Maharashtra Politics : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे. मंदिराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली इथले पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व नष्ट होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करु असंही आव्हाड म्हणाले आहेत. आता या आरोपांना सरकार काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. मनोज जरांगेंनी २७ ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत येणार आणि मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असं म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे. २७ ऑगस्टला आम्ही गाडीवर गणपती बसवणार. मुंबई आमचीही आहे आम्ही विसर्जनासाठी मुंबईतल्या अरबी समुद्रावर येणार असंही जरांगे म्हणाले आहेत. तसंच मी ठरवून आणि मॅनेज आंदोलन करत नाही असंही जरांगेंनी म्हटलं आहे. दादर येथील कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे. यानंतर जैन मंदिराचं दार बंद करण्यात आलं आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Mumbai Maharashtra दादर कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीची आंदोलनाची हाक, यासह महत्त्वाच्या बातम्या
माजी आमदाराच्या उच्चशिक्षित पुतण्याची आत्महत्या
पुणे : चुलतीला आय लव्ह यू म्हटल्याने 35 वर्षीय व्यक्तीचा खून, चंदननगर पोलिसांनी दोघांना केली अटक
डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफियाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
ठाणेकरांनो “कोर्टातले वाद मिटवा; कोर्ट फी परत मिळवा” !
पुणे : प्रभाग रचना बदलण्याची नामुष्की का ओढावली ?
सातारा : पसरणी घाटात ऐन श्रावणात वणवा
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात तिन्ही मित्रांवर काळाचा घात, तिघांच्या मृत्यूने शोककळा
दहिसर टोलनाक्यावर सातत्याने वाहतूक कोंडी; टोल नाका स्थलांतरित करण्याची परिवहन मंत्र्यांची मागणी
कबुतरखान्याजवळ मराठी एकीकरणच्या कार्यकर्त्यांची धरपकड
कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची धरपकड सुरु झाली आहे. त्यानंतर किती जैन आंदोलकांवर कारवाई केली ते सांगा असा सवाल आंदोलकांनी केला आहे. दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. तसेच कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलं. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. सकाळी ११ नंतर आंदोलक जमू लागले, यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
अपघातामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले, वांगणी बदलापुरदरम्यान रूळांवर एकाचा मृत्यू
कोकणात रेल्वेच्या रो-रो सेवेने आपली गाडी घेऊन जाताय, विशेष रो-रो सेवेची वैशिष्ट्य काय? पाहा
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारावरून वाद; तुळजापुरात राष्ट्रवादी – भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
शिळफाटा ते रांजनोली अवघ्या २५ मिनिटात, २१ किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठी एमएमआरडीएची निविदा
नागपूर शहरात आजपासून ट्रॅव्हल्सला ‘नो एन्ट्री’
बदलापुरकरांचा प्रवास होणार आणखी वेगवान, मांजर्लीतून हेंद्रेपाड्याकडे जाणार तो चिंचोळा रस्ता होणार रूंद
महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
काँग्रेसच्या काळातलाच आदेश आहे असं फडणवीस म्हणतात. ते सोडून द्या तुम्ही काय करताय ते सांगा. काँग्रेस आणि नेहरुंचं नाव घेतात. तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवायचं ठरवलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काही वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते. बाजीराव पेशवेही मांसाहारच करत होते, त्याशिवाय युद्धात लढता येत नाही. आता सीमेवरच्या सैन्याला मांसाहार करावाच लागतो. सीमेवरच्या जवानांनाही मांसाहार करावाच लागतो. वरण, भात, तूप, श्रीखंड-पुरी खाऊन युद्ध लढता येत नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नामर्द आणि नपुंसक करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हा फतवा मागे घ्या. जे लपून खात आहेत त्यांनी ही बंदी मागे घेतली पाहिजे. हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं बोलू नका. हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
उल्हासनगर पालिकेने बुजवले १,६५१ चौरस मीटरचे खड्डे, आमदारांच्या इशाऱ्यानंतर पालिकेने यादीच केली जाहीर
कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन
कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (१३ ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलं आहे. याचपार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे.
आलिशान घर असूनही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थान सोडेनात
मुंबईमध्ये स्वतःचे आलिशान घर असतानाही राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थानात राहत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत आपल्याकडे घर नसल्याने आपण सरकारी निवासस्थानात राहत असल्याची काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी माध्यमांना माहिती दिली होती. मात्र आता मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी येथील एन एस पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत घर असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंकडून संबंधित घराचा उल्लेख केला आहे. वीरभवन इमारतीत नवव्या मजल्यावर ९०२ क्रमांकाचं धनंजय मुंडेंचं तब्बल २ हजार १५१ चौरस फुटांचं घर असल्याचं समोर आलं आहे. मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत आहेत.
दादर कबुतरखाना व्हिडीओ (फोटो – dadarmumbaikar / Insta)
दादर येथील कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे.