ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
रशिया आणि इस्रायल यांचे सकल देशांतर्गत उत्पादन कमी असले तरी ते अधिक श्रीमंत आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत अनुक्रमे सहा पट आणि १८ पट जास्त आहे. हे गणित भारतातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वगळता जगातील प्रत्येक नेत्याला ठाऊक आहे,
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
भारत जेव्हा सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना समान संधी देणारे आणि प्रगत-विकसित भविष्य घडवण्याची कल्पना करतो, तेव्हा त्यासाठी सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा आधार म्हणजे जमीन! मग ते घर असो, शेत असो, दुकान असो किंवा स्मार्ट सिटीचे स्वप्न असो – विकासाचे प्रत्येक स्वरूप जमिनीवरच बेतलेले असते.
उत्तराखंड सरकारने लोकसांख्यिकी बदल, समान नागरी कायदा, बेकायदा धर्मांतरबंदी आणि दंगलविरोधी उपाययोजना यासारखे धाडसी निर्णय घेतले आहेत, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.
केंद्रातील मोदी सरकार कोणताही निर्णय घेतल्यावर सहसा माघार घेत नाही. अपवाद भूसंपादन कायदा आणि तीन कृषी कायद्यांचा. तेही निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी नको म्हणून उचललेले पाऊल होते.