती पदाच्या निवडीबाबतही मोठा दावा केला आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची काल (२२ मे) तब्बल साडेनऊ तास ईडी चौकशी झाली. ईडीने समन्स बजावल्यापासून चौकशी होईपर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी याप्रकरणी भाष्य करणं टाळलं होतं. अखेर याप्रकरणावरील मौन अजित पवारांनी सोडलं असून जयंत पाटलांच्या चौकशीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
नाशिक: तापमानात चढ-उतार होत असले तरी उष्णतेची लाट कायम आहे. नाशिक शहरात पारा ३७.५ तर मनमाडमध्ये ३९ अंशांची नोंद झाली. प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना सटाणा तालुक्यातील नामपूर भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पुणे : ऑनलाइन औषध खरेदी प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या चोरट्यास चंदननगर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. समीर नरेश रॉय (वय २१, रा. बज्रपुकुर, दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत खराडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती.
स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार – अजित पवार
सांगली : भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे घडली. याप्रकरणी अंनिसच्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी रात्री मांत्रिकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती : अमरावती – दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर इटकी फाट्यानजीक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत.
समीर वानखेडेंना तात्पुरता दिलासा दिला आहे. पण केससंदर्भातले पुरावे माध्यमांना शेअर न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ८ जूनला पुढची सुनावणी होणार आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरूख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे. तेव्हा नवाब मलिकांनी भूमिका मांडली तेव्हा त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला – अजित पवार
नोटबंदीच करायची म्हटलं तर खऱ्या अर्थाने ज्यांनी काळा पैसा साठवलाय, तो बाहेर काढण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत देण्याचं काय कारण होतं? घोषणा झाली, त्याच दिवशी नोट बंद करता आली असती. चलनात फिरणारा पैसा वाचवता आला असता. त्याच दिवशी ती नोट बंद करायला पाहिजे होती. सप्टेंबरपर्यंत चार महिन्यांची मुदत दिली आहे – अजित पवार
त्यांनी राष्ट्रवादीलाच टार्गेट केलंय. कुणावरही खोटे आरोप लावायचे आणि त्याची चौकशी चालू करायची असं चाललंय. तुम्हाला चौकशांमध्ये एकही भाजपाचा नेता दिसणार नाही. फक्त विरोधकांना त्रास द्यायचं काम चालू आहे – अनिल देशमुख
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम प्रकल्पात २० पेक्षा अधिक सदनिका किंवा दुकाने असतील, तर त्या प्रकल्पांमध्ये दस्त नोंदणीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेंतर्गत नागरिकांना दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नसून बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातच दस्त नोंदणी केली जाते. त्यानुसार पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांतील सुमारे ११० प्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर