Narendra Modi Maharashtra Visit Live, 19 January 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे रणशिंगही फुकले.
Maharashtra News, Narendra Modi Mumbai : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत कडेकोट सुरक्षा
मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. “मी उद्या मुंबईत असेन. ३८ हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.” असं ते म्हणाले.
मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2023
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथून परतताच वांद्रे-कुर्ला संकुलात तयारीची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेला विक्रमी गर्दी जमविण्यात येणार असून त्याद्वारे मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)
पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथून परतताच वांद्रे-कुर्ला संकुलात तयारीची पाहणी केली.