Mumbai Updates: राज्यात एकीकडे अजित पवार व शरद पवार यांच्या भेटीची चर्चा अजूनही रंगत असताना दुसरीकडे शरद पवारांनी आपण विरोधकांसोबतच असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोग आपलाही पक्ष फुटीर गटाला देईल, अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरूनही दावे-प्रतिदावे होत आहेत. तसेच, शरद पवारांचा फोटो अजित पवार गटाने वापरण्यावरून सध्या दोन्ही गटांमध्ये सुंदोपसुंदी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Live Today: शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे

10:58 (IST) 17 Aug 2023
Maharashtra News Update: राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर…

पनवेलमधील मेळाव्यातून सत्ताधारी व विरोधकांवर परखड टीका केल्यानंतर आज राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

10:57 (IST) 17 Aug 2023
Maharashtra News Update: छातीवर तलवार ठेवली, तरी मंत्रीपद स्वीकारणार नाही – बच्चू कडू

एकनाथ शिंदेंच्या डिनरचं मला निमंत्रण मिळालेलं नाही. कदाचित कॅबिनेट मंत्र्यांसाठीच हे आयोजन असेल. म्हणून मला निमंत्रण पाठवलं नसेल. मला मंत्रीपदाचा दर्जा आहे. पण मंत्र्याचा दर्जा असणं आणि कॅबिनेट मंत्री असणं यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. पण त्यात मंत्रीमंडळ विस्तारावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रीपद स्वीकारणार नाही – बच्चू कडू

10:54 (IST) 17 Aug 2023
पिंपरी चिंचवडमधील पुरवठ्याच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन; अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित

पिंपरी: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 17 Aug 2023
“नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांकडून हे शिकावं”, ठाकरे गटाचा पंतप्रधानांना खोचक टोला!

“मोदी मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर नाइलाज म्हणून लाल किल्ल्यावरून बोलले. ते बोलले नसते तर…!”

वाचा सविस्तर

10:51 (IST) 17 Aug 2023
“मंत्रीपद मिळालं नाही तर नारायण राणे मला संपवतील”, भरत गोगावलेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

भरत गोगावले म्हणतात, “संध्याकाळी एकाला फोन करून विचारलं काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही…!”

वाचा सविस्तर

10:51 (IST) 17 Aug 2023
“बाळासाहेबांनी फुटीरांना सांगितलं होतं की…”, संजय राऊतांचं अजित पवार गटावर टीकास्र; म्हणाले, “डरपोक लेकाचे!”

संजय राऊत म्हणतात, “पक्षाचा संस्थापक तिथे असताना त्याचा पक्ष फोडून दुसऱ्याच्या हातात त्याची मालकी दिली जाते. या देशात…”

वाचा सविस्तर

10:50 (IST) 17 Aug 2023
“…म्हणून ते शरद पवार आहेत”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “८३ वर्षांचा माणूस…!”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “शरद पवारांना ऑफर देणं हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. ज्या माणसानं…!”

वाचा सविस्तर

10:50 (IST) 17 Aug 2023
Maharashtra News Update: छातीवर तलवार ठेवली, तरी मंत्रीपद स्वीकारणार नाही – बच्चू कडू

एकनाथ शिंदेंच्या डिनरचं मला निमंत्रण मिळालेलं नाही. कदाचित कॅबिनेट मंत्र्यांसाठीच हे आयोजन असेल. म्हणून मला निमंत्रण पाठवलं नसेल. मला मंत्रीपदाचा दर्जा आहे. पण मंत्र्याचा दर्जा असणं आणि कॅबिनेट मंत्री असणं यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. पण त्यात मंत्रीमंडळ विस्तारावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रीपद स्वीकारणार नाही – बच्चू कडू

10:47 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: शरद पवारांची तोफ कुणावर धडाडणार?

शरद पवार नेमके कुणाच्या बाजूने? या वादानंतर आता शरद पवारांची बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. पक्षातील फुटीनंतर मराठवाड्यातील ही शरद पवारांची पहिलीच सभा असून यात धनंजय मुंडेंवर शरसंधान होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, बीडमध्ये संदीप क्षिरसागर यांच्यावर आता शरद पवारांची सारी भिस्त असल्याचंही बोललं जात आहे.

शरद पवार

Mumbai Maharashtra Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व चिन्हावरून आता आयोगासमोर सुनावणी होणार?