Mumbai Maharashtra Breaking News Highlights : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असून दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या देखील चर्चा सुरु आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देखील महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.

तसेच राज्यात मॉन्सूनला सुरुवात झाली असून मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे.

या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates/ Shivrajyabhishek Din 2025 Live Updates : राजकीय इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

12:57 (IST) 6 Jun 2025

चर्चगेट स्थानकातील केकच्या दुकानाला आग

चर्चगेट स्थानकातील केकच्या दुकानाला गुरुवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. …सविस्तर बातमी
12:41 (IST) 6 Jun 2025

राज-उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा? संजय राऊतांच्या त्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून चर्चेला जोर आला आहे. दोन्ही पक्षातील नेते सकारात्मक असून कार्यकर्त्यांचंही स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झालं आहे. दरम्यान, हे दोन्ही नेते एकत्र कधी येणार? मनसे-शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची युती कधी होणार? याबाबत अधिकृत माहिती कधी येणार? असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. यावर आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

वाचा सविस्तर

11:53 (IST) 6 Jun 2025

मेट्रोप्रवाशांची गैरसोय;‘कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३’च्या स्थानकांत अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा

वारंवार विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मेट्रो सेवा, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आदींमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतानाच आता मेट्रो स्थानकांतील असुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. …सविस्तर वाचा
11:16 (IST) 6 Jun 2025

“पोषक असणाऱ्या गोष्टीच रायगडावर राहणार”, संभाजीराजे छत्रपती यांचं विधान

“हा शिवराज्याभिषेक सोहळा आनंदाचा असून सुवर्णक्षण आहे. माझी जबाबदारी आहे की जे रायगडला पोषक आहे त्याच गोष्टी येथे राहणार, हा माझा शब्द आहे. अतिक्रमण काढत असताना माझं संरक्षण सुद्धा येथील धनगर समाजासाठी असणार आहे. ज्या ठिकाणी हजार दोन हजार लोक यायचे तिथं आज लाखो लोक येतात. एवढा शिस्तबद्ध शिवभक्त.. कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे. मला आयजी आणि एसपीने विचारलं की शिस्त कशी निर्माण होते. हे शिवभक्तांवर असणारे संस्कार आहेत”, असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

10:16 (IST) 6 Jun 2025
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात, किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी

रायगडावर झालेला न भूतो न भविष्यति असा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा राज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)