Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

Live Updates

Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

13:42 (IST) 16 Sep 2025

वसई विरार पालिकेच्या नादुरुस्त बसेस मध्ये आता स्वच्छतागृहे

शहरातील काही भागांमध्ये जागेच्या अभावामुळे त्या परिसरात स्वच्छतागृह उभारणेही अवघड असते. अशा परिस्थितीत आता बसच्या माध्यमातून केलेली स्वच्छतागृहे उपयोगी येणार आहेत. …अधिक वाचा
13:34 (IST) 16 Sep 2025

संशोधक विद्यार्थ्यांची संख्या जास्त… कोणाकोणाला निधी देणार ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधान

‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ या संस्थांच्या संशोधन अधिवृत्तीची जाहिरात न आल्याने पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘ …सविस्तर बातमी
13:26 (IST) 16 Sep 2025

वसई विरारमध्ये नवरात्रोत्सवाची लगबग; मंडप उभारणी, सजावटीच्या कामांवर भर

यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. वसई विरार शहरात घरोघरी घटस्थापना करून तर सार्वजनिकरित्या नवरात्रोत्सव साजरा केला जातो. …सविस्तर बातमी
13:25 (IST) 16 Sep 2025

कल्याणमध्ये लघुशंकेवरून तरूणाला टोळक्याची डोक्यात बिअरची बाटली आपटून मारहाण

कौस्तुभ महेंद्र येरपुडे (२७) गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. ते मुरबाड रस्त्यावरील मुरार बाग भागात राहतात. …वाचा सविस्तर
13:21 (IST) 16 Sep 2025

Maratha Reservation : सातारा गॅझेटसंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ‘ही’ माहिती…

सरकारची भूमिका कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. …सविस्तर वाचा
13:07 (IST) 16 Sep 2025

मिरा भाईंदरच्या प्रभाग रचनेवर काँग्रेसचा आक्षेप

मिरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना ही जनप्रतिनिधी कायद्याचा भंग करणारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. …सविस्तर बातमी
13:05 (IST) 16 Sep 2025

करभरणा योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, एकाच दिवसात ५ कोटी १९ लाख ५१ हजारांची करवसुली

उल्हासनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने राबविलेल्या विशेष मालमत्ता कर भरणा योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. …सविस्तर बातमी
12:53 (IST) 16 Sep 2025

पनवेल महापालिकेने दिली अभय योजनेला १५ दिवसांची मुदतवाढ, मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी यंत्रणा सज्ज

अभय योजना जाहीर केल्यापासून आतापर्यंत ६० दिवसांमध्ये ८६,४९१ करदात्यांनी २८० कोटी ४१ लाख रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला. यापैकी प्रत्यक्ष अभय योजनेचा लाभ ५२,२२० करदात्यांनी घेतला. …सविस्तर बातमी
12:40 (IST) 16 Sep 2025

“इतरांवर आगपाखड करून पतीला सरकारच्या सल्लागारपदी नेलं”, दमानियांना राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती परत आली. यावेळी एका स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप आगपाखड करण्याच्या निकषावर चक्क शासनाच्या सल्लागारपदी आणून ठेवले आहे.”

12:39 (IST) 16 Sep 2025

पश्चिम घाटातून काळ्या बुरशीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध… पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन, काय आहे महत्त्व?

या प्रजातींचे ‘ॲस्परजिलस ढाकेफलकरी’ आणि ‘ॲस्परजिलस पॅट्रिसियाविल्टशारीया’ असे नामकरण करण्यात आले असून, या संशोधनातून पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आला आहे. …सविस्तर बातमी
12:35 (IST) 16 Sep 2025

लोकअदालतीची यशस्वी शिष्टाई, घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून सात जोडपी माघारी

न्यायालयीन प्रक्रियेऐवजी सामोपचाराने वाद सोडवण्याचा हा प्रयत्न एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे. …सविस्तर बातमी
12:24 (IST) 16 Sep 2025

नाल्यावरील उद्यानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, लेखापरीक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी

काही दिवसांपूर्वीच वसई पश्चिमेतील कृष्ण टाउनशिप परिसरात गटारावरील अनेक वर्ष जुना स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. …अधिक वाचा
12:09 (IST) 16 Sep 2025

माऊंट मेरी जत्रेत ‘हाथ की सफाई’… पहिल्यात दिवशी १२ चोरांना रंगेहाथ अटक

मदर मेरीच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मुंबईच्या वांद्रे येथे माऊंट मेरीची जत्रा आयोजित करण्यात येते. ही जत्रा दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होते आणि एक आठवडा चालते. …अधिक वाचा
12:08 (IST) 16 Sep 2025

Mumbai Pune Expressway Temporary Closure : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दुपारी १ तास बंद राहणार

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आज दुपारी एक तासासाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. …सविस्तर वाचा
12:04 (IST) 16 Sep 2025

विमानतळावर ६८ दुर्मीळ प्राणी जप्त… बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक

वन्यजीव बचाव करणाऱ्या संस्थांच्या मदतीने या प्राण्यांची ओळख पटवून त्यांची काळजी घेण्यात आली आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोतर्फे या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात आले …सविस्तर वाचा
11:53 (IST) 16 Sep 2025

वाहनतळाचा प्रश्न सुटणार, एसटी आगारांच्या जागा उपलब्ध करून देण्याची परिवहन विभागाची तयारी

शहरात वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. परंतु वाहने उभी करण्यासाठी  वाहनतळ नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. …सविस्तर वाचा
11:43 (IST) 16 Sep 2025

जळगाव : भडगावात चहाच्या हॉटेलमधील आगीचा भडका फ्रीजमुळे नाही… दुसरेच कारण !

बसस्थानक परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या पारोळा चौफुलीवर झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हॉ …वाचा सविस्तर
11:29 (IST) 16 Sep 2025

युती झाली नाही…..तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद – आमदार शेखर निकम

युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे कार्यकर्त्यांना आमदार शेखर निकम यांनी सांगितले. …वाचा सविस्तर
11:23 (IST) 16 Sep 2025

वाशीतील प्रदूषणावर नागरिक आक्रमक, १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नवी मुंबईतील खैरणे, कोपरी गाव, वाशी सेक्टर १९, २६, २८, २९ या भागात रात्रीच्या वेळी शेजारीच असलेल्या औद्योगिक कंपन्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. …सविस्तर वाचा
11:22 (IST) 16 Sep 2025

Employment Fair : दहावी-बारावी, आयटीआय ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. …अधिक वाचा
11:14 (IST) 16 Sep 2025

मुंबई-पुणे दृतगती मार्गावर ११ लाखांचा गुटखा पकडला…

मुंबई पुणे दृतगती मार्गावर ११ लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी पानमसाला जप्त करण्यात आला आहे. खालापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. …वाचा सविस्तर
11:13 (IST) 16 Sep 2025

पनवेल महापालिकेकडून लवकरच रस्ते बांधकामाची चौकशी

चारही कंत्राटदार कंपनीला याबाबत नोटीस देऊन नागरिकांना होत असलेल्या तक्रारींचा दाखला देत पावसाळा संपताच संबंधित रस्त्यांचे काम पुन्हा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. …वाचा सविस्तर
11:08 (IST) 16 Sep 2025

अंजली दमानियांचे पती सरकारच्या थिंक टँकमध्ये कसे दाखल झाले? स्वतः सांगितला घटनाक्रम; थेट केंद्रातून हलली सूत्रं

Anjali Damania on Anish Damania : अंजली दमानिया राज्य सरकारमधील विविध कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या घटना उजेडात आणत असताना त्यांचे पती अनिश यांची सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्यामुळे दमानिया यांच्यावर टीका होऊ लागली आहे. …वाचा सविस्तर
11:05 (IST) 16 Sep 2025

जळगाव-भुसावळचे अंतर तितकेच… बाह्यवळण महामार्गामुळे प्रवास अर्ध्या तासांवर !

पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्णत्वास येण्यासाठी बराच काळ लागला असला, तरी आता या महामार्गामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. …वाचा सविस्तर
11:05 (IST) 16 Sep 2025

पाणी आणि पाण्यात पाहणे….

धरणाची मालकी असल्याने या शहराने मागील दीड दशकापासून पाणीटंचाई अनुभवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलू लागले आहे. शहरातील काही उपनगरे, वस्त्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. …अधिक वाचा
11:02 (IST) 16 Sep 2025

विकासक बदलण्यासाठी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची संमती अनावश्यक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Bombay hc verdict on developers change न्यायालयाच्या या निर्णयामुळे आधीच्या विकासकाने घेतलेल्या दोन तृतीयांश सदनिकाधारकांची नव्याने संमती न घेता महारेराकडे नोंदणी सुरू करणे नवनियुक्त विकासकाला शक्य होणार आहे. …सविस्तर वाचा
10:57 (IST) 16 Sep 2025

भाजपच्या ‘टिफीन’ तर अजित पवारांच्या ‘न्याहारी’ बैठका

भाजपच्या ‘टिफीन बैठक’च्या धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने घरोघरी पोहोचण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला. …वाचा सविस्तर
10:54 (IST) 16 Sep 2025

मिरा भाईंदरमध्ये मैदानाचा गैरवापर, नियमांना बगल देत सर्रासपणे इतर कार्यक्रमासाठी वापर, खेळाडू मुलांची गैरसोय

गेल्या काही वर्षांपासून या मैदानांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्यामुळे ते इतर नागरिकांसाठी बंद ठेवले जात असल्याची बाब समोर येत आहे. …सविस्तर बातमी
10:38 (IST) 16 Sep 2025

Maharashtra Debt Crisis: महाराष्ट्रावर वाढता कर्जबोजा; आकडा ८.५५ लाख कोटींपर्यंत! राज्याची आर्थिक घडी विस्कटली

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच सरकारने २४ हजार कोटींचे कर्ज घेतले असून वर्षअखेर कर्जाचा आकडा ९ लाख ३२ हजार २४२ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. …अधिक वाचा
10:38 (IST) 16 Sep 2025

पालघरकरांचा प्रशासनाविरोधात एल्गार, खड्डेमुक्त शहरासाठी नागरिक एकवटले

पालघर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होत आहेत, तर वाहतूक कोंडी ही एक नित्याची समस्या बनली आहे. …सविस्तर वाचा

Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)

राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.