Maharashtra Weather Update Today, 1 August 2023 : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी राज्यात मोठा अपघात झाला आहे. शहापूर येथे समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बचावकार्य सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने अवघ्या राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अेनक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय. दरम्यान, शहापूर येथे मोठा अपघात झाल्याने मोदी आज तिथे भेट देतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

11:56 (IST) 1 Aug 2023
प्रतिक पाटलांकडून विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन

11:54 (IST) 1 Aug 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

11:52 (IST) 1 Aug 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गणपतीची महाआरती

11:42 (IST) 1 Aug 2023
मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांकडे सोपवली जबाबदारी

अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे.

सविस्तर वाचा

11:37 (IST) 1 Aug 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक

11:32 (IST) 1 Aug 2023
लोकमान्यांच्या चतुसूत्रीला वास्तवात आणणारे दूरदर्शी नेते, बावनकुळेंकडून मोदीचं कौतुक

11:31 (IST) 1 Aug 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक सुरू झाला आहे. थोड्याच वेळात मोदी करणार महाआरती.

11:30 (IST) 1 Aug 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, कसा आहे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?

पुणेकरांच्या सेवेत दाखल होणाऱ्या पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात नेमक्या कोणत्या मार्गांचा समावेश आहे?

वाचा सविस्तर

11:23 (IST) 1 Aug 2023
आमदार सतेज पाटलांकडून श्रद्धांजली अर्पण

11:20 (IST) 1 Aug 2023
चंद्रकांत पाटलांना केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत

11:11 (IST) 1 Aug 2023
समृद्धी महामार्ग अपघातातील मृतांना ठाकरेंकडून श्रद्धांजली

11:10 (IST) 1 Aug 2023
समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

गेल्या एक महिन्याच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर दुसरी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना क्रेन पडली आहे. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

11:04 (IST) 1 Aug 2023

10:38 (IST) 1 Aug 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

10:38 (IST) 1 Aug 2023
“लोक यापुढे समृद्धीचा वापर…”, संजय राऊतांची सरकारवर टीका; म्हणाले, “शेतकऱ्यांचे शिव्याशाप…”

समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना शहापूर येथे भीषण अपघात होऊन १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. क्रेन आणि स्लॅब अंगावर कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताप्रकरणी आता संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. समृद्धीइतके बळी कोणत्याच रस्त्याने घेतले नाहीत, असं संजय राऊत थेट म्हणाले आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवरही टीका केली आहे.

सविस्तर वाचा

Maharashtra Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा