Marathi News Update, 29 November 2023 : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडणार आहे. त्यासह शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तसेच, मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्याप्रकरणावरून राजकीय वातवारण चांगलंच तापलं आहे. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Mumbai Maharashtra Breaking News : राजकीय, क्राइम, खेडोपाड्यातील प्रत्येक घडामोड फक्त एका क्लिकवर…
काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
वाडा तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे.
रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
अवघ्या विशीत त्यांना ‘शस्त्रांचा’ मोह जडला अन खरीखुरची शस्त्रे मिळणे कठीण, म्हणून त्यांनी हुबेहूब दिसणारी ‘शस्त्रे’ चोरली…
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच भविष्यात मुख्यमंत्री बनतील असे वक्तव्य केले.
एक रुपयात विमा काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे दार ठोठावले. पण प्रतिसादच मिळाला नाही.
मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरी येथील युवक सचिन नागुलवार (२९) याच्या दुचाकीला येलचील जवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.
मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं, असं विधान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे.
वाचा सविस्तर…
तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजपा उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली, अशी टीका शिवसेनेनं ( ठाकरे गट ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘सामना’ अग्रलेखातून केली आहे.
“आनंद दिघे यांनी धर्मवीर चित्रपटात जे विधान केलं, तेच मी केलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी शिवीगाळ केली नाही. हे सुडाचं राजकारण आहे,” अशी प्रतिक्रिया माजी महापौर दत्ता दळवींनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल दत्ता दळवींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रूग्णालयात तपासणीसाठी आणल्यावर दत्ता दळवींनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली.
सर्व समाज एकत्रित राहिला पाहिजे. मात्र, यापुढे हक्कांसाठी लढावेच लागेल. हक्कासाठी थांबता येणार नाही. हक्कांवर कोणी गदा आणणार असेल तर शांत बसणार नाही, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.