Marathi News Today, 10 October 2023: राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातली सुनावणी निवडणूक आयोगासमोर चालू असून त्यावरून पक्षाच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी आता शरद पवारांच्या सभांवर त्याच ठिकाणी उत्तरसभा घ्यायच्या नाहीत, असा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन गटांमध्ये नेमकं काय घडतंय, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर शिवाजी पार्कवर नेमका शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की ठाकरे गटाचा? यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत.

Live Updates

Mumbai Maharashtra Live News Today: शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा मुद्दा तापला!

11:11 (IST) 10 Oct 2023
Maharashtra News Live: पुण्यातील लैंगिक शोषण प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं ट्वीट

पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. यासोबतच राज्य शासनाने देखील शालेय मुलांसाठी समुपदेशनाबाबत एक कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञ आदींची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा. – सुप्रिया सुळे

11:01 (IST) 10 Oct 2023
Maharashtra News Live: सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी…

कोल्ही बोर्डी, जि. वाशिम येथे शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अडवून त्याला मारहाण करून जीवंत जाळल्याची घटना घडली. हा प्रकार अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि चीड आणणारा आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. गुन्हेगार निर्ढावले असून दिवसाढवळ्या गुन्हे करत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून गुन्हेगारांना गजाआड करावे – सुप्रिया सुळे

10:38 (IST) 10 Oct 2023
Maharashtra News Live: दीपक केसरकर हा मोती तलावातला डोमकावळा – संजय राऊत

दिल्लीच्या मदतीने तुम्ही पक्ष ताब्यात घेतलात, चिन्ह चोरलं. आता आणखी काय करणार तुम्ही? केसरकर कोण? त्याचा शिवसेनेशी संबंध काय? हा सावंतवाडीतल्या मोती तलावातला डोमकावळा. हा पदासाठी शिवसेनेत आला. त्याला उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. आमचा विरोध होता. हे पाठीत खंजीर खुपसून पळून जातील असं आम्ही सांगितलं होतं. आता हा आम्हाला शिवसेना शिकवतोय का? हा एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातोय की नाही बघा – संजय राऊत

10:35 (IST) 10 Oct 2023
Maharashtra News Live: जनता धृतराष्ट्र नाहीये – संजय राऊत

कोणत्याही टोळीकडून दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे मागणी केली असेल, तर त्यानं आधी आरशासमोर उभं राहून स्वत:ला पाहावं की आपण खरंच शिवसेना आहोत का? की भाजपाच्या नादी लागून लफंगेगिरी करतोय! शिवसेना ठाकरेंची, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आहे. हे कोण बाहेरचे उपटसुंभ आले? महाराष्ट्राला कळत नाहीये का की तुमचं काय चाललंय? राज्याची साडेअकरा कोटी जनता काही धृतराष्ट्र नाहीये. – संजय राऊत

राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

Mumbai Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!