Maharashtra News Highlights: राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर अखेर राज्य सरकारने २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मोर्चा होणार आहे. या मोर्चात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत. याचबरोबर मुंबईमधील पवई या ठिकाणी एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत १७ पीडितांची सुटका केली. या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai Weather Today Live Updates : राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

11:33 (IST) 31 Oct 2025

१५ वर्षांनंतर मुंबईत झाली पोलीस चकमक

रोहीत आर्याचा पवई येथील पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. …सविस्तर बातमी
11:30 (IST) 31 Oct 2025

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा फेरबदल- सचिव खंडागळे यांची उचलबांगडी, तर शरद जरे यांना नवी जबाबदारी

खंडागळे यांची नियुक्ती आता पुण्यातील सहकारी पतसंस्थेत अपर निबंधक म्हणून करण्यात आली आहे. शरद जरे यांनी गुरुवारी मुंबई एपीएमसीच्या सचिव पदाची सूत्रे हाती घेतली असून, बाजार समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. …अधिक वाचा
11:19 (IST) 31 Oct 2025

ठाणे बेलापूर मार्गाचे रुपडे पालटणार; तीन उड्डाणपूल आणि पूर्ण मार्गाचे नूतनीकरण

ठाणे-बेलापूर मार्गावर एका उड्डाणपुलाचे काम सुरू असून या व्यतिरिक्त क्रिस्टल हाऊस ते पावणे, बीएसएफ कंपनी ते हुंदाई शो रूम, आणि रबाळे जंक्शन असे तीन उड्डाणपूल निर्माण करण्यात येणार आहेत. …सविस्तर वाचा
11:09 (IST) 31 Oct 2025

Navi Mumbai Voter Fraud : नवी मुंबईतील मतदार याद्यांच्या घोळ वाढता..वाढता..वाढे; एकाच मोबाईल क्रमांकावर २८८ मतदारांची नोंद!

मनसेने मतदार यांद्यांमधील हा घोळ बाहेर काढल्याने निवडणूक आयोग आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया यावर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. …सविस्तर बातमी
11:07 (IST) 31 Oct 2025

शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकं कशा पद्धतीने होणार? उदय सांमतांची महत्वाची माहिती; म्हणाले, “यादी तयार…”

“भाताच्याही शेतीचं नुकसान झालेलं असेल तर त्यालाही नुकसान भरपाईत सरकार देत आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सरकार चालवत असताना शेतकऱ्याचं हित कशामध्ये आहे हे पाहिलं जातं. याचि प्रिचिती गुरुवारी आलेली आहे. तसेच कर्ज माफी नेमकं कशा पद्धतीने होणार? याचाही पॅटर्न तयार झालेला आहे. जून पर्यंत आम्ही कशा पद्धतीने कर्जमाफी करणार आहोत. त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा मिळेल, याची देखील यादी तयार होईल”, असं उदय सांमत यांनी म्हटलं आहे.

11:07 (IST) 31 Oct 2025

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणं लवकरच सुरू; पहिल्या टप्प्यात ही ०५ शहरे जोडली जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच शहरांसाठी नवी मुंबईहून थेट विमान उपलब्ध होणार आहेत. याबरोबर पहिल्या टप्प्यात १५ हून अधिक शहरांसाठी दररोज २० उड्डाणे सुरु केले जातील. …सविस्तर वाचा
10:50 (IST) 31 Oct 2025

राष्ट्रवादी अजित पवार गटाची टॅग लाईन : ’महापौर राष्ट्रवादीचाच’ सुकाणू समितीचीही घोषणा

धुळे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने ‘महापौर राष्ट्रवादीचाच’ घोषणा देत सुकाणू समिती जाहीर केली. …वाचा सविस्तर
10:48 (IST) 31 Oct 2025

“पवईत घडलेली घटना खूप गंभीर, आता पोलीस…”, १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेवर गृहराज्यमंत्री कदमांचं महत्वाचं विधान

मुंबईमधील पवईमधील एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत १७ पीडितांची सुटका केली. या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. या घटनेवर आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली. योगेश कदम यांनी म्हटलं की, “१० ते १२ वर्षांची मुलं हे त्या ठिकाणी ओलीस ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी अतिशय हुशारीने ओलीस असलेल्या मुलांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर असून त्याची चौकशी पोलीस करत आहेत”, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

10:48 (IST) 31 Oct 2025

रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना काय सांगितलं होतं? मुलीने सांगितला सुटकेचा थरार! म्हणाली, “आधी आम्हाला…”

मुंबईमधील पवई या ठिकाणी एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत पीडितांची सुटका केली. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना नेमकं कशी घडली? या घटनेवेळी नेमकं काय घडलं? आरोपीने या १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवताना नेमकं काय सांगितलं होतं? याबाबतची आपबीती या घटनेतील एका मुलीने सांगितली आहे.

सविस्तर वाचा

रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना काय सांगितलं होतं? मुलीने सांगितला सुटकेचा थरार! म्हणाली, “आधी आम्हाला…”, (फोटो-संग्रहित छायाचित्र)