Manoj Jarange Patil Mumbai Today : मनोज जरांगे पाटील हे कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. हा दिवस अनेक घडामोडींनी भरलेला होता. या आंदोलनाविरोधातील याचिकेवर दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पाठोपाठ राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले.

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी मनोज जरांगे आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले. “तुम्हाला आझाद मैदानात केवळ २४ तास उपोषणाला बसण्याची परवानगी दिली होती. तरी तुम्ही कोणत्या अधिकाराने गेल्या चार दिवसांपासून तिथे बसला आहात?” असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांसमोर उपस्थित केला. त्यावर जरांगे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे उद्या सकाळपर्यंतची मुदत मागितली होती. ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने सदर सुनावणी बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केली आहे.

दुसऱ्या बाजूला, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व उपसमितीतील इतर सदस्यांनी आझाद मैदानात उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला.

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारची मान्यता

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस महायुती सरकारने मान्यता दिली असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं. यावर विखे पाटील म्हणाले, “सरकारचा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्याची शासकीय अधिसूचना काढू.” यावर जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही अधिसूचना काढा आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो. त्यानंतर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबा म्हणालात तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही गुलाल उधळून निघून जाणार.”

Live Updates

Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Aarkshan Andolan Live Updates : मराठा आरक्षणासाठी मुंबईत चालू असलेल्या आंदोलनाविषयीचे सर्व अपडेट्स वाचा एकाच क्लिकवर.

15:30 (IST) 2 Sep 2025

लाभक्षेत्रात नसतानाही हस्तांतरण बंदीचे शिक्के; मराठवाडी प्रकल्पप्रश्नी वाझोलीकरांचे पालकमंत्र्यांना साकडे

मराठवाडी जलसिंचन प्रकल्पाचे बांधकाम सुरू करताना २८ वर्षांपूर्वी लाभक्षेत्रात चार एकरचा स्लॅब लावून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. आणि पुढे एकत्र कुटुंब असलेल्या आणि खातेफोड न झालेल्या अनेक कुटुंबांना त्याचा मोठा फटका बसला. …अधिक वाचा
15:20 (IST) 2 Sep 2025

तुम्ही कोणत्या अधिकाराने आझाद मैदानात बसला आहात? उच्च न्यायालयाचा मनोज जरांगेंना सवाल

दुपारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मनोज जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, “९० टक्के आंदोलकांनी मुंबई सोडली आहे. त्यांची वाहनं देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.” यावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की “पण तुम्ही अजूनही तिथे का बसला आहात? तुम्ही तिथेच ठाण मांडून बसू शकता का? तुम्हाला केवळ २४ तास तिथे उपोषण करण्याची परवानी दिली होती. पण तुम्ही अजूनही तिथे बसला आहात. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी का जाऊ शकत नाही?ठ यावर मानेशिंदे म्हणाले, “आम्ही आता आंदोलनाची जागा बदलू शकत नाही. आता त्या पाच हजार लोकांनी एकत्र घेऊन दुसरीकडे जाणं शक्य होणार नाही.”

15:15 (IST) 2 Sep 2025

Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणी साठी मराठ्यांचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ही २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करीत आहेत. …सविस्तर बातमी
15:06 (IST) 2 Sep 2025
३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिक्त करण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर कशी आहे मुंबईतील परिस्थिती?

दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान व आसपासचा परिसर रिक्त करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. तसेच आम्ही वाहतुकीत अडथळा आणणार नाही. तर, पोलीस संयमाने वागत आहेत. त्यांनी अद्याप बळाचा वापर केलेला नाही. ते केवळ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतील रस्ते व आझाद मैदान परिसर मोकळा करण्यास सांगितलं आहे. परंतु, मराठा कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. आम्ही सामान्य जनता म्हणून कुठेही फिरू शकतोच, असं त्यांचं म्हणणं आहे.

आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्ही मिळेल्या त्या वाहनांनी वाशी व खारघऱला जातो. परंतु, आम्हला जेवणाच्या गाड्या लावण्याची परवानगी द्या. इथे नीट व्यवस्था करून द्या.

15:02 (IST) 2 Sep 2025

“आयो लाल… सभी चओ झूलेलाल” च्या जयघोषाने उल्हासनगर दुमदुमले

उल्हासनगर शहर सिंधी बांधवांची मोठी वसाहत आहे. व्यापारी शहर असलेल्या या शहराची धार्मिक शहर अशीही एक ओळख आहे. शहरात विविध दरबार, सतसंग केंद्र आहेत. …वाचा सविस्तर
14:55 (IST) 2 Sep 2025

पाणी प्रश्नावर नगरसेवकांना पुढे न करता सतेज पाटलांनी चर्चेला यावे; प्रा. जयंत पाटील यांचे आव्हान

सोमवारी प्रा. जयंत पाटील यांनी काळम्मावाडी नळपाणी योजना कुचकामी ठरल्याने सतेज पाटील यांना प्रश्न उपस्थित केले असताना ते नगरसेवकांना पुढे करून उत्तर देत आहेत. …अधिक वाचा
14:41 (IST) 2 Sep 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : उल्हासनगरकरांचा मराठा बांधवांसाठी ऐक्याचा संदेश; ६०० बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था, जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा

बदलापूर, अंबरनाथ यासारख्या शहरांतून मदत केल्यानंतर उल्हासनगर शहरातील मराठा बांधवांनीही मुंबईतील आंदोलकांसाठी जेवण, खाद्यपदार्थ आणि पाणी पुरवठा केला आहे. …वाचा सविस्तर
14:32 (IST) 2 Sep 2025

Maratha Reservation : मानखुर्द जकात नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी…परिणामी सायन -पनवेल मर्गावर वाहतूक कोंडी

मंगळवारी सकाळपासून मानखुर्द जकात नाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. मराठा आंदोलक मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी ही नाकाबंदी करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
14:32 (IST) 2 Sep 2025

भटक्या विमुक्तांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्त्वाचे- जयकुमार गोरे

गोंदवले बुद्रुक (ता माण) येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. …सविस्तर बातमी
14:24 (IST) 2 Sep 2025

“जरांगे, शब्द जपून वापरा”, निलेश राणेंचा इशारा; म्हणाले, “आमच्या कुटुंबातील सदस्यावर हात टाकायचा…”

Nilesh Rane vs Manoj Jarange Patil : नितेश राणे म्हणाले होते की “मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहे.” …सविस्तर बातमी
14:10 (IST) 2 Sep 2025

पाटणकर गटाचे १० गावांतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

रामनगर, लोकरेआळी, बादेवाडी व पुजारी मंडळ, कवरवाडी, चोरगेवाडी, शेंडेवाडी, दऱ्यातील मोरेवाडी, महिंद, बनपुरी, कुसवडे पुनर्वसन झाकडे, नाटोशी या १० गावांतील पाटणकर गटातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल. …अधिक वाचा
14:02 (IST) 2 Sep 2025

Ganeshotsav 2025 : गणपतीनिमित्त टोकाच्या विरोधानंतर डोंबिवलीत रवींद्र चव्हाण-दीपेश म्हात्रे एका सोफ्यावर

या भेटीमुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर शाब्दिक युध्द खेळणारे कार्यकर्ते सर्वाधिक धारातिर्थी पडल्याचे चित्र आहे. …सविस्तर वाचा
13:59 (IST) 2 Sep 2025

जरांगेंकडून न्यायालयाची माफी; ३ पर्यंत आंदोलन सोडा – उच्च न्यायालयाने जरांगे यांना बजावले, राज्य सरकारच्या भूमिकेबाबतही नाराजी

अन्यथा आम्ही कारवाईचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने जरांगे यांना दिला. आम्हाला संपूर्ण मुंबई पूर्वपदावर आलेली हवी आहे, असेही न्यायालयाने इशारा देताना स्पष्ट केले. …सविस्तर वाचा
13:54 (IST) 2 Sep 2025

जामखेडमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आठवले गटाचा मोर्चा; आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणी

पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जामखेड तालुक्यातील नानज गावामध्ये गुंडांची टोळी कार्यरत असून, गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांना मारहाण करणे, दुकानदार व वाहनचालकांकडून खंडणी उकळणे असे गुन्हे करत आहे. …सविस्तर वाचा
13:46 (IST) 2 Sep 2025

“पोलिसांनी मनोज जरांगेंवर बळजबरी केली तर मुस्लीम समाज…”, इम्तियाज जलील मैदानात

एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर जलील म्हणाले, “मुंबई पोलिसांनी सरकारच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंवर बळजबरी केली, त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर मुस्लीम समाज छातीचा कोट करून पुढे उभा राहील.”

13:45 (IST) 2 Sep 2025

संगमेश्वर भागात मोठी वाहतुक कोंडी; बंदी काळात अवजड वाहतुक सुरुच असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक संथगतीने

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता अवजड वाहनांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही अवजड वाहनांची वाहतुक अद्याप ही सुरूच असल्याने वाहतुक कोंडी वाढत आहे. …सविस्तर वाचा
13:44 (IST) 2 Sep 2025

“पोलिसांनी मनोज जरांगेंवर बळजबरी केली तर मुस्लीम समाज…”, इम्तियाज जलील मैदानात

एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर जलील म्हणाले, “मुंबई पोलिसांनी सरकारच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंवर बळजबरी केली, त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर मुस्लीम समाज छातीचा कोट करून पुढे उभा राहील.”

13:43 (IST) 2 Sep 2025

पावसाळ्याच्या तीन महिन्यांत भंडारदऱ्यात २० तर निळवंडेत २१ टीएमसी पाण्याची आवक

अकोले तालुक्याचा पश्चिम भाग पावसाचे आगर समजला जातो. मुळा, प्रवरा, आढळा या जिल्ह्यांतील प्रमुख नद्या या भागातच उगम पावतात. …अधिक वाचा
13:27 (IST) 2 Sep 2025

सायबर भामट्यांकडून वैद्यकीय व्यावसायिकांना फसवण्याचे प्रयत्न

वैद्यकीय व्यावसायिकाने माणुसकीच्या भावनेतून स्वतःकडे पैसे नसतानाही दुसऱ्याकडून उधार घेऊन संबंधित क्यूआर कोडवर साडेचार हजार रुपयांची रक्कम पाठवली. …वाचा सविस्तर
13:17 (IST) 2 Sep 2025

मुंबईसह मोठ्या शहरात लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेच्या संसर्गांमध्ये वाढ!

काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवास कठीण होऊन रुग्णालयात दाखल होणे आणि ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासू शकते. …वाचा सविस्तर
11:55 (IST) 2 Sep 2025

“मनोज जरांगे, नामुष्की टाळायची असेल तर…”, भाजपाचं आवाहन; म्हणाले, “ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका…”

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज? अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत पाहायला मिळथ आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. महात्मा गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यांसमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे.”

“आता वेळ आहे थांबण्याची!. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपाची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व कॅाग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!”

11:33 (IST) 2 Sep 2025

“पोलिसांकरवी आमच्यावर लाठीहल्ला केला तर…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा; “आम्ही तुमच्या शहरांत…”

Manoj Jarange vs Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे की “पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावाल, तर ते तुमच्यासाठी घातक ठरेल.” …अधिक वाचा
10:58 (IST) 2 Sep 2025

“आम्हाला आझाद मैदानातून हाकललं तर…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी कारण पुढे करून मराठ्यांना आझाद मैदानावरुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही मुंबई पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर ते तुमच्यासाठी घातक असेल. मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल.”

10:50 (IST) 2 Sep 2025

पोलिसांची आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस, मनोज जरांगेंनी सांगितलं पुढचं नियोजन

Manoj Jarange Patil on Mumbai Police Notice : “आम्हाला तुरुंगात टाकल्यास आम्ही तुरुंगात बसून उपोषण करू”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. …अधिक वाचा
10:07 (IST) 2 Sep 2025

सीएसटी, बृहन्मुंबई महापालिका चौकातील चित्र बदलले

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बृहन्मुंबई महापालिका चौकातील गर्दी वेगाने कमी होत आहे. चौकातील वाहने निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे यांच्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

09:56 (IST) 2 Sep 2025

Maratha Reservation Protest Mumbai Police Notice : आझाद मैदान रिकामे करा… मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांची नोटीस

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे उल्लंघन केल्याने १ सप्टेंबर रोजी आंदोलनाबाबत मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. …वाचा सविस्तर
09:28 (IST) 2 Sep 2025

मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करावं लागणार, मुंबई पोलिसांची नोटीस

मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना एक नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पोलिसांनी जरांगे यांना म्हटलं आहे की आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे तुम्ही उल्लंघन केल्यामुळे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजीच्या अंतरिम आदेशात दिलेल्या निर्देशांचे तुम्ही उल्लंघन केल्यामुळे १ सप्टेंबर २०२५ रोजी तुम्ही सादर केलेल्या विनंती अर्जानुसार तुम्ही मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.

09:23 (IST) 2 Sep 2025
“शब्द जपून वापरा”, निलेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा

नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही किंवा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हात टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले आहेत, कौटुंबिक राहिले आहेत, ते तसेच राहिले पाहिजेत. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्या कडून पण तीच अपेक्षा आहे.