Maharashtra Latest News Updates : मुंबईतल्या दादर या ठिकाणी कबूतर खाना परिसरात जैन समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या खासदारांची ते भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचंही कळतं आहे. तसंच सर्व जागा लढवण्याच्या तयारीत राहा असंही त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने ओढ दिली आहे. काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडतो आहे. या आणि अशा सगळ्याच घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Maharashtra Live News : दादरमधल्या कबूतरखाना परिसरात जैन बांधवांचं आंदोलन, पोलिसांचा फौजफाटा तैनात, यासह महत्त्वाच्या बातम्या

21:25 (IST) 6 Aug 2025

उपशिक्षणाधिकारी पदांच्या नियुक्तीची ‘सर्वोच्च’ आदेशानंतरही प्रतीक्षाच

२०१७ साली उपशिक्षणाधिकारी पदांची परीक्षा, सप्टेंबर २०२३ मध्ये निकाल लागूनही आणि न्यायालयीन प्रक्रियेचा फेरा होऊनही नियुक्तीच्या संदर्भातील घोंगडे भीजत पडलेले आहे. …वाचा सविस्तर
21:20 (IST) 6 Aug 2025

लोकसभेतील व्होट जिहादनंतर संतशक्तीमुळे घवघवीत यश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येत्या काळात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगरपर्यंत पाणी आणून ते मराठवाड्यात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला. …अधिक वाचा
21:09 (IST) 6 Aug 2025

वेरुळमधील ३२ क्रमांकाच्या लेणीमध्ये गळती

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वेरुळ लेणीतील धबधबाही सुरू झाला होता. …सविस्तर वाचा
21:06 (IST) 6 Aug 2025

हत्ती परत देण्याची ‘वनतारा’ची तयारी – विहान करणी; नांदणीत महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार

सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ, वनतारा व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुनरावलोकन याचिका दाखल केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी बुधवारी येथे केले. …अधिक वाचा
20:34 (IST) 6 Aug 2025

सांगली जिल्ह्यात पावसाची सर्वत्र दमदार हजेरी; खरीप पिकाला जीवदान

सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. उघडिपीच्या काळात खरीप पिकातील आंतरमशागतीचे काम शेतकऱ्यांनी आटोपले असून, दमदार पावसाने पिकाला जीवदान मिळाले आहे. …सविस्तर वाचा
20:22 (IST) 6 Aug 2025

सोलापूरला पावसाने झोडपले, घरांमध्ये पाणी; काही शाळांभोवती तळी, शाळांना सुटी

सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे काही झाडे उन्मळून पडली. तर काही घरे कोसळली. …सविस्तर वाचा
19:45 (IST) 6 Aug 2025

अर्ज छाननीचा रत्नागिरी जिल्ह्यातील ५० हजार ७०० पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना फटका…

जिल्ह्यातून ४ लाख २४ हजार ४४० महिलांनी नोंदणी करण्यात आली होती. …वाचा सविस्तर
19:41 (IST) 6 Aug 2025

पुणे महापालिका आयुक्तांकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच् भाषा वापरल्याचा आरोप,मनसे कार्यकर्त्यांच ठिय्या आंदोलन सुरू

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच् भाषा वापरल्याची घटना घडली. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होत,महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. …सविस्तर बातमी
18:59 (IST) 6 Aug 2025

नोकरीचं आमिष दाखवून लुटले, ११ लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

आरोपीने फिर्यादी व्यक्तीस व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे एक क्रिप्टोग्लोबल ही कंपनी असल्याचे सांगून ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमावता येतील, असे सांगितले. …अधिक वाचा
18:13 (IST) 6 Aug 2025

अनियमित खत विक्रेत्यांवर कारवाई! ठाणे ते सिंधुदुर्ग दरम्यान कारवाईचा बडगा

खते ही पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची निविष्ठा आहे. खतांचा योग्य वापर झाला तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. …अधिक वाचा
18:12 (IST) 6 Aug 2025

मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याला सतत पडणा-या खड्डयांपुढे ठेकेदार हतबल; महामार्गावर अनेक ठिकाणी चिखल आणि खड्ड्याचे साम्राज्य

मुंबई -गोवा मार्गाचे काम पावसाळ्यामुळे काही प्रमाणात मंदावले आहे. या महामार्गाचे काम गेली सतरा वर्ष सुरु आहे. मात्र काम संपण्याचे नावच घेत नाही. …सविस्तर वाचा
17:52 (IST) 6 Aug 2025

डोंबिवलीत सोनारपाडा येथे बहिणीची छेड काढण्यावरून हाणामारी

सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डोंबिवली पूर्वीतील ललित काटा परिसरातील सोनारपाडा भागात हा छेडछाडीचा प्रकार घडला आहे. …अधिक वाचा
17:37 (IST) 6 Aug 2025

Thane Municipal Corporation : ठाणे पालिकेच्या मॅरेथाॅन स्पर्धेत लाखो रुपयांची रोख बक्षिसे…यंदा स्पर्धेत वेळ निश्चिती तंत्रज्ञानाचा वापर

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी (Sandeep Malvi) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मॅरेथाॅन स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. …वाचा सविस्तर
17:36 (IST) 6 Aug 2025

नारळी पौर्णिमेनिमित्ताने ठाण्यात मोठे वाहतूक बदल

गेल्या अनेक वर्षांपासून कळवा नाका भागात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. …सविस्तर वाचा
17:25 (IST) 6 Aug 2025

नगर शहरातील गाळेधारकांना महापालिकेच्या जप्तीच्या नोटीसा

गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमध्ये १४२ गाळेधारक व ओटेधारक आहेत. त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झालेली आहे. …सविस्तर वाचा
16:20 (IST) 6 Aug 2025

पहिली आणि दुसरीच्या पुस्तकात कविता एकच, फक्त चित्र बदलले..

पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येतेय. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ कवितेचे नाव आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. …वाचा सविस्तर
16:13 (IST) 6 Aug 2025

शासकीय योजनांचे आमिष दाखवत शिर्डीत २८ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शेजवळ याने सन २०२० ते ३० जुलै २०२५ या कालावधीत ओळखीचा फायदा घेऊन कोपरगाव, संगमनेर, राहाता या भागातील लोकांना गाडी, शेत जमिनीचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. …सविस्तर वाचा
15:40 (IST) 6 Aug 2025

राहुल मोटे राष्ट्रवादीत आले आणि स्थगिती उठली

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचा एकही आमदार नाही. जिल्ह्यात आमदार नसल्यामुळे निधीबाबतच्या गोंधळात अजित पवार यांनी फारसे लक्ष घातले नव्हते. …सविस्तर बातमी
15:32 (IST) 6 Aug 2025

शिर्डी शहरातील मिळकतींचे ड्रोन सर्वेक्षणाद्वारे नकाशे

शिर्डीसह पंढरपूर, बारामती, कुळगाव-बदलापूर, वरणगाव, कन्नड, बुलढाणा, खोपोली आणि मुत्तीजापूर या नगरपालिकांमध्ये नक्शा प्रकल्पाचा पथदर्शी प्रयोग सुरू आहे. …सविस्तर वाचा
15:21 (IST) 6 Aug 2025

फॅटी लिव्हरचे भारतात वाढते संकट! नव्या व फास्टफुड जीवनशैलीचे धोकादायक परिणाम…

विशेषतः मद्यपानाशिवाय होणाऱ्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजच प्रमाण देशात झपाट्याने वाढत असून हा आरोग्य क्षेत्रातील नवा धोका असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जाते. …अधिक वाचा
14:46 (IST) 6 Aug 2025

बदलापूर व्हाया पनवेल, नवी मुंबई ३४ किमी रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचे सर्वेक्षण, कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी

चौथी मुंबई म्हणून कर्जत, खोपोली, बदलापूर, अंंबरनाथ, नेरळ परिसर विकसित होत आहे. नवनवीन गृहप्रकल्प या उभारले जात आहेत. …सविस्तर वाचा
14:04 (IST) 6 Aug 2025

कल्याणमध्ये प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालणाऱ्या रिक्षा मालकाला ‘आरटीओ’चा साडे सहा हजार दंड

रूपेश केणे असे आरटीओ कल्याण कार्यालयाने दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षा मालकाचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील कल्याण शीळ रस्त्यावरील नेतिवली भागात राहतात. …सविस्तर बातमी
13:59 (IST) 6 Aug 2025

पायाभूत चाचणीच्या वेळापत्रकात बदल; ८ ऑगस्टची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी होणार

संकलित मूल्यमापन चाचणीच्या वेळापत्रकात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पालघर जिल्ह्यासाठी बदल करण्यात आला असून ८ ऑगस्ट रोजीची इंग्रजी विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. …अधिक वाचा
13:59 (IST) 6 Aug 2025

पायाभूत चाचणीच्या वेळापत्रकात बदल; ८ ऑगस्टची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी होणार

संकलित मूल्यमापन चाचणीच्या वेळापत्रकात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पालघर जिल्ह्यासाठी बदल करण्यात आला असून ८ ऑगस्ट रोजीची इंग्रजी विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. …अधिक वाचा
13:52 (IST) 6 Aug 2025

वाढवण, तवा ते भरवीर द्रुतगती महामार्गासाठी १००० हेक्टर जागा आवश्यक; लवकरच ड्रोन सर्वेक्षण सुरू

तवा ते भरवीर अंतर सुमारे १८३.४८ किमी आहे. मात्र हा महामार्ग तयार होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हे अंतर केवळ १०४ किमीवर येणार आहे. …अधिक वाचा
13:42 (IST) 6 Aug 2025

मुंबई : पुनर्विकसित इमारतीतील १८ घरे लाटली! म्हाडाकडून गुन्हा दाखल

दक्षिण मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत पुनर्रचित इमारती तर खासगी विकासकांमार्फत पुनर्विकसित इमारती उभारुन केल्या जातात. …सविस्तर बातमी
13:13 (IST) 6 Aug 2025

उल्हासनगरकरांचे पाणी स्वस्त होणार, पालिकेचा दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मागे

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणा अनेकदा कुचकामी ठरते. एप्रिल, मे महिन्यात पाणी वितरणातील दोषामुळे शहरातील अनेक भागात टंचाई सदृश्य परिस्थिती होती. …अधिक वाचा
13:08 (IST) 6 Aug 2025

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पकडून ‘सह्याद्री कट्टा’ उपक्रम; संवादातून वनसंवर्धन, जनाजागृती

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर यांच्या वतीने ‘सह्याद्री कट्टा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची पहिली बैठक ‘सह्याद्रीतील पक्षी’ (Birds of Sahyadri) या विषयावर सोमवारी कराडच्या कोयना उपसंचालक कार्यालयात पार पडली. …सविस्तर बातमी
12:46 (IST) 6 Aug 2025

Ganesh Utsav 2025 : ठाण्यात गणेशोत्सव मंडपासाठी ८८ मंडळानी केले अर्ज पण, परवानगी एकाच मंडळाला

ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो. …वाचा सविस्तर
12:38 (IST) 6 Aug 2025

क्रिकेट प्रशिक्षकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार, पालक संतप्त

पीडित मुलगी १३ वर्षांची असून घाटकोपर येथे राहते. क्रिकेट मध्ये तिला विशेष आवड होती. …सविस्तर वाचा

मुंबईतल्या दादर या ठिकाणी कबूतर खाना परिसरात जैन समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या खासदारांची ते भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचंही कळतं आहे.

दादरच्या कबुतर खान्यावर पालिकेची कारवाई, अतिरिक्त बांधकाम हटवले (छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता टीम)