Mumbai Updates: राज्यात एकीकडे अजित पवार व शरद पवार यांच्या भेटीची चर्चा अजूनही रंगत असताना दुसरीकडे शरद पवारांनी आपण विरोधकांसोबतच असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोग आपलाही पक्ष फुटीर गटाला देईल, अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरूनही दावे-प्रतिदावे होत आहेत. तसेच, शरद पवारांचा फोटो अजित पवार गटाने वापरण्यावरून सध्या दोन्ही गटांमध्ये सुंदोपसुंदी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai Maharashtra Live Today: शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे
मला राजकारणातून चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजकारण सरळ मार्गाने करायचं असतं उंटाची तिरकी चाल, घोड्याची अडीच घरं हे सगळं बुद्धिबळात चालतं. आयुष्यात नाही. तुम्हांला चेकमेट करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे तेवढं सांगा आम्ही आपल्या बाजूने उभे राहू. – जितेंद्र आव्हाड
मला राजकारणातून चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 17, 2023
राजकारण सरळ मार्गाने करायचं असतं उंटाची तिरकी चाल, घोड्याची अडीच घरं हे सगळं बुद्धिबळात चालतं. आयुष्यात नाही.
तुम्हांला चेकमेट करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे तेवढं सांगा आम्ही आपल्या…
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील तब्बल ८२३ पदांसाठी मुख्य परीक्षा २०२२ करीता पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. सदर पदांकरीता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्य उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.
काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींना कळकळ आहे. काहींना वाटतंय बारावा कार्यक्रम आहे, त्यातून आपले बारा तर वाजणार नाहीत ना. पण ३६५ दिवस अशा प्रकारे लोकांच्या दारापर्यंत आमचं सरकार जातच राहील. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. हे बंद दाराआड बसणारं सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर : तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारी सकाळी नऊ वाजतापासून सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या होतकरू उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
अकोला: राखी निर्मिती व त्याच्या विक्रीतून दिव्यांगांसाठी रोजगार निर्मितीचा विशेष उपक्रम दिव्यांग सोशल फाउंडेशन व दिव्यज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविला.
पुणे: फसवणुकीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने सोमवार पेठेत पकडले. प्रफुल्ल जयवंत कोळी (वय ३०, रा. रेवळ, ता. अलिबाग, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
काँग्रेसकडून येत्या ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पदयात्रेचं आयोजिन करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न अजून उद्भवलेला दिसत नाही. तो समोर आला की मग त्यावर बोलू – जयंत पाटील
सगळ्यांच्या भेटीगाठी घेणं हा शरद पवारांच्या स्वभावाचा भाग आहे. अमुक भेटून गेला म्हणून शरद पवार त्यांच्या मागे जात नाहीत. शरद पवार त्यांना भेटायला येणाऱ्याशी आदरानंच वागतात – जयंत पाटील
कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात बुधवारी रात्री एका तरुणाने एका अल्पवयीन तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करुन तिला जिवे ठार मारले. या घटनेनंतर आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकले जाऊ या भीतीने हल्लेखोर तरुणाने जवळील फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सविस्तर वाचा…
वर्धा : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या पुलगाव येथील दारूगोळा भंडारात जूने बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू आहे. त्यातील धातूचे तुकडे वेचताना योगेश केशव नेरकर या सव्वीस वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी अंत झाला. आज सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.
१६ ऑगस्टला आव्हानात्मक हवामान आणि काळोख्या रात्रीच्या दरम्यान ही एक धाडसी कारवाई करण्यात आली. जहाज चीन ते यूएई प्रवास करीत होते.
मुंबई: मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदांना अंधारात ठेवून निवडक मंडळींनी कुटुंबातील सदस्यांसह केलेली स्पेनवारी, सदस्यत्वाचा अर्ज देण्यास करण्यात येत असलेली टाळाटाळ, बैठकीमध्ये केलेली बोळवण आदी विविध कारणांमुळे गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी समन्वय समितीबद्दल असंतोष धगधगू लागला आहे.
प्रवांशाला सहा रुपये परत न केल्याच्या आरोपाप्रकरणी २६ वर्षांपासून बडतर्फ असलेल्या रेल्वेच्या कारकूनाला कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. विशेष म्हणजे, दक्षता पथकानेच संबधित प्रवाशाला या अधिकाऱ्याकडे तिकीट काढण्यासाठी पाठवले होते. राजेश वर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…
हेल्मेट न घालून निष्काळीपणा केल्याच्या कारणास्तव अंधेरीस्थित अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना मंजूर केलेल्या एकूण नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने कमी केली. सविस्तर वाचा…
शहर भागातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्य सरकारने राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची स्थापना केली आहे. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या नियंत्रणात ही यंत्रणा असणार आहे. सविस्तर वाचा…
नागपूर : शरद पवार भाजपासोबत आल्याशिवाय अजित पवार यांना मुख्यमंत्री होता येणार नाही, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली आहे. म्हणून अजित पवार हे शरद पवार यांची वारंवार भेट घेत आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
ससून सर्वोपचार रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर आजारांवरील उपचारांचे पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव मोठे सरकारी रुग्णालय आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयावर आलेला ताण ‘लोकसत्ता’ने मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी ससून रुग्णालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागांसह दोन महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या ९२ पदांच्या भरतीसाठी विद्यापीठाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, एकीकडे विद्यापीठाचे कुलगुरू आर्थिक घोळामुळे चौकशीच्या फेऱ्यात असताना, त्यांनी इतक्या घाईने कशी काय पदभरतीची जाहिरात काढली? असा प्रश्न सिनेट सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केला आहे.
ताडोबातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठवण्यात आले. तर पुढे आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकारची परवानगी मागितली आहे.
नागपूर: ध्येय साध्य करण्यासाठी माणूस कितीही काळ अथक परिश्रम करू शकतो, त्याचे सविता शिंदे मूर्तिमंत उदाहरण. इयत्ता दहावीत इंग्रजीत कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण झालेल्या सविता यांनी सुरक्षा अधिकारी पदासाठीच्या परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्तेची मोहोर उमटवली. दोन मुलांची आई आणि शेतकरी पती यांना सांभाळून आता ‘महाजनको’मध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळणार आहे.
पुणे मेट्रोच्या वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील सेवेला सोमवारी (ता. १४) ब्रेक लागला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने सेवा २० मिनिटे ठप्प झाली होती. याप्रकरणी महामेट्रोने महापारेषणकडे बोट दाखविले होते. आता महापारेषणने महामेट्रोच्या तांत्रिक चुकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा…
कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक मालवाहू कंटेनर उलटून भीषण अपघात झाला आहे. कंटेनर उलटून आर्धा भाग पुलावरून खाली लोंबकळत राहिल्यामुळे यामध्ये वाहून नेण्यात येत असलेला माल पुलावरून खाली पडला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे आणि त्यामधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
एसटी स्थानक म्हटले की सगळीकडे अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, दुर्गंधी, मोडलेल्या खुर्च्या आणि रया गेलेली इमारत असे चित्र सर्वसाधारणपणे दिसते. हे चित्र बदलण्यासाठी स्वच्छ व सुंदर एसटी बस स्थानकांचे अभियान राबविण्यात येत आहे. सविस्तर वाचा…
शहरात कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. मुंढवा भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ४६ लाख ५९ हजार रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सविस्तर वाचा…
पावसाचे बिघडलेले वेळापत्रक, उन्हाचा अभाव आणि गेले काही वर्षे पठाराला घातलेल्या सुरक्षा भिंतीमुळे फुलांचे बिघडलेले नैसर्गिक चक्र या साऱ्यांमुळे गेली काही वर्षे कासच्या पठारावर रुसलेली फुले यंदाही उमलण्याचे नाव घेत नाहीत. सविस्तर वाचा…
नागपूर : एकतर्फी प्रेम करीत असलेल्या युवकाने मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्याशी रस्त्यावरच अश्लील चाळे करीत विनयभंग केला.
नागपूर: मान्सून काही काळ विश्रांती घेतो, पण यावेळी मान्सूनने जरा अधिकच विश्रांती घेतली आहे. तब्बल पाच दशकानंतर एवढी मोठी विश्रांती मान्सूनने घेतल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे.
कळवा रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होण्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं.
जनक्रांती सेनेचे बबनराव गित्ते आज बीडमधील जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हजारो कार्यकर्त्यांनिशी मी शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, अशी प्रतिक्रिया बबनराव गित्ते यांनी दिली आहे.
शरद पवार
Mumbai Maharashtra Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व चिन्हावरून आता आयोगासमोर सुनावणी होणार?